Buy Books worth Rs 500/- & Get 1 Book Free! Click Here!
Buy Books worth Rs 500/- & Get 1 Book Free! Click Here!

Ranjana Bagwe

Others


5.0  

Ranjana Bagwe

Others


चावडी

चावडी

12 mins 810 12 mins 810

टण्, टण्,घंटा वाजली आणि गोकुण गावच्या शाळेतील मुलांच्या शाळा सूटण्याच्या प्रतीक्षात संपली..

भरभर जसा पक्षाचा थवा आपल्या घरट्याकडे निघावा तसा हा मानवी थवा शाळेच्या बाहेर पडला..

रस्त्यावरून चालताना काही मुल उद्या शाळेत आल्यावर काय करायच,याचे मनसुभे हाकत निघाले,तर काही मुल ग्रुहपाठ घरी गेल्यावर कसा करायचा याची काळजी करत होती...

या सर्वात मस्ती खोर असनारी मुल मात्र सकाळी वर्गात मस्करी करताना त्याच रूपांतर भांडणात झाल..त्याची उजळनी करत .भांडण पून्हा जुपंल.हमरा तुमरीवर आलेल , कुणाच कुणी ऐकत नव्हत.. बघ्यानी गोल वर्तूकार रचना करत भांडण करना-या मुलांभोवती,चक्रव्यूह रचलेला...वाटेवर एकच उडालेला कल्लोळ ऐकूण 

वर्तूळकार चक्रव्युहाचा भेद करत त्याच शाळेत शिकत असलेला अनिल येवून तीथे भांडण करना-या मुलांना उद्देशून म्हनाला...

""करण,रमेश काय झाल?अरे घरी जायच सोडून तुम्ही असे,मध्य रस्त्यावर ,का भांडता"""

"""विचार ह्यालाच सुरुवात याने केली""

""हो रे रमेश,हा करण बोलतो ते खर आहे का?""

""अन्या तो कधी खरा बेलला तू ऐकलस ,!हा खोट बोलतो.सुरवात पहीली यानेच केली..

""बर सूरवात कुणी केली ते बाजूला राहू दे,!आणि मला सांगा नेमक भांडण कश्यावरूण झाल""

अनिलच्या तोंडून भांडणाच कारण काय हे ऐकताच दोघांनी आळीमळी गप चीळी ,या प्रमाणे तोंड मिटून गप्प रीहीलेल पाहील्यावर अनिल उवाच..

"""अरे ये बोला की !काय झाल ते""

""मी सांगतो हा रम्या काही सांगणार नाही""

""मग मित्रा तूच सांग की""

""अं..ह..मी""

""हो तूच"""

""नाही मी काही सांगणार नाही माझ काही चुकलच नाही.ज्याच चुकल त्यांनी सांगाव""

""कर्ण्या तुझ अती होतय काही बोलू नको नाही तर मुस्काट फोडीन...

""कुणाच माझ!!

""हो तुझच घाबरतो की काय""

""मग हात तरी लावून दाखव ""

""हा हा लावला काय करशील""

""तुझ्या तर..""

आणि दोघात पून्हा युध्दाचा बिगूल वाजला .आणि अनिल पून्हा ति-हाईताच्या रूपात दोघांच्या मधी य़ेवून म्हणाला..

""ये तुम्हाला दोघाना सांगतो आता गप्प बसा ,नाही तर आम्ही सर्वजण घरी जातो मग बसा भांडत""

""अन्या लेका तुझ अगदी बरोबर आहे.

""सूबाण्या तुला सांगतो हे दोघ असे ऐकणार नाहीत""

""मी पण तूला तेच सांगतो""

""अं..तू कधी काय बोलला,ये ह्याच बघा ज्ञान वाहतय!!

"""मग पकडू का आम्ही""

""काय पकडता""

""याच वाहनार ज्ञान""

""सुमे तुला काय मस्ती सुचते ""

""अन्या नाही हा मस्ती नाही..""

