भय इथले संपत नाही
भय इथले संपत नाही
समाजातील एका गंभीर आणि ज्वलंत विषय पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. पुन्हा एकदा सहानुभूती व हळहळ व्यक्त झाली.पुन्हा त्याच चर्चेला उधाण आलं. वर्तमानपत्रातून आणि मिडीयामध्ये खळबळ माजली.मेणबत्त्या जळल्या.साहित्यिकांनी नव्या जोमाने ह्रदय पिळवटून लिखाणाला धार दिली.पोलीस यंत्रणा अजूनच चौकस झाली.आज ही परिस्थिती समाजात कशी आली ही बलात्कार का होत आहे त्यांची मानसिकता काय आहे. काय कारणे आहेत हे आधी तपासून बघितले पाहिजे. या साऱ्या गोष्टीची मिंमासा झाली पाहिजे आपण सर्व एक दूसऱ्याला दोष देत असतो ही गोष्ट योग्य नाही. पाठीत खंजीर खुपसणार्यांची इथे कमी नाही मागून हल्ला करणारे खूप आहेत .आज स्त्रीदेह म्हणजे भोगवस्तु समजणारे वासनेने बरबटलेले .विकृत मानसिकतेने पछाडलेले वेडपट व्याभिचारी चहूकडे फिरतांना दिसतात. रानटी पशु ही दयाद्र असतात त्यापेक्षा जास्त हिंस्त्र पशूसारखे वागणारे मानव जातीला कलंकित करणारे मोकाट नराधमांचा जन्म होतो आहे.
स्त्रीचा सन्मान हास्यास्पद वाटून तो पावलोपावली समाजात दिसतो आहे.स्त्रियांना या गोष्टीची पूर्णपणे जानिव आहे तरी त्या चूपचाप सहन करतात आहे. महिलांना व मुलीना बाहेर जावून कामे करावी लागते. एकविसाव्या शतकात फार मोठ्या प्रमाणावर परिवर्तन झाले महिला शिक्षण घेऊन शिक्षित झाल्या पुरूषांच्या बरोबरीने शिक्षण घेऊन सर्वच क्षेत्रात त्या जोमाने भरीव कार्य करीत आहेत. परिणामी त्यांना शिक्षणासाठी किंवा जॉबसाठी बाहेरगावी ऐकटीला राहावे लागते प्रवास करावा लागतो, ती कितीही निडर असली तरी एका वेळी अनेक पुरूषांसोबत लढू शकत नाही व कोणतेच साधने उपयोगी पडत नाही आणि ती त्यांच्या अत्याचाराला बळी पडते.हा क्रुरपणा,अमाणूषपणा किती मोठ्या प्रमानावर पण तरीही काही लोक हे स्त्रीलाच नावे ठेववतात. सतत त्यांच्या कपड्यांवर तर मेकअप रात्री एकटं निघण्यावर वाच्यता होत असते. ती काही विणाकारन बाहेर जाणार आहे काय ? कित्येक महिलांनी कौटुंबिक धूरा आपल्या खांद्यावर घेतलेली आहे.त्यामूळे आवश्यकतेनुसार नाईलाजास्तव व्यावसायिक गरजेने कधी इतर अनेक कारणांमुळे कधीतरी रात्री अपरात्री बाहेर पडण्याची वेळ येते. परंतु या घटना रात्रीच घडतात का? कधी बलात्कार दिवसाढवळ्याही होण्याच्या घटना आहेत. शाळा कॉलेज ट्युशन या प्रकाशातच असतात.त्यात कित्येक निरागस मुली बळी पडल्या आहेत. कुठेही कधीही शरीराचे लटके तोडणाऱ्यांची कमी नाही. तरी समाज स्त्रियांचा बाळकडू पाजत असते आणि त्यांचा आत्मविश्वास ढासळण्याचा प्रयत्न करीत असतो.
स्त्रीच्या अध:पतनासाठी,असुरक्षिततेच्या भीतीपोटी त्या घरीच बसणार आहेत काय? तिच्या प्रगतीमागे या सर्व गोष्टी बाधक ठरतात. आणि बलात्कार करणारे निर्बुद्धी जनावरं आहेत त्याना ठेचून काढायला पाहिजे. यांना मन बुद्धी नसतेच मुळी फक्त नरपशू म्हणायला हरकत नाही.वासनेची धुंदी चढलेली वाह्यात कार्टी, सभ्यता, मानवता,भावना,संवेदना,आदर या गोष्टीचा त्याच्या जीवनात काहीच अर्थ नाही. मुलगी सामाजात खरच सुरक्षीत आहे काय? छोट्या बालीकेपासून तर म्हातारी वृध्द असो या वासनेच्या हव्यासाने बरबटलेले नराधम टपूनच असतात. म्हणुन स्त्रीजातीला पर्यायाने वावरतांना भितीने ग्रासले आहे.आपल्या देशात ही गुंड प्रवृती मोठ्या प्रमाणात दिसते आहे. यासाठी मानसिकतेला काहीतरी प्रतिबंध घालायला ह
वा आज लेकीबाळी चे जीवन धोक्यात आणि शासकीय यंत्रणा बेमालूम कुचकामी ठरत आहे.
