चांगला कोण, वाईट कोण?
चांगला कोण, वाईट कोण?
आज आपण ज्या युगात वावरतो. त्यामुळे असे म्हणतात की चांगुलपणावर अनेकांचा विश्वासच बसत नाही. समाजात, राजकारणात, विविध सामाजिक क्षेत्रात अनेक चांगले प्रामाणिक, इमानदार आणि सचोटीने व्यवसाय करणारे लोक, अधिकारी, नेते आपल्या भोवती असतात. परंतु आपल्याला त्यांच्या चांगल्या माणसाला, चांगल्या कामाला सुध्दा दोष देत बसायची सवय लागली आहे. चांगले कोण हे ओळखणे आता अवघड होऊ लागले आहे. अशा वेळेला जीवनाच्या काही क्षेत्रात प्रामाणिक पणे काम करणाऱ्या माणसाची फार मोठी अडचण होते. अनेक वेळेला जी चांगली आणि प्रामाणिक माणसं, नेते आहेत ते कधीही आपण चांगले आहोत असे स्वतः च्या तोंडाने सांगत नाहीत. अशा वेळेला समाजातील काही निरीक्षकांनी चांगले कोण, वाईट कोण याचा शोध घेतलाच पाहिजे आणि तुलनेत कोण चांगले, कोण वाईट याचा शोध घेऊन चांगल्या माणसाला, नेत्याला पाठबळ मिळेल अशा प्रकारचे वक्तव्य, काम करणे आज गरजेचे आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे कोणता नेता, पुढारी यांनी वामन मार्गााने मिळविलेल्या पशाच्या जोरावर आपली स्तुती करणाऱ्या कार्यकर्ते यांना वाटून देतो. व उरलेले आणि वाम मार्गाने मिळविलेलेे पैसा व धन आपले खिसे भरतो. त्याला समाजाचे काही देेेेेणंघेणंं नसते. जनतेेला अनेक भुलथापा देऊन
आपले काम सधतो. त्ययााला कोण चांंगलेे म्हणते.
समाजात काही दुष्ट प्रवृतीचे लोक दुसऱ्यावर आरोप करण््यातच आणि दुुसरा
कसा दोषी आहे हे दाखवण्यातच आपला. दिवसभराचा वेळ खर्च करत असतात. परंतु अशा लोकांनी लक्षात ठेवण््याची गरज आहे की जेव्हा एखाद्याकडे तो दोषी आहे म्हणून एक बोट दाखवतो तेव्हा आपल्या दिशेने तीन बोटे आपण वाईट आहोत हे दाखवून देतात. म्हणून दुसऱ्या चे दोष दाखवण्यापेक्षा स्वत:त कोणते दोष आहेत याचा शोध प्रत्येकानी घेतला पाहिजे.