""मग शाळेतल्या कविता सुचतात का??

""अन्या तू काही बोलतो. मी गप्प बसनारी नाही,"

""तू गप्प नकोच बसू,आणि तूला ते जमण्यातल नाही. तू आपली दात काड हं""

""अन्या माझ्या मैत्रणीला तू अस बोलू शकत नाही""

""ये लागली का शानपती करायला,!काय ती मैत्रीण !अन काय तू !दोघी नुसत्या ध्यान""

""अन्या तू मला बोल पण माझ्या सरूला काही बोलायच नाही""

""हो मग तीन आम्हला बोलल तर चालतय ""

""चालवून घ्याव लागेल""

""ये टवळे काय गं मी काही बोलत नाही म्हटल्यावर जास्तच बोलतेस""

""ये टवळी कुणाला बोलतो ""

""तुझ्या या..या..अप्सरेला""

""अप्सरा ती आणि तू कोण राक्षस""

""ये गप्प बसा भांडण सोडवायला आपण जमलो. आणी आपल्यात भांडण होते..आणि रम्या ,कर्ण्या,बघा की कसे दोघेही तुमची मजा घेत ऊभे आहेत..""

""राजन तू बरोबर बोलतोस तूला सांगू यांच्या नादाला नको लागायला,चल आपण घरी जावू""

""ये सीमे पाटलांच्या कन्ये तूझी पाटीलकी घरीच ठेव हां""

""अन्या मला बोल पण घरावर नावावर जायच नाही..आणि आहे मी पाटलांची कन्या !येणी प्राँब्लेम""

""ही$$$$$ही$$ये सर्वानी ऐका बर का पाटलांच्या कन्येच इग्लीश कसली जाम बोलते इग्लीश,मी घाबरलो बर का सीमे""

""अन्या तू खरच घाबरलास,बघ असा असतो पाटलांचा धाक,उगाच नाही बाबा माझे सपंच झाले...हे तर काहीच नाही .परंतू बाबा माझे,गावातल्या चावडीवर ,न्याय देतात एकदा ऐकायला ये ,म्हणजे कळेल पाटील घराण्याचा हुकूम""

""त्यात ऐकायच काय !मी पण करू शकतो न्याय निवाडा""

""होय ""

""होयच ,सीमे तूझे बाबा, सर्वांची बाजू ऐकून तर बोलतात""

""होय तर मग ठरल उद्याच आपण या कर्ण्याच,आणि रम्याचा निवाडा करूण यांच भांडण सोडवू ... मित्रानो,कशी वाटली माझी आयडीया""

""छान मस्त ,सर्रस,लाजबाब,""

प्रत्येक मुलांच्या तेोंडूऩ निघाल..ते ऐकूण सीमाला चेव आला तीही तीतक्याच उत्सहात म्हणाली...

"""ऐका सर्वजण उद्या आपल्या शाळेला सुट्टीच आहे..आणि तसेही बाबा, ऊद्या बाहेर जानार, मग गावातली चावडी रिकामीच असनार, आपण या रम्या ,कर्ण्याच भांडण तीथ सोडवू,आणि सरपंच असेल हा अन्या, बोला मान्य आहे सर्वाना""

""एकदम मान्य ""

सर्वांचा आवाज एकत्र होवून गरजला, तशी सीमा पून्हा अनिला संबेधून म्हणाली..

""काय अन्या तूला मान्य आहे का??नाही तर टाय टाय फिश""

"" मला मान्य आहे,तुला घाबरतो की काय?

""ते कळेलच उद्या""

""हां बघच तू""

"बघणारच"""

""हा ना,बघ ना!कसा न्याय देतो ते"""

""ये परंतू आम्ही तीथवर येणार नाही.""

एवढा वेळ करण,रमेश दोघे गप्प उभे होते.परंतू आपले भांडण सोडवायला चावडी परस्पर सर्वांनी आम्हाला न विचारता निवडल्यावर दोघ सरसावून पूढे येवून बोलत होते..

