सुमित बारी

Children Stories Others

5.0  

सुमित बारी

Children Stories Others

चतुर शेतकरी

चतुर शेतकरी

2 mins
2.7K


     एक शेतकरी असतो, तो खूप चतुर असतो. तो त्याच्या चतुराईने देवाला सुद्धा फसवत असे. देव त्याच्यावर नेहमी कृपा करायचा पण त्याने देवाला कबूल केलेले तो द्यायचाच नाही, जे द्यायचा ते फक्त चारा. देवाला त्याचा संताप आला, जून महिना संपला तरी देवाने पाऊस काही पाडला नाही, मग शेतकरी देवाला विनवणी करू लागला. देव प्रसन्न झाला त्याने देवाला सांगितले देवा पाऊस व्यवस्थित पाड, देव म्हणाला याबद्दल मला काय देशील? देवा तुम्ही सांगाल ते देणार. देव म्हणतो तु जे पीक घेशील त्यातून निम्मे पीक मला द्यायचे,शेतकरी देवाला विचारतो वरचा भाग का खालचा? देव वरचा भाग मागतो, शेतकरी शेतात भुईमूग पेरतो. देव भरपूर पाऊस पडतो पीक भरपूर येते, देव त्याच्याकडे अर्धा हिस्सा मागायला येतो, तो सर्व शेंगा घेतो व उरलेला पाला अर्धा देवाला देतो व सांगतो आपण पिकाच्या वरचा भाग मागितला मी तो आपणास आपणास आपल्या सांगण्यानुसार देतो. देव शेवटी तेथून जातो.    

          परत दुसऱ्या वर्षी शेतकरी देवाला चांगला पाऊस व्हावा म्हणून विनवणी करतो, देव त्याला सांगतो तुझे पीक होशील त्यातला खालच्या आणि वरच्या अर्धा हिस्सा मला द्यायचा. मग शेतकरी होकार देतो. देव पण भरपूर पाऊस पडतो शेतकरी शेतात मका पेरतो, मक्याचे भरपूर उत्पन्न येते देव अर्धा हिस्सा मागायला येतो. शेतकरी देवाला खालची मूळ वरची तुरे देतो व संपूर्ण मका शेतकरी ठेवून घेतो. अशाप्रकारे शेतकरी देवाला फसवून देवाला विनवणी करून आपले काम सार्थ करून घ्यायचा. देव शेवटी त्याची परीक्षा पाहत असतो तो नेहमी चतुराईने देवाला फसवतो. देव त्याच्या चतुराई वर प्रसन्न होतो त्याला नेहमी भरघोस उत्पन्नाचा आशीर्वाद देतो.


Rate this content
Log in