Meenakshi Kilawat

Others

2  

Meenakshi Kilawat

Others

भ्रष्टाचार हा महा भयंकर रोग"

भ्रष्टाचार हा महा भयंकर रोग"

4 mins
815


 आपल्या देशात भ्रष्टाचार हा महा भयंकर रोग सर्वत्र पसरला आहे. स्वातंत्र्य प्राप्तीच्या अवघ्या सत्तर वर्षात देशातून राष्ट्रभक्ती नामशेष राहिली आहे. आणि जिकडे तिकडे भ्रष्टाचाराने कहर केला आहे. हा भारतीय विनाशाचा संकेत असून, प्रामाणिकता, निती, इथे पसार होण्याच्या मार्गावर आहे, या देशासाठी कित्येक थोर पुरुषांनी जीवाच अग्नीहोत्र केलेले आहे. त्यांच आठवण करणे या नवीन पिढिला जड जाते आहे. आज आमच्या देशातील बालवर्ग आणि युवावर्ग एकच स्वप्नं बघत असतो.कमी वेळात गर्भ श्रीमंत कसे होता येईल आहे. कमीत कमी कष्ट करुन जास्तीत जास्त पैसा कसा मिळेल आहे.व इतर सुख सुविधा कश्या जुळवायच्या आहे.


   शेकडो सौंदर्य प्रसाधनांचा उपयोग करणे ,किंवा अनेक गाड्या बदलवणे, किंवा अनेक मोबाईल चेंज करणे, असे कित्येकच शौक आजच्या तरुण मंडळीमध्ये दिसून येतात, आणि या सर्व गोष्टिंचा त्यांच्या पॉकेट मनीवर किंवा मिळकतीवर घाला येतो.पैशाची कमी झाली की कोणत्याही प्रकारची चोरी करणे, गुन्हे करणे त्यातून मानसिक तणाव घेवून, नशा करणे वगैरे सुरु होतं असत.


   खर म्हणजे तरुण वर्गात किस्त वर मिळणाऱ्या वस्तूंच मोठ अप्रूप असते. हव्या त्या सर्व वस्तू बाजारात किस्त वर उपलब्ध अाहेत या सर्वांचा ते फायदा घेतात. त्यांना प्रत्येक वस्तूची घाई असते. विचार करायला त्यांना वेळच मिळत नाही. युवा पिढीच जग फार वेगळ असतं. त्यांची स्वप्न पण मोठी असतात.चार पैशे जवळ असले की, नानापरीने ती खर्च करतात. गाडी शिवाय त्यांना काहीच सुचत नाही. मोबाईलविना ती जगू शकत नाही. अश्या पुष्कळ वस्तू आहेत, की ज्यामुळे त्यांच कामच अडून जातय.


   हल्लीचीच गोष्ट आहे,आमच्या जवळचाच मुलगा होता. एकुलता एक त्याला एक बहीण पण होती, या मुलाने अवघ्या दहाव्या वर्षी मोबाईल घेवून मागीतला,नंतर इतर वस्तुंसाठी पण त्याची आईवडिलाकडे कुरबूर असायची. आईवडिलाचा तो फार लाडका होता. मामामामीचा लाडका होता. जर इकडे त्याला त्याच्या मनाच्या वस्तू नाही मिळाल्या तर, मामामामी कडे मागायचा. तसेही घरची परिस्थिती जेमतेमच होती