""का येनार नाही.

""हा अन्या तू बरोबर विचारतोस""

""सुबाण्या तू गप्प बैस,आम्ही येणार नाही..

""तूम्हाला यायला लागणार""

""हे सांगणारी तू कोण??

""अरे बापरे तूला माहीत नाही मी कोण??

""पिंपळावरची भुतनी""

""अन्या ,गप बस ,तूच आहेस वडाच्या आंब्याच्या,चिंचेच्या झाडावरचा भुतोबा""

""तो तर मी आहेच म्हणून तर मला सरपंच बनवल ना तू!!

""अरे तुम्ही का भांडता""

""सुबाण्या हीलाच भांडण आवडते..असही मुली भांडकुदळ्याच असतात,""

""आम्ही भांडकुदळ्या ,आणि अन्या ,तूच डुकारावानी अंगावर येतोस""

""सीमे, तुझ्या या भटक भवानीला सांग माझ्या नादाला लागू नको""

""सरू गप गं तू नाही तर हा""

"""नाही तर काय ""

""काही नाही विषेश बैलासारखा सिंग मारशिल""

""सीमे तुझ्या तर""

""तर काय,आला मोठा शहाणा आधी ऊद्या यांच भांडण सोडवून दाखव तरच तूला मानीन""

"""दाखवेन, कर्ण्या,रम्या ऊद्या दुपारी दोन वाजता तूम्ही चावडीवर यायच, आणि आत्ता या ठीकाणी हजर असणा-या पैकी कुणी आल नाही ना ,तर याद राखा ,गाठ माझ्याशी आहे. समजल,निट लक्ष्यात ठेवा""

आणि अनिल तावाने तीथून निघाला..बाकी सर्व मुलांनी अण्याच अनुसरण करत एकएक जण आपआपल्या घरी निघाले..

आता उद्याच्या येणा-या दिवसाची ऊत्कंठा होती...

अनिल घरी जरा रागातच आला,होता.आल्या बरोबर आईने काही तरी खावून घे सांगूनही त्याने काही खाल्ल नाही..राहून राहून त्याला ,मी सरपंच बनायला तयार आहे.हे मोठ्या दिमाखाण सर्व मुलामसमोर फुशारकी मारली खरी, त्याला आता भिती वाटत होती..त्या भीती पोटी त्याला खाण पिण सुद्धा गोड लागेना,आपण कसा काय पंच बननार, सीमाला मोठ्या मानाने म्हणालो मी कुणाला घाबरत नाही,परंतू आता मात्र मला हे जमण जरा अवघड वाटत...आपण या आधी कधीही चावडी समोर न्याय होताना पाहीला नाही...रीकाम्या चावडीवर खेळायला मात्र ब-याच वेळा गेलो..आपल्याच विचाराच्या नादात कधी रात्र झाली हे अनिला कळलही नाही..भूक नसतानाही केवळ आईच्या आग्रहाखातर त्याने कसे तरी पाण्याच्या घोटा बरोबर दोन घास पोटात बळेच ढकलून तो बिछ्याण्यावर पडला, या कुषीवरून त्या कुषीवर वळत तो रात्री उशीरा कधी झोपला ते त्याला कळलही नाही...

अनिलला जाग आली...तेव्हा सकाळचे बहूतेक नऊ वाजून गेले होते...

एरवी अनिल शाळेत जायच्या निमित्ताने सकाळी सहा वाजता उठलेला असतो..परंतू आज शाळेला सुट्टी असल्या कारणाने तो बराच वेळ झोपला..

जाग येताच तो प्रथम उठून बसला..

आणि चावडीवर आज सर्वानी जमायच ,या विचाराने तो थोडा घाबरला, घाबरण्याच कारण ,त्याला आज पाटलाच्या मुलीने न्याय देण्याच काम सोपवल होत..

जोशात त्यानेही चालेंज स्वीकारल खर,पण आता आपण योग्य न्याय देवू शकू का?

