भक्ती निष्ठा समर्पण .........
भक्ती निष्ठा समर्पण .........
माझी भक्तीची व्याख्या..........कोणी विचारलेच तर भक्ती या शब्दाची व्याख्या किंवा अर्थ सरळ साधा आहे माझ्या नजरेत तो म्हणजे निष्ठा वा समर्पण.त्याच अर्थाने भक्तीचे विवेचन केले तर नककीच कोणिही निर्जीव दगडावर निष्ठा वा समर्पण दाखवत असेल तर मी मुर्ख म्हणेन समर्पण हे त्यागाचे प्रतिक आहे व निष्ठा ही आदर प्रेम वा सन्मानाचे ऊगम स्थान आहे असे मान्य करणार्या समजेल की मग आपली जन्मदात्री आई वडीलापेक्षा मोठ समर्पण आपल्यासाठी या जगात कुणिही कधीही करू शकत नाही त्यामुळेच आपली निष्ठा अर्थात भक्ती त्यांच्याच प्रती असायला हवी ना!ज्यांनी घडवल तो जन्मदाता नि पोटात वाढविणारी माता पुढेही फक्त देतच रहातात कसलाही मोबदला न मागता तक्रार न करता माया ममता प्रेमाचा वर्षाव करून शक्य ते सारे त्याग स्वतःकडे ठेऊन जास्तीत जास्त सुखाच्या पायघड्या लेकराच्या पायाशी घालतात का?त्याच पायाने त्यांनाच पूढे लाथाडणयासाठी?
तुमचे पैसे संपत्ती धन दौलत नकोय त्यांना हवाय सन्मान आदर प्रेम ज्या केवळ भावना आहेत अशा भावना ज्या व्यक्त करायला कोणताही मोबदला नाही लागत गोष्ट साधी आहे. कीती जणांना जमते?हजारो रूपये खर्चून बायका पोरांना घेऊन दगडांच्या देवळांना भेटी देत हिंडत असताना जन्मदाते वृद्धाश्रमात तुमच्या आठवणिने डोळयात पाणी आणुन वाट पहात असतील तर तुमची मनात भक्तिभावाने देवदर्शनाला जाण्याइतकी शरमेची बाब कोणतीच नसावी.जग दाखवायला निमित्त झालेले सजिव आईबाप सोडून दांभिकपणे अंधश्रदधेचे प्रदर्शन करणार्यांना भक्ती या शब्दाचा अर्थच ऊमगला नाही म्हणने चूक ठरणार नाही देव धर्म रूढी परंपरा अंधश्रद्धा बाळगणारे देवदेव या नावाने मूकी जीवाचा बळी देणारे कित्येक लोक आजही आपलया सभोवती वावरतात अशिक्षित व सुशिक्षित दोन्ही कडे या गोष्टी सर्रास चालतात नवस देवदेव जागरण इद जत्रा इ.निमित्त करून कित्येक कोंबडया बकऱ्या मारल्या जातात खोट्या चुकीच्या शिकवणीत रीती मध्येच गुरफटलेली मानसं