चांगले जीवन
चांगले जीवन
जीवनात यशस्वी प्रत्येकाला व्हायचे आहे. आणि यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाला सोपा मार्ग हवा असतो. उत्कर्ष आणि उन्नती करायची आहे. हे यशस्वी होण्याची दोन चाके आहेत. अशा वेळी काही गोष्टी पाळल्या पाहीजेत.
चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत. यात योग्य प्रमाणात आहार घेतला पाहिजे, संतुलित आहार घेतला पाहिजे, पचेल तेवढेच खाणे हे प्रत्येकाने दररोज पाळले पाहिजे. उत्तम आहारामुळे आपले आरोग्य चांगले राहते. दररोज व्यायाम करणे, व्यायामामुळे शरीराची ठेवण चांगली असते व आपले शरीर निरोगी राहते.
योगासने, चालणे हे उत्तम आहे. लवकर झोपा आणि लवकर ऊठा.दररोज आठ तास झोप आवश्यक असते. व्यसनापासून दूर राहणे, व्यसनामुळे आयुष्य कमी होते. व्यसन हे शरीराला घातक आहे. भौतिक सुखापेक्षा शारिरीक सुख महत्त्वाचे असते. चांगल्या संगतीत राहणे, चांगल्या सवयी लावून घेणे. डोकं कायम शांत ठेवणे आवश्यक आहे.
कमी बोला, लवकर बोला, भरपूर ऐका. नेहमी सकारात्मक रहा. , इतरांवर अन्याय होणार नाही असे वागणे योग्य आहे. जीवन एकदाच मिळते. त्याचा चांगला उपयोग करणे आवश्यक आहे. चांगले राहणे, उच्च विचार करणे हे केव्हाही चांगले आहे. ज्या ंचे विचार चांगले तो माणूस चांगला. आणि ज्यांचे विचार वाईट त्याला चांगले वागणे जमणार नाही. तो सतत वाईटच वागतो.