असा प्रश्न पून्हा एखदा त्याच्या मनाला सतावत होता..

काही वेळातच त्याने मनाला पडलेला प्रश्न धुडकावून लावत,तो बिछाण्यावरून उठला,आणि दुपार कधी होते याची वाट पाहत व आपली इतर काम उरकण्यात गुंग झाला...

'हळू हळू छताची सावली वाढत तीन अर्ध अंगण झाकूण घेतल्यावर अनिल समजून गेला आता चावडी जवळ निघायची वेळ झाली... त्याने वळचणीतल्या कोप-यातल्या वाहणा पायात घालून तो बाहेर पडला..

चालण्याचा वेग वाडवत तो चावडीवर पोहचला..

एक एक करत सर्व शाळकरी विद्यार्थी मंडळी चावडीवर जमली..

सर्वाना आतूरता होती ती आता रमेश ,,आणि करण, येण्याची ,सर्वाच्या नजरा रम्या कर्ण्या येण्याच्या वाटेकडे लागून होत्या,,

 फक्त करण आणि रम्या आले की न्यायाला सूरवात हेनार होती. 

दोघ हजर नसल्याने मुलात एकच खळबळ माजली..

सुबाण्या अनिल जवळ जात म्हणाला...

""अन्या अरे करण ,रम्या, कूठे दिसत नाही.

"आले तर दिसनार ना"""

""अन्या तुला न्याय द्यायला येईल ना??

"""हो देईन पण तू का घाबरला""

""मी कुठे घाबरतो""

""मग"

""नाही नतंर आपल हस व्हायला नको""

""सुबाण्या मी सांगतो आज मी सर्वाना आवडेल असाच न्याय देईन""

""देव करे आणि तसच होवो""

"""अरे वा!!न्याय दानाची तयारी सूरू झाली वाटते,सरू बघतेस ना!ईतिहासाचे सुबाण्या गुरूजींची, आपल्या लाडक्या विद्यर्थ्याला कस तयार करतात ते""

""हो पाहील की!पण सीमे तूला सांगते ,हा अन्या बघ हा !कसा तोडांवर पडतो ते""

"""तो पडला की तूला आंनद हेनार होय ग""

"""सीमे या निलूला अन्याचा एवढा पुळका का गं""

"" सरू मधी मधी नाक खुपसायची सवय असते एखाद्याला,,""

""सीमे ,तू जरा जास्तच बोलते अस नाही वाटत"

"""ऐक ना निलू,सुमेला वाटते तीच्या एवढी शाहणी दुसरी कुणी नाही.होय की नाही सुमे"""

"""सीता ,तुला चोबंडे गीरी करायची सवयच आहे नाही""

""सुमे तोंड आवर""

""तीने आवरलय पण तू कधी आवरायला घेते""

"""सरू तूला कुत्रा चावला काय गं कधी मधे मधे गुरगुरत असते""

""ये मुलीनो तुम्ही का भांडताय""

अगदी शेवटी आलेला राजू सर्वाना विचारत होता..त्याच्या दोन्ही हातात आताशा तयार होत असलेल्या हिरव्यागार चिंचेच्या लोंब्या पाहून प्रथम सरू पूढे होत म्हणाली.

"""हो रे राजू आपण उगाच भाडंतोय हे नक्की,राजू मला देना""

""काय!ये माझ्या जवळ द्यायला काही नाही""

"""नाही कस त्या हातातल्या चिंचेच्या लोंब्या""

"""हा..आता लक्षात आल सरू माजंरासारखी मँव मँव का करते""

'"राजू अरे तुकडा तरी दे ना! तोडांला पाणी सुटलय"""

""हो का देईन एका अटीवर!""

""कोणत्या??

""तुझी निबंधाची वही थोडा वेळ मला देशिल तर""

"""देईन नक्की""

""बघ हा..फसवायच नाही""

""नाही फसवनार"""

मधल्या मधी राजूने आपल काम मात्र चिंचेच्या बदल्यात करूण घेतल..

