The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

SWATI WAKTE

Children Stories Thriller Others

4.1  

SWATI WAKTE

Children Stories Thriller Others

भुताशी गप्पा

भुताशी गप्पा

5 mins
83


जुही एक दहा वर्षाची मुलगी.. ती खूप घाबरट असते.. तिला कुणीही शाळेत मित्र-मैत्रिणी नसतात.. ती एकटी शाळेत जाते.. शिकवलेले समजले की वर्गात उत्तरही देते.. आणि नाही समजले तर सोडून देते, पण कुणाला विचारत नाही.. ती स्वतःच्या जगातच असते.. ती स्वतःच्याच जगात वावरते.. दोन दिवसांनी रोज रात्री झोपेतून उठते आणि दुसऱ्या खोलीत झोपेतच चालत जाते आणि कुणी सोबत असल्यासारखी एकटीच खेळते, हसते आणि तिथेच झोपी जाते.. तिचे आई-बाबा बघतात की ही रात्री दुसऱ्या जागी झोपली होती आणि आता इथे कशी आली त्यांना वाटते की हिला झोपेत चालण्याची सवय आहे जशी खूप लोकांना असते.. 


एकदा अशीच रात्री झोपेत दुसऱ्या खोलीत जायला निघते तेव्हा तिच्या आईला झोप आलेली नसते तेव्हा काहीतरी चाहूल येते म्हणून उठून बघते तर जुही झोपेत चालत असते.. ती काय करते हे बघण्यासाठी आई तिला टोकत नाही तिचा पाठलाग करते.. आणि तिचे निरीक्षण करते.. जुही झोपेतच तिच्या तंद्रीत दुसऱ्या खोलीत जाते व तिथे जाऊन खूप खुश हाय वगैरे करून कुणीतरी समोर असल्यासारखी गप्पा मारते..


ती म्हणते, तुला माहित आहे आज ना शाळेत मॅमनी एक प्रश्न विचारला त्याचे उत्तर कुणालाच येत नव्हते.. फक्त मला आले तर मॅमनी माझे खूप कौतुक केले.. मला ना खूप छान वाटले म्हणून सांगू की सर्व मुले जणू मला jealous होत आहेत असे वाटले.. आणि ही गोष्ट कधी तुझ्यासोबत share करते असे मला झाले होते... आई हे सर्व बघत असते.. तिला भिती वाटते इथे तर कुणीच नाही ही मुलगी एवढी कुणाशी बोलत आहे.. पण जुही दुसऱ्या रूममध्ये जाऊन कशी झोपते याच्या खोलात जाण्यासाठी ती जुहीला टोकत नाही पण बघते..


जुही परत बोलते आज आपण काय खेळायचे गं.... चल ल्युडो खेळू या असे करून तिचा ल्युडो काढून खेळू लागते.. पण आता आईला राहावत नाही म्हणून आई जुहीजवळ जाते आणि म्हणते.. जुही बेटा.. जुही आपल्याच तंद्रीत असते... ती जुईला हलवते तेव्हा जुही कुणाशी बोलत आहे.. जुही भानावर येते आणि म्हणते, कुणाशीच नाही गं आई झोपू दे ना.. मी तर झोपले होते.. आई म्हणते, अगं हो बेटा पण तू इथे काय करतेस.. तेवढ्यात जुही तिथेच आडवी पडते आणि लगेच झोपी जाते.. आई तिला उचलून जागेवर टाकते.. आणि तिच्या आईला खूप काळजी वाटते की मुलगी कुणाशी बोलत असेल.. ती जुहीला जागेवर टाकल्यावर जुहीच्या बाबांना झालेला प्रकार सांगते तर तिचे बाबा म्हणतात, अगं काही नाही गं मुले दिवसभर जे करतात तेच रात्री झोपेत करतात. आणि आता तू झोप काळजी नको करुस. असे म्हणून झोपी जातात. पण जुहीच्या आईला झोप लागत नाही..


दुसऱ्या सकाळी उठल्यावर तिची आई जुहीला विचारते.. जुही बेटा रात्री दुसऱ्या रूममध्ये जाऊन कुणाशी गप्पा मारत होती.. जुही आश्चर्याने विचारते, मी आणि दुसऱ्या रूममध्ये गप्पा छे.. मी तर झोपली होती... काहीही बोलतेस आई तू.. आईला समजते हिला काही आठवत नाही.. पण त्या दिवशीपासून आईची रात्रीची झोप उथळच असते.. जरा जरी चाहूल लागली तरी उठून बघते.. त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी जुही दुसऱ्या रूममध्ये जाते तर आज जुही रडत असते, जसे तिच्या समोर कुणी आहे..


ती सांगते, अगं आज मी खूप दुःखी आहे.. मला drawingच्या सरांनी एक चित्र काढायला सांगितले तर मला ते आले नाही म्हणून मला खुू वाईट वाटते.. सर्वांनी सुंदर drawing काढले पण मलाच आले नाही.. मला सर काही बोलले नाही पण त्यांना काय वाटेल किती मठ्ठ आहे ही मुलगी.. सरांच्या नजरेत माझी image च खराब झाली, असे म्हणून फुंदसू फुंदसू रडू लागली.. आईकडून बघवल्या नाही गेले म्हणून ती तिला जवळ घेऊन काही न बोलता घेऊन गेली..


