चिंतन
चिंतन
मन चिंतन
जीवन ही एक कला आहे.जीवन घडवणारा माणूस हाच कलाकार आहे. या कलेचे साधन, साध्य सर्व माणूसच आहे.
जसे दगडावर घाव घातले की मूर्ती बनते. अथवा वेगवेगळे आकार दगडामध्ये कोरले जातात. प्राणी, पक्षी, फुलांचे आकार असे विविध आकार या दगडामध्ये कोरले जातात. त्याला रंगरंगोटी करून ते विकण्यासाठी ठेवले जातात.
खरेदी विक्री जशी तुमची मूर्ती घडत जाते तसे तुम्हाला पैसे येत जातात चांगली, अतिउत्तम मूर्ती घडली असेल तर पैसा चांगला मिळतो. जरा ओबड धोबड आकार असतील तर जरा कमी पैसे मिळतो.
मग मानवा तू स्वतःला घडवतोस ते तुझे जीवन तू जसे घडवतोस तसेच जीवन शिल्प घडणार आहे. स्वतःला जसे तू घडवतो त्याप्रमाणे मूर्ती घडवतो तशी स्वतःची मूर्ती तू स्वतःच घडवत असतो. मग ती सुंदर असेल किंवा कुरूप असेल या दोन्ही मूर्तींना जबाबदार तू स्वतःच आहेस कारण तू स्वतःच त्या जीवनाचा मूर्तिकार आहेस.
तू स्वतःच जीवनाचा शिल्पकारही आहेस.
म्हणून हे मानवा स्वतःच्या हातून जे आपलं जीवनशिल्प घडणार आहे ते अति उत्तम असू दे. चारित्र्यवान असू दे.
मानसीचा चित्रकार तू निरंतर चित्र काढतोस. सुबक आकार दे या जीवना तू मानवा...
वसुधा वैभव नाईक
धनकवडी जिल्हा पुणे
मो. नं. 9823582116