सरूला चिंच दिल्यावर बाकी सर्व मुल राजूच्या हातातल्या लोंब्या ओरबडायला सूरवात केली..

ये मला,ये मला,करत राजू भोवती गराडा पडला..

राजूच्या हाततल्या लेंब्या झपटून जो तो त्याचा आंनद घेण्यात मग्न झाला..

परंतू या सर्वापासून लांब असलेल्या अनिलचे लक्ष मात्र रम्या,व कर्ण्याच्या येण्याकडे लागले होते...

एवढ्यात एक जण ओरडला रम्या कर्ण्या आले ....आणि अनिलचा चेहरा खुलून गेला.....

[2/2, 11:54 म.उ.] रंजना बागवे: अनिला लांबून येनारे रम्या,कर्ण्या येताना पाहून अनिल खुष झाला परंतू त्यानी यायला उशिर केला म्हणून रागही आला, ते दोघे जवळ येताच अनिलने रागातच दोघांना प्रश्न केला...

"" कर्ण्या रम्या कुठे होता रे एवढा वेळ""

"हा कर्ण्या वेळेवर आला नाही""

""कर्ण्या आला नाही .तर तूला काय झाल""

""काय झाल म्हणून काय विचारतो .अन्या अरे कर्ण्या नसला तर मी कूठे जात नाही""

""काय!"

"खरच सांगतो त्याच्या शिवाय मला ,आणि माझ्या शिवाय त्याला आम्हाला दोघांनाही करमत नाही""

""अरे तू वेढा आहेस का?'

""सुबाण्या तू मला वेढा बोलू शकत नाही""

"""का?बोलू शकत नाही,अरे तुमच भांडण सोडवायला आपण जमलो ना""

""कोण सांगत! तुम्ही आम्हाला बोलवल,आम्ही नाही सांगीतल,""

"""अरे हो परंतू सुबाण्या बोलतो तेही चुकीच नाही. तुम्ही काल ऐकायला तयार नव्हता ,म्हणून या सुमेने डोक लावलय""

"""तीला कुणी सांगितली पंचाईत करायला""

""रम्या एकट्या सुमेन ठरवल नाही हा""

""सरले मग कुणी म्हटल बाबाच्या चावडीवर भांडण सोडवूया म्हणून""

""सुबाण्या हा अन्या काही कमीचा वाटला .तो तेवढाच जबाबदार आहे.."

""सरू मी काय केल गं जेव्हा तेव्हा मैत्रणीचा कैवार घेवून भाडंत असते""

"" मी तीची लाडकी मैत्रीण आहे.होय की नाही गं सरू""

""अन्या सीमा माझी सख्खी मैत्रीण बर का""

""अरे व्वा!मैत्रीणीत पण सख्ख चुलत असत,मग सांग मला,ही सीता ,ही निलू ,या चुलत मैत्रणी की काय""

""होय गं सुमे आम्ही चुलत मैत्रणी,आणि काल आईन मला खायला बोर दिली होती ..ती मागताना काय म्हणालीस.

""ये सांग ना काय म्हणाली""

""राजू तूला सांगते ही मला बाजूला नेत म्हणाली...

""निलू नको ना गं बोलू शप्पथ आहे तूला""

"""कुणाची गं""

""या राजूची""

""म्हणजे मी मेलो तरी चालत..कालच आई माझी बाबांना म्हणाली माझ्याशी खोट नका बोलू तुम्हासनी राजूची शप्पथ""

""का रे काय झालेल तुझी शप्पथ आईने बाबाना दिली""

""सरू काल की नाही बाबा आले दारू पिवून,आईने विचारल पैसे कुठूण आणले ""

""मग"

""सूबाण्या या सीताच्या बाबांच नाव सांगितल, तेव्हा आईने बाबाना माझी शप्पथ घातली मग बोलले मी शेतातल थोड धान्य विकल""