दुसऱ्या दिवशी झोपेतून उठल्यावर तिने जुहीला, काय गं काल तुला drawing आले नाही का class मध्ये.. जुही आश्चर्याने विचारत होती. तुला कसे माहित? अगं तुच दुसऱ्या रूममध्ये जाऊन रडत होती.. जुही म्हणते, छे गं मी कशाला रडणार त्यासाठी.. मला काहीही आठवत नाही.. असे दर दोन-तीन दिवसांनी जुही झोपेत दुसऱ्या रूममध्ये जाऊन गप्पा मारत होती.. तिच्या आईने एक-दोनदा तिच्या बाबांनाही उठवून दाखवले.. आता त्यांनाही काळजी वाटायला लागली.. कारण जुहीला काही विचारणार तर तिला तेव्हाच्या तेव्हा उठवूनदेखील काहीच आठवत नव्हते.. त्यामुळे जुही अशी का करते हे शोधून काढणे कठीण होते..


जुहीची आई या विषयावर तिच्या आईशी बोलते तर तिची आई सांगते की बापरे जुहीला बहुतेक भुताने झपाटले असेल.. ती भुताशी गप्पा मारत असेल.. तिला एखाद्या मांत्रिकाला दाखव.. पण जुहीच्या आई-बाबांचा मांत्रिकांवर विश्वास नसतो तेव्हा जुहीच्या आईच्या लक्षात येते की तिची एक मैत्रीण मानसोपचार तज्ज्ञ आहे तिच्याशी बोलून बघू.. तेव्हा ती फोनवर तिच्याशी बोलते.. तेव्हा ती मानसोपचार तज्ज्ञ म्हणते की, तू तिला माझ्याकडे घेऊन ये.. मी बघते काय आहे ते... जुहीची आई तिला आपण माझ्या एका मैत्रिणीकडे जाणार आहोत.. ती तुला जे विचारेल ना त्याची नीट उत्तर दे.. असे सांगते..


जुहीची आई तिला घेऊन जाते.. डॉक्टर तिला हाय करतात तर ती भीत भीत त्यांना हाय करते.. ती अत्यंत घाबरट मुलगी असते, जिला बिलकुल आत्मविश्वास नाही, असे त्या डॉक्टरला समजते.. तेव्हा ती हळूहळू जुहीला confidence मध्ये घेऊन आधी तिच्याशी मैत्री करते.. तर डॉक्टरला कळते जुहीला कुणीही मित्र-मैत्रिणी नसतात.. एकटेपणा घालवण्यासाठी रात्री काल्पनिक मैत्रिणीसोबत ती खेळते.. आणि हळूहळू डॉक्टरच्या हेही लक्षात येते की तिचा confidence कमी व्हायला तिची नकळत आईच जबाबदार आहे.. तिची आई तिला सारखी लहानपणी मागे लागते की अगं अशी कशाला बोलतेस तुला लोक हसतील, जोराने रडली तर म्हणते बघ लोक हसत आहे एवढी मोठी मुलगी रडते.. त्यामुळे तिचा बाहेर वावरण्याचा पूर्ण आत्मविश्वास गेला आणि ती कुणाशीच बोलत नाही.. त्यामुळे रात्री ती आपल्या काल्पनिक मैत्रिणीबरोबर खेळते.. 


हे ऐकून तिच्या आईला खुप वाईट वाटते.. यातून तिला बाहेर कसे काढायचे, हे विचारते तर डॉक्टर तिला सांगतात की, तू योग्यवेळी माझ्याकडे आली.. नाहीतर मोठे झाल्यावर हिला खूप प्रॉब्लेम फेस करावे लागले असते.. कदाचित डिप्रेशनमध्ये जाऊन काही बरे-वाईटही केले असते... नकळत जी तू चूक केली ती तुच सुधारू शकते.. तिची चांगली मैत्रीण हो.. तिच्या पूर्ण अभ्यासाकडे लक्ष दे जेणेकरून जेव्हा शिक्षक तिला विचारतील तेव्हा ती तयार असेल.. आणि हळूहळू तिची स्तुती ऐकून तिचा कॉन्फिडन्स परत येईल... 


जुहीची आई डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे तिचा शाळेच्या आधी अभ्यास पूर्ण करून घेते.. तिची मैत्रीण बनून सर्व तिला दिवसभरातील गोष्टी विचारते.. जुहीचा आधीच अभ्यास पूर्ण झाल्यामुळं सर्व शाळेतील शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तिला आधीच येतात... आणि सर्व शिक्षक तिचे कौतुक करतात.. हळूहळू मुलेही तिला मदत मागतात.. त्यामुळे जुहीचे वर्गात सर्व मुले मित्र होतात.. आणि जुहीचे रात्रीचे दुसऱ्या रूममध्ये चालत जाऊन भूतांशी गप्पा बंद होतात...


Rate this content
Log in