STORYMIRROR

Anjali Bhalshankar

Others

2  

Anjali Bhalshankar

Others

चुकांमुळेच आयुष्य घडतं.

चुकांमुळेच आयुष्य घडतं.

3 mins
44


श्वास घेणं, बोलणं, अन्न प्राशन करणं, झोप या मानवाच्या जगण्यासाठी च्या नैसर्गिक गरजा आहेत अथवा जींवत असण्याचे प्रतीक वा कारण आहेत. त्या पुढचे पाऊल कौटुंबिक व सामाजिक दृष्ट्या जोडलेला आहे. विविध प्रकारचे संस्कार मानसावर अजुबाजुच्या घडामोडीपासुन लहानपणापासुनच होत असतात विषेशतः लहान मुल मोठ्यांच्या बर्याच गोष्टीचे निरीक्षक करून अनुसरण करण्याचा प्रयत्न करीत असतात. आईला स्वयंपाकात मदत करायचा अटटाहास करून मध्ये मध्ये लुडबुड करीत रहातात.सहाजिकच बर्याच वेळेस चुका होतात परंतु हा अनुभव पुढील आयुष्यात मुलींना सासरी अथवा जर शिक्षण नोकरी वा इतर कामानिमित्त घरापासून दुर वा एकट रहायची वेळे येते. तेव्हा तुम्ही चुका करत, प्रसंगी आईचा मार खाऊन शिकलेला स्वयंपाक तुम्हाला ऊपाशी ठेवत नाही म्हणा किंवा घरच्या ताज्या जेवणाची हमी देतो.

` काही विद्यार्थी अभ्यासाच्या बाबतीत फार उदासीन असतात एक तर काही समजत नाही म्हणून अभ्यास करायला मागतं नाहीत,चुकुन अभ्यासाला बसलेच तर गणित इंग्रजी म्हणजे डोक्यावरून पाणी! अशावेळेस प्रयत्नचं केले नाहीत चुका कशा होणार ?आणि चूक समजलीच नाही तर सुधारणार कशी? त्यासाठीच कोणताही विषय असो नीट अभ्यासता यायला हवा त्याच्या मुळाशी जाऊन अनेकदा समजुन घेतल्यास नककीच आपण कूठे चुकतोय हे तर समजतेच आपल्या ज्ञानातही भर पडते.जगात मोठमोठे शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांनी अनेक प्रकारचे मौल्यवान शोध लावले ज्याचा ऊपयोग निरनिराळ्या क्षेत्रात संपुर्ण मानवजातीला होत आहे.या सारयाच शोधाच्या गोष्टी पृथ्वीवर अधिपासुनच अस्तित्वात होत्या फक्त त्याला एका गुणसूत्रात वा समीकरणात बांधुन ठेवण्याचे कसब शास्त्रज्ञांना साधले मग हे सारे सहज सोपे थोडेच होते?.अगदी आयफेल नोबेल आयझॅक न्यूटन अल्बट आईनस्टाईन पासुन आपले रघुनाथ माशेलकर वा जंयत नारळीकर अब्दुल कलाम यांसारखे मोठे शास्त्रज्ञ हे निरिक्षण व निरनिराळे प्रयोग जे बर्याचदा निरर्थक ठरले काही जीवावर बेतले तरीही सातत्याने चुकत चुकत का होइना प्रयत्न करीत राहीले.त्याची फलित जग अनुभवत आहेच.अभिनेत्यांना अभिनय करताना अनेकदा रीटेक घ्यावे लागतात मात्र सिनेमा रिलीज झाल्यावर तोच रातोरात स्टार बनलेला असतो.कोणत्याही गोष्टीची सुरवात महत्वाची आहे बर्याचदा निर्णय चुकतात अनावधानाने चुकीचे शब्द मुखातुन जातात.

तरूण मुल मुली चुकीच्या संगतीत जातात प्रेमात पडतात पंरतु ज्यावर आपण जीव ओवाळून टाकतो जन्मदात्यांशी जगाशी वाईट पणा घेतो तो किंवा ती खरचं त्या पात्रतेची आहे का?हे कुळेस्तोवर खुप ऊशीर झालेला असतो.परंतु त्यातुनच काहीजण जीवणाचा खुप मोठा धडा घेतात बरेचदा आपण माणस ओळखायला चुकतो नको त्या लोकांवर नको तेवढा विश्वास ठेऊन बसतो कधी जास्त पैशाच्या अमिशाला बळी पडून चुकीच्या ठीकाणी गुंतवणुक करून बसतो गोड बोलण्याला भुलुन आपल्या आयुष्यातल्या बर्याच वैयक्तिक गोष्टी चुकीच्या मानसांना सांगुन बसतो.या सार्या अनुभवातुन चुकांतुन आपण घडत असतो. त्यापासून काही ना काही बोध घेऊन आयुष्य समृद्ध करीत असतो.खर तर चूकामधुनच माणुस शिकत असतो !घडत असतो! आपल्याकडे एक म्हण आहे "उन्हाने पांढरे झालो नाही आम्ही"! अशी वयस्कर मंडळी म्हणत असतात.चार अनुभवाचये बोल नव्या पीढीला सांगण्यासाठी धडपडत असतात त्यांना जाणिव असते आपल्या भुतकाळातील चुकांमधून घेतलेले बोध दुसर्याला त्याच चूका करून पस्तावा होऊ नये असे बोलत असतात सहजचं बोलतो आपणं माणुस आहे चुक तर होणारच वारंवार होणार पंरतु त्या प्रत्येक चुकीमधून नवा बोध मिळायलाच हवा! जेणेकरून तीच चुक पुन्हा पुन्हा होऊ नये मात्र दरवेळेस नवी चुक करता यायला हवीचं माणसाला कारण जीवन जगताना केलेल्या चूकांच जीवन जगण्याची प्रेरणा व धडा देणार असतात. नवं काही तरी करण्याची धडपड मानसाला नव्या चुकीची व त्यापासून नव्या वाटा शोधायची चालना देत असते ना!!!


Rate this content
Log in