""तरी मी म्हणतो सीताचा बाबा पैसे देईलच कसा""

"""म्हणजे रे रम्या ,तुला म्हणायच काय""

""अगं सीमा सीताचा बाबा काल आमच्या घरी उसने पैसे मागायला आलेला""

""हे गणित अस होत बघ,आणि माझे बाबा खोट बोलत होते...बर झाल बाबा ,आईन माझी शप्पथ घातली बाबांना""

""होय रे व्हय,नाही तर ही सीता, आणखी भाडंली असती""

""कर्ण्या ,माझ नाव घ्यायच नाही हा ,बाबा काय करतात ते मला रे, काय माहीत...

रम्या ,आणि कर्ण्याच भांडण विसरून मुलांचा आपआपसातला वादच बळवत चाललेला पाहून अऩिल म्हणाला...

""सर्वानी ईकडे लक्ष द्याआपण ज्या कामासाठी आलोय ते सूरू करूया""

""हो""

सर्व मुखी हो आलेला पाहूण अनिलने सर्वाना कट्यावरच्या न्याय करणा-या चावडीवर बोलवल . आणि म्हणाला मुलांनो ही आपली चावडी ,आपण इथे कालच्या भांडणाची सांगता करू, तुम्ही सर्व आधी खाली बसा... मगच हे आजचे,एकमेकावर आरोप करणारे कर्ण्या ,रम्या हे काल रस्त्यावर भांडत बसले होते..त्यांचे भांडण कश्यावरून झाल हे आधी समजून घेवू...तूम्ही सारे तयार आहात का?

""हो""

 अस म्हणून सर्वानी एक मुखाणे अनूमती दिली...

चावडीवर सर्व मुल बसल्यावर अनिलने सीमाला हाक मारून जवळ बोलवून म्हणाला..

""सीमे सर्व जण बसली चल सूरवात करूया""

""हो पण थांब अरे ,तू एकट्याने सूरवात नाही करायची""

""मग""

""मी पाहीलय, माझ्या बाबांबरोबर अजून चौघेजण असतात""

""मग आम्ही आहोत की चौघेजण""

""कोण कोण"

""सीमे, मी स्वत:हा सुबाण्या,राजू,आणि..कोण""

""अन्या अजून सरू,आणि निलू,चालेल""

""हो"चला तर मग,सूरू करूया""

"अरे थांब "

"""का?आता काय झाल!""

अजून एक शिपाई हवा जो सर्वाना कर्ण्या ,रम्याच भांडण सांगनारा""

""असही असत""

""हो मग तूला जस काही माहीतच नाही.""

""खरच नाही माहीत""

""बर मग आता समजल ना !मग सहावा शिपाई कोणाला बनवू या""

""आडीया"

"कसली आयडीया ,सुचली ,तूला""

""आपण या मदण्याला शिपाई बनवू,काय रे मदन्या ,बनशिल ना शिपाई!""

"ये अन्या मी शिपाई नाही बननार मला की नाही विमान चालवनारा पायलट बनायच आहे""

""मेला, पायलट बनतो! सायकल चालवताना खाली पडतो, ती आधी शिकलास नाही.आणि म्हणे मी पायलट बनार""

मधीच सुबाण्यान नाक खुपसल.""

""सुबाण्या मी लहान आहे ,म्हणून आता पडतो,मोठा झाल्यावर पडनार नाही समजल,"""

"""बर मदन आता पुरता शिपाई बन मग मोठा झाला की,पायलट बन""

""अन्या नाही म्हणजे नाही""

""तू माझा मित्र ना!मग बन ना शिपाई""

""अन्या नाही हा! मी शिपाई नाही बननार,काल माझे तात्या बोलले,मदण्या अभ्यास कर नाहीतर कुठल्या तरी कचेरीचा शिपाई बनायला लागेल,काल ते बोलले आणि आज तू मला शिपाई बनायला सांगतो,मला जमनार नाही,आणि तात्या म्हणतील लहानपणीच शिपाई बनलास,""

"""ये मदण्या भाव का खातो बन शिपाई,आणि तुझ्या तात्याला कळनारही नाही""

राजूने मधीच आपल ज्ञानाचा वापर केला..

""राजू तू बन की मग""

""मदण्या तूला बनायला सांगितल ना!मग तूच बन""

""तूला बोलायलाच जमत""

""अन्या ह्याच आता अती होतय""

""राजू अती नाही तो बरोबर बोलतो हो की नाही रे मदण्या""

अन्याने आपली बाजू घेतल्याने मदण्याला आनंद झाला तो पटकन म्हणाला..

""अन्या मी बनतो शिपाई,!काय करायत बोल"

""तस फारस काही नाही तू फक्त ते म्हादू काका शिपाई बनून या इथ बोलताना तू ऐकलय ना! तेच बोलायच, मधीच सुमेने तोंड उघडल..

""सुमे ठीक आहे..चल मी बोलू ""

""हो पण मी आधी सांगतो सर्वाना व्यवस्थीत बसायला सांगतो""

""हा अन्या तू सांग बर पटपट बसायला सर्वांना""

सर्वजण बसल्यावर शिपाई बनलेल्या मदनने आरोळी दिली..

ऐका,,हो...ऐका""

""ऐकतो तू पुढच बोल ""

सितलने कान फुसी केली..तीकडे लक्ष न देता मदण पूढे म्हणाला..

"""आज आपण इथ का जमलो माहीत आहे का""

 ""हो... "

सर्व मुलानी तालासुरात हो म्हटलेल पाहून मदन पूढे म्हणाला..

""तुम्हाला माहीत आहे ना, असच बोलायच असत.हो की नाही रे राजू""

"""हो हो वर्गात कविता शिकवून झाल्या वर बाई नाही का? म्हणत कुणा कुणाला कविता समजली,तसच हे"""

""होय रे होय तुला बर आठवल" 

सुबाण्यान तोंड उघडल ,

""मला बरोबर कळते,मदण्या पूढच बोल""

तसा मदण्या पून्हा पूढे सरसावून मान वर करत म्हणाला..

""हा तर मी कूठे होतो"

त्याला पूढे बोलू न देता सरू म्हणाली...

""तू या वेळी चावडीवर आहेस""

अस सरू बोलायला आणि जमलेल्या मुलांत हश्या पिकला, शेवटी अन्या म्हणाला ..

ये सर्वजन आता गप बसा मदण्या तू सूरवात कर""

मदण्या पूढे पून्हा एखदा सरसावला आणि त्याने सांगायला सूरवात केली..

""ऐका हो ऐका आज कर्ण्या,आणि,रम्यात झालेल भांडण आपण सोडवायला जमलो आहोत..या ठिकाणी पंच म्हणून अन्या,सुबाण्या,राजू,सरू,आणि निलाची निवड केली गेली आहे...

आजचा विषय रम्या,कर्ण्या यांच काल आपसात भांडण झाले ,भांडणाच कारण समजल नसल तरी ,त्यानी एकमेकांची शर्ट फाडली..

""ये मदण्या आम्ही शर्ट फाडलेली नाही ,हो की नाही रे रम्या""

""हो हो अन्या तुला सांगतो हा मदण्या खोट बोलतो""

""खोट बोलत नाही.पण अस सांगायच असत"""

""मदण्या तू खोट सांगतोस ते मान्य नाही..""

