STORYMIRROR

SHRIKANT PATIL

Others

3  

SHRIKANT PATIL

Others

चैत्या

चैत्या

3 mins
1.5K


"आज आठवडा सुट्टी असल्याने निवांत वेळ आहे .आपण मराठी सिनेमा बघायला जाऊ." मी आमच्या सौ ला म्हणालो.

तशी तिची मराठी सिनेमा बघायची आवड मला माहीत होती. ती लगेच म्हणाली ,"कोणता सिनेमा लागलाय?"

"अग, 'नाळ 'सिनेमा आहे.जवळच्याच मराठा मंदीर थियटर मध्येच आहे".

"मुलाना घेऊन जाऊया काय?" ती म्हणाली.

"अगं,मुलांसाठीच आहे तो सिनेमा."

"बरं ,मी तिकिट घेऊन येतो."

"अहो ,बाल्कनीचीच चार घ्या". तिचा स्टॉलमध्ये बसण्याचा मी तिचा मागील अनुभव पाहता लगेच होकार दिला. मागे एकदा हिन्दी सिनेमा पहायला स्टॉल मधे बसलो होतो तेंव्हा तिची मान सारखी वर करुन दुखू लागली.घरात आल्यावर ती माझ्यावर एवढी खवळली की तिचे घणाघाती शब्द ऐकून माझी मान वर झाली नाही.

चित्रपट पाहण्यासाठी आम्ही वेळेतच पोहचलो. आमच्या सौ नी शेजारच्या काकींनाही बोलावले होते. ते ही तेथे पोहचले त्यांनाही आयत्यावेळी तिकीट मिळणे मुश्कील झाले पण अखेर बाल्कनीची त्यांच्यापुरती मिळाली. मग काय आनंद झालाआमच्या सौ ना शेजारच्या काकींची आणि आमच्या सौ ची गप्पांसाठी चांगलीच नाळ जमली.

चित्रपट सुरु झाला तसे त्यातील चैत्याचे पात्र आणि त्याचा अभिनय पाहून आमच्या दोन्ही कन्या सिनेमा पाहण्यात दंग झाल्या. मला मात्र माझे बालपण आठवू लागले.बालपणीच्या आजी बरोबरच्या गप्पा गोष्टी, त्या काळात मित्रासमवेत केलेल्या खोड्या, घराशेजारील शेतात सकाळी सकाळी पक्ष्यांप्रमाणे गल्लीतल्या मित्रांबरोबर विधी पार करण्यासाठी बसलेल्या रांगा सगळ काही पाहून आठवणीची नाळ जुळली. आणि मन आठवणीच्या हिंदोळ्यावर नाचू लागले.

थोड्या वेळाने माझी नजर सिनेमातील चैत्यावर चांगलीच जमलीआणि मला माझ्या शाळेतील चौथीत शिकणारा चैत्या आठवला. खरं तर चैतन्य हे त्याचं नाव.पण बहुतेक मुले त्याला 'चैत्या' म्हणूनच बोलवत.त्यामध्ये मैत्रीच प्रेमच होत. कुरळे केस, कांन सशाच्या कानासारखे टवकारलेले , कपाळावर नेहमी बुक्का लावलेला.कौलंट्या उड्या मारण्यात पटाईत असणारा.शरीर तर एवढं लवचिक की गवतावर अलगद डोकं टेकवून शिर्षासन करणारा. अभ्यासात हुशार,तल्लख बुद्धीचा पण अक्षर लेखन त्याच्यासारखच वाकड्या वळणाच. शनिवार शाळेत यायच म्हणजे फारच कंटाळवाण त्याला वाटायचं. नेहमी उशीरा डोळे पुसत , धापा टाकत शाळेत पोहचायचा. लहान मुलांच्या खोड्या काढ़णे हा त्याचा दररोजचच काम.नेहमी तक्रारी कार्यलयात दाखल व्हायच्या.

चैत्या ला फिरण्याचा फार छंद.सुट्टी असेल तर तो घरात कधी नसायचा. त्याला नवनवीन गोष्टींच भलतच आकर्षण. आई रागावलीच तर तात्याकड़ जाऊन टी व्ही बघत बसायचा. फारच चंचल.