त्याचे वडिल नशा करायचे. दिवस रात्र दारु घेत असत, म्हणून आई त्याला जास्तितजास्त मामाकडे ठेवायची.जेंव्हा तो चौदा वर्षाचा होता तेंव्हा पासुन त्याने टू-व्हिलर घेण्यासाठी लकडा लावला . मामामामी त्याच्या आईला मधमधे मनीऑर्डर करायचे. बाबा जवळ तर पैशे नसायचे, तर मामाकडे गाडीसाठी तगादा लावायचा, मामाकडेच तो शिकायला पण होता. मामाने त्याच नाही ऐकल, ठाम शब्दात सांगितल होत की आधी शिक्षण पूर्ण कर नंतर गाडी घेवून देतो. शिक्षणात त्याच लक्ष नव्हतच मुळी, पास,नापास होता होता कसातरी अकरावीला कॉलेज मधे जायला लागला. तेंव्हा अजूनच त्याची शान वाढली. मामाला मुलगा नसल्यामुळे मामामामीला त्याचा फार लळा होता. त्यांनी त्याचे सर्व लाड पूर्ण केले, पण फक्त गाडीसाठी नकार दिला. मामा त्याला नेहमी समजवायचे. त्याला आईवडिलाच्या परिस्थितीची जाणीव द्यायचे.काही दिवस शांत रहायचा, पुन्हा त्याची कुरबूर सुरु व्हायची. 


         त्याला मामीने संगणकाचे क्लासेस लावून दिले. त्याला वेळ मिळू नये म्हणून पार्ट टाईम जॉब लावून दिला. को.आपरेटिव बँकेत. त्याच्या मामाने त्याला सांगितले आता तू मोठा झाला आहेस,आता आपल्या आईला तू मनीऑर्डर करायचा. पण त्याला ते पटल नाही तो स्वता:पुरताच विचार करायचा.आणि म्हणायचा! मी अजून लहान आहे. घरची जवाबदारी सांभाळण्या इतपत मी मोठा नाही झालो काही! माझा पैसा सध्या मी खर्च करणार! आधी गाडी घेणार नंतर पुढे पाहु काय करायच ते! माझ्यावर तुम्ही दडपण आणू नका,नाही तर मी इथे राहाणार नाही! मग काय त्याला कुणाची बोलायची हिम्मतच होईना. आणि बॅग भरुन जायला निघाला.


     आजीने मामामामीने विनवणी करुन जावू दिले नाही. तो फार वेगळा वागत होता.रात्री १/२ पर्यंत घराबाहेर राहायचा. त्यासाठी आजीने त्याला टोकले, मामाने पण त्याला प्रेमाने सांगितले .की तू दुसऱ्याचा मुलगा आहेस. तुझी जवाबदारी आमच्यावर आहे. तू असा का वागतो आहेस? तुझ्या मनात काय आहे ? दोन गोष्टी बोलून मामा बाहेर गेले. आणि पुन्हा त्याने आपली बॆग उचलली तशिच आजी अन् मामी काकूळतीस येवून त्याची विनवणी करु लागल्या.आजी म्हणाली अरे पोरा असा भरल्या ताटाला नको लाथ मारु नकोस रे! असा झिडकारुन जावू नको रे! पण तो आईकडे निघून गेला.सर्व घरात शांतता पसरली. सर्व दिलेल प्रेम वाया गेल होत.पदरी निराशा आली होती./ तासानंतर त्याच्या आईचा फोन आला पोहोचला म्हणून. 


    वरचेवर भरभर दिवस गेले तीन महिन्यानंतर राखीला तो आला. मामाच्या मुलीकडून राखी बांधली. तो आंनदात दिसत होता. गाडी घेतल्याची बातमी दिली. तिथेही पार्टटाईम जॉब लागली होती. त्याच्या आईने सांगितले होते दोन दिवस राहून तो गावी गेला. इकडे सर्वांना त्याचा आंनद पाहून आंनद झाला. काही दिवसानी फोन आला.त्याचा गाडीने अँक्सिडेंट झाला. डोक्याला मुका मार लागला होता. मोठ ऑप्रेशन झालय, १५/दिवस कोमात गेला, तो उठलाच नाही.८/९लाख खर्च झाला.तो वेगळा, सर्वात जास्त मामामामीला आघात पोहचला.त्याला आपल्या बाळासारख प्रेम केलेल होत. पण नियतिच्या मनात काय ते कुणाला ही माहीत नसत.


Rate this content
Log in