भटके विमुक्त
भटके विमुक्त
आपल्या भारतात भटक्या विमुक्त जातींची मोठी संख्या आहे. हे लोक कोणत्याही गावात, वस्तीत कधी कायमस्वरूपी ठिकाण करून रहात नाहीत. त्यांना घरदार, शेतीबाडी नाही. घोडयावर त्यांचा संसार थाटला असतो. एका गावाबाहेर ठिकाणी घर करून ते काही महिने तेथे राहतात. तेथून ते आपले काम संपले की ती वस्ती सोडून दुसऱ्या गावात जातात. त्यांच्याकडे भारतीय नागरिक असल्याचा काही पुरावा नाही. आधाराचा आधार नाही. कुणाचा आधार घ्यायलाही ते पसंत करत नाहीत. एक-दोन शेळ्या व इतर पशू आणि प्रवासासाठी घोडे त्यांचे स्वतःचे असतात. त्यावरच त्यांचा भटकंतीचा प्रवास सुरू असतो. शासन, प्रशासन यांच्याशी त्यांचे काहीही देणंघेणं नाही. शासनावर, शासनाच्या तिजोरीवर त्यांच्या जगण्याचा, उदरनिर्वाहाचा काहीच बोजा नसतो. देशात कोणते सरकार, कोणाचे राज्य आहे, त्यांचे लोकशाहीत काय स्थान आहे, मत देण्याचा त्यांनादेखील अधिकार आहे अशा शुल्लक बाबींशी त्यांचे काहीही संबंध नाही. कोणाचे सरकार आले, अन् कोणाचे सरकार गेले त्यांना काही देणंघेणं नाही. एका प्रकारे असे वाटते की त्यांच्यासमोर या देशाची व्यवस्था, त्यांचे अस्तीत्व या सगळ्या गोष्टी त्यांच्या ज्ञानापलीकडे म्हणजेच त्यांच्यासाठी नगण्य. ते स्वतः आत्मनिर्भर आहेत.कोणाचा आधार त्यांना नको आहे.
देशात भटक्या जमातीची दुसरी एक जमात आहे. ती राजकीय, राजकारणी भटक्या विमुक्तांची. ते या देशावर राज्य करीत आहेत. त्यांचा स्वतःचा कोणता म्हणजे त्यांच्या राजकीय विचारधारेचा कोणता पक्ष नसतो. त्यांंना राज्य करण्याची मंत्री बनून पैसा व सत्ता भोगण्याची आस लागलेली असते. अशा भटक्या विमुक्तांच्या दोन प्रकाराच््या जाती आहेत. एका जातीला सत्ता, राजकारण याचे काहीही देेणंघेणं नाही. अन् इथेच दुुसऱ्या भटक्या विमुक्तांचे पैसा व संपत्तीची लागलेली आहे. असे नमुने आज आपल्या देशात पहायला मिळत आहे.!!!.