एकदा त्याची आई शाळेतआली आणि म्हणाली, "अहो गुरूजी ,मला बोलायचं आहे चैतन्य विषयी. "'

"काय म्हणतो आमचा चैत्या?आहे ना व्यवस्थीत?"

>मी म्हणालो.

"हो आहे .त्याला आठवडाभरची शाळेतून सुट्टी पाहिजे."

"एवढी सुट्टी कशाला हो"

"त्याच्या मावसभावाचे लग्नआहे अहमदाबादला.त्याच्या मामाने मुंबईतून विमानाचे तिकिट बुक केले आहे ."अहो,विमानात चैत्या बसणार म्हटल्यावर कसे नाही म्हणणार?त्याला घेऊन जावा.असे मी म्हणालो.

सगळेच अनुभव मुलाना चार भिंतीच्या शाळेत देता येत नाहीत .त्यासाठी त्या पलीकडे जाऊन मुलाना जग दाखवावे लागते. मुलांसाठी असे कौटुंबिक सहलीचे प्रसंग अनुभव दिले पाहीजेत.त्यातून नात्यांची ओळख,त्यांच्याशी गप्पा-गोष्टी अशातून मुलांवर संस्कार घडून जातात.

चैत्याला फिरायची आवड असल्याने आणि विमानातून प्रवास करणार म्हटल्यावर त्याला चैनच पडत न्हवती.चैत्याने सगळी तयारी केली.गावापासून मुंबईपर्यंतचा प्रवास रेल्वेने आणि त्यापुढील प्रवास विमानाने असा होता.

आठवडाभरच्या सुट्टीचा आनंद घेऊन चैत्या शाळेत आला.मुल सांगू लागली, "गुरूजी चैत्या विमानात बसून आला." मुलांसाठी ती आश्चर्याचीच गोष्ट होती. सगळी मुले प्रार्थनेला जमली .मुलांसमोर त्याने केलेला प्रवास कथन करायला सांगितला.तो आमच्यासाठीही नवीनच होता.

चैत्या म्हणाला,"मी माझ्या आई ,मामा ,मावशांसोबत मुंबईतील विमानतळावर पोहोचलो .विमानतळावर माझे विमान यायला मला तासभर वाट बघावी लागली. विमान तासाभराने आले.मी व मामा जवळजवळच्या सीट वर बसलो होतो. विमानतळावर चार पाच वेळा खाली विमान फिरून झाले.आम्हाला सीट बेल्ट बांधायला सांगितले आणि विमानाने अहमदाबादकडे उड्डाण केले.आम्ही मुल आकाशात उडणारे विमान जमिनीवरून पाहिले होते.आज त्यातून आम्हाला खाली जमीनीवर असणारी गाव,शहरआणि निसर्ग बघायला मिळाला.आयुष्यात पहिल्यांदाच हे सगळ पाहून मनाला आनंद वाटत होता. विमानात खाऊ द्यायला बाई आली.मी खाऊ पाहून खूश झालो. मामांने मला थंडपेय प्यायला घ्यायला सांगितले." मी मामांला म्हणालो,"मामा विमान वरती लई तापतय म्हणून आपल्याला हे थंड प्यायला देतात काय." अर, ही सोय सगळ्या विमानात देतातच." थोड्याच वेळात विमान अहमदाबाद विमानतळावर उतरणारआहे सीट बेल्ट बांधून घ्या अशी सुचना येताच.माझे सिटबेल्ट मामाने बांधले.

विमान उतरले .आम्हीही विमानातून उतरलो. मागे वळून विमानाकडे सारखे पाहत मी आई सोबत मावशीच्या घरी निघालो.

चैत्याचा प्रवास अनुभव मी व सारी मुले दंग होऊन ऐकत होतो. त्याला मी शाबासकी दिली.सा-या मुलानी टाळ्या वाजवून त्याचे कौतुक केले.

"जस आकाशात विमान उडतय भुर भुर भुर " हे गाण्यातील बोल चैत्याने प्रत्यक्ष अनुभवलं होते. माझ्या समोरील सिनेमातील चैत्या सारखच प्रत्येक शाळेतील मुलांना चैतन्यमय ,बिनधास्त बालपणीचे जीवन जगता याव अस वाटत. यासाठी सर्वच आई बाबानी मुलाना मुक्तपणे सहज शिक्षण दिल पाहिजे.


Rate this content
Log in