आताचीच घटना एका डॉक्टर मुलीवर सामुहिक बलात्कार करून तिला जिंवत जाळून मारूनच टाकले.ती बातमी थंड होत नाही तोच दूसरी यु.पी.ची घटना घडली
कामातुर वासनेची भुक शमवण्यासाठी तिचे लचके तोडण्यासाठी तिच्या मागे लागले. प्रतिकार करूनही मागे लागले. पेट्रोल टाकून जाळल्यावरही केला.जीवाच्या आंकाताने तब्बल 1 किलोमीटर ती धावली. पोलीसांना कॉल केला ती खरच वीरांगना आहे.परंतू आज ती मरनासन्न अवस्थेत आहे नव्वद टक्के जळलेली आहे.हे सर्व ऐकून पाहून मनबुद्धी कशी सुन्न झाली आहे. स्त्रीत्वाचा अमानूषपणे छळ करून तिला जिवंत जाळणे या कल्पनेनेच अंगावर काटा उभा राहातो. काय बोलावं आणि किती बोलावं या गोष्टीवर एक दिवस ही लोटत नाही तोच स्त्रीजातीवर अन्याय होतो. महिला व मुलिंच्या सुरक्षीतेचा प्रश्न कधीच मिटणार नाही.तो सतत गटांगळ्याच खात अाहे. कित्येक निर्भयावरील अत्याचाराला बळी पडते आहे.ही खुपच विदारक बाब आहे. हे आमचं विद्रुप आदर्शहिन समाजाचे वास्तव पुर्ण जगात जाहिर होतो आहे.ही मोठी लज्जास्पद गोष्ट आहे.
इथले गचाळ राजकारण आणि कायद्याचा कित्येक वर्षानुवर्ष चालत असलेले खटले चालवून सबूता अभावी जीवंत असूनही स्त्रीजातीला मरनासन्न वेदनेला बदनामीला सामोरे जावे लागत अाहे.हा समाज बलात्कार होणाऱ्या स्त्रीसोबत विक्षिप्तासारखा वागत असतो. ही लाज्जास्पद बाब आहे.कोणत्या वाटेनेही स्त्री सुरक्षित नाही तिचे भविष्य अंधकारातच आहे.ती अख्ख आयुष्य कोणत्यातरी अघटित घटनेने भित भितच मरत असते.
आता हे चित्र बदललेच पाहिजे ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे माणुसकीला काळीमा लावणार्या नराधमांना,गुन्हेगारांना भरचौकात सर्वांसमोर जिवंत जाळले पाहिजे.जिवंत जळण्याचा अनुभव त्यांना आलाच पाहिजे. महिला,मुलींनी भविष्यासाठी आता शासनानेच काळजी घेतली पाहिजे.त्यासाठी सुरक्षाकवच मजबूत करून देशाची बदनामी होण्यापासून परावृत्त व्हायला हवे आहे. पाश्चिमात्य देशाचे उदाहरण बघा त्यांचे कमी कपड्यातले जीवन तरी किती सुरक्षित असते.काहीजन अनावृत्त असतात तिथे कधी ऐकण्यात येत नाही की रेप झालेला आहे.मग तिथले जीवन काय वाइट आहे आणि त्याविरूद्ध इथल्या पडदा पद्धतीमुळे डोळ्यावर पडदा टाकला आहे. पडद्याच्या आत ही नजरेने क्षणोक्षणी बलात्कार होतात. किती भयंकर स्थिती आहे.याला जर सभ्य समाज म्हंटले तर त्यापेक्षा पाश्चिमात्य देशाची अनावृत्त सभ्यता काय वाइट आहे अस म्हणावयास हरकत नाही.तसेच जी वस्तू झाकून असते ती बघण्याची प्रवृती बळावत असते. भारतातिल बलात्कार त्याचे तर परीणाम नाही ना?
मी हां आर्टिकल लिहीतच होते की तेव्हाच एॅन्काऊंटची बातमी कानावर आली मनात कसं धस्स झालं हे काय अचानक एॅन्काऊंटर मध्ये चारही बलात्कारी एकाएक मारून टाकण्यात आले त्या बलात्काऱ्यांना नराधमांना इतकी स्वस्त सजा मिळाली, इतक्या सोप्या व स्वस्त रितीने त्यांना संपवण्यात आले आहे. आणि ' दिशा ' ला जाळल्याने किती वेदना झाल्या असतील, ही गोष्ट मनाला पटणारी नव्हती, यावर बघूया काय वाच्यता होईल.अशी अचानक मौत मारल्याने गुंडांवर वचक बसेल का थोडी तरी,पुन्हा अशी पुनरावृत्ती नकोशी वाटून मनाची दुविधा स्थिती झाली आहे.