""रम्या तुझ बरोबर आहे..पूढे बोल रे मदण्या""

सीमा वैतागत बोलली

""सीमे तूच का? नाही मग शिपाई झालीस""

""मदण्या तूला वेढ लागल होय रे!मी सरपंच पाटलांची मुलगी आहे मी शिपाई कशी बनू""

""का?मग मीही तात्या दशमुखांचा मुलगा आहे,पण बनलो ना शिपाई""

""पण तुझे तात्या सरपंच नाही ना""

"तर काय झाल""

""सुबाण्या ह्याला समजव नाही तर""

""नाही तर काय करशिल ग सीमे""

""मी तुझ टकल फोडीन""

""हो ते काय वाटेवर पडलय""

""मदण्या सीमा शांतता घ्या आणि कामाला सूरवात करा""

""निले तू तेच सांगनार !तूला नाही बेलला ना तो मग तेच म्हणनार तू""

""पण मी काही केल नाही तर मला मदण्या बोलेलच कसा""

""निलू तुझ बरोबर आहे""

चावडी वर आप आपसातच वाद डोक वर काडू लागताच अन्या मधीच ऊठून ऊभा राहत म्हनाला..

"""ये सर्वजन गप्प बसा आणि मदण्या तू तूझ काम कर...

चावडीवर मुल जमली खरी पण एकमेकावर आरोप करताना पाहून रम्या आणि कर्ण्या वैतागले होते..आता ईथ थांबायच नाही असा विचार करूण ते उठले आणि म्हनाले

""तुम्ही बसा भाडंत आम्ही चाललो घरी चल रे मदण्या""

दोघे हातात घालून जायच्या तयारीत असताना अनिल ने त्यना अडवत विचारले

""तुम्ही कूठे निघालात""

""घरी""

""मग आम्ही ईथे कुणासाठी जमलो""

""ते आम्हाला काय माहीत""

""अरे तुमची भांडण सोडवायला ना""

""पण आम्ही सांगितल का आमची भांडण सोडवा म्हणून""

""मग हे काल का नाही बोललात""

""आम्ही म्हणालो ना येनार नाही.""

""हो पण मग आता""

""आता काय आम्ही जातो""

""निवाडा कुणाचा करायचा""

""तुमचा आपआपसात जे मघासपासून भांडता त्याचा करा""

""पण आपआपसात भांडण कुणामुळे होतात""

""साहजीकच तुमच्या मुळे""

""तरीही त्याचा मेन कारणी भूत कोण""

""पण आम्ही नाही""

""मग कोण ?आम्ही सर्व मुले जी तूमच्यासाठी जमली""

""आम्हाला काय माहीत""

""हो का मग आता ऐका तुम्ही दोघांनी""

आणि अन्यासर्व मुलांना उद्देशून म्हणाला

"""ऐका आज पासून आपण सर्वानी रम्या,व कर्ण्य़ाशी बोलायच नाही..

"""का?

सर्व मुलानी एका दमात विचारल

""हे दोघ म्हणतात की याना आपण जबर दस्ती करून इथ बोलवल आहे..म्हनून आपली चुक झाली की आपण यांना मित्र समजून बेलवल त्या मुळे,मी तुमच्या सर्वाच्या वतीने या दोघांची माफी मागून यांच्या कुठल्याही भांडणात कुणीही पडनार नाही अशी हमी देवून आपण सर्व घरी जावू कस""

""अगदी एक नंबर अन्या तू तर न्याय देवूनही मोकळा झालास आणि तो आम्हा सर्वांना पटला हो ना ""

""हो सुबाण्या तूही बिनचूक बोललास""

""सीमे या पूढे आपल्याला ही चावडी नको आपली शाळा बरी""

""हो सुबाण्या माझ्याच चुकी मुळे हे सर्व झाल मीच या अन्याला उसकवल माफ कर अन्या""

"सीमे माफी कसली मागते आपण सारे मित्र ना मग माफी मागायची नाही ""

""अन्या सुबाण्या,आम्हालाही माफ करा आम्ही आपआपसास भांडण करनार नाही..

"रम्या,कर्ण्या,माफी नका मागू तुम्ही परंतू आपली सर्वाची चुकी आपण सर्वानी मान्य केली..की नाही..मग संपल चला जावू घरी..

मुलांची बुद्धीमत्ता पाहून आता चावडी ही मुकी झाली होती....


Rate this content
Log in