Tukaram Biradar

Children Stories Others

3  

Tukaram Biradar

Children Stories Others

चांगली सवय

चांगली सवय

2 mins
363


एक खेडेगाव होते. त्या गावात सखाराम नावाचा शेतकरी राहत होता. सखाराम खुप मेहनती आणि कष्टाळू शेतकरी होता. तो एक इमानदार शेतकरी असून काम हेच देव समजून वागायचा. गावात पण लोक त्याला प्रामाणिकपणे काम केलेले पैसे देत.

     अशातच त्याची पत्नी चे निधन झाले. तो फार दु:खी झाला. त्याला चार मुले होती. पत्नी च्या निधनानंतर तो चारही मुलांचे शिक्षण पूर्ण केले. आणि त्यांना कशाचीही कमी जाणवू दिली नाही. परंतु त्याची चारही मुले आळशी व सतत एकमेकांशी मांडणारी होती. त्या चौघाचेही एकमेकांशी पटत नव्हते.

      त्यांच्या अशा वागण्याने तो शेतकरी फार चिंतेत होते   ते  चारही मुले काहीही काम धंदा करीत नव्हते. सतत भांडखोर वृत्ती होती. तो शेतकरी त्यांना समजावून सांगता-सांगता कंटाळून गेला होता. काय करावे हे त्याला समजत नव्हते. एके दिवशी तो शेतकरी आजारी पडला.आपल्या नंतर आपल्या मुलांचे कसे होईल याबाबत तो सतत चिंतेत असायचा.

     आपल्या या भांडखोर मुलांना सुधारण्यासाठी एक युक्ती केली. ती म्हणजे दोन गायी घेतला ती गायी एकमेकींना सोडून राहत नव्हते. एक गाय एकीकडे गेली की लागलीच दुसरी गाय तिच्या पाठीमागे पळत - पळत जात असे. एकीला दुसऱ्या गायींना मारत असतील तर लगेच दुसरी गाय तिच्या मदतीला जात. तेव्हा तो शेतकरी आपल्या मुलांना घेऊन आणि त्या दोन गायी पण घेऊन शेतात गेला. तेव्हा ते गायी चरत चरत दुसऱ्या गायी कडे गेल्या.

      तेव्हा त्या कळपातील गायी या एका गायींना मारत होत्या. तर लगेच दुसरी गाय पळत जाऊन त्या मारणाऱ्या गायीना मारावयास गेली. ही दृश्य त्या मुलांनी पाहीले. तेव्हा त्या मुलाना आपली चूक कळली.

      तेव्हा ते मुले आपल्या वडिलांच्या पाया पडले. आमचे चुकले, आम्हाल माफ करा. आम्ही भाऊ मिळून राहतो. आपसात भांडण करणार नाही. म्हणून ते चौघेही एकमेकांशी हातात हात घालून उभे होते. 


Rate this content
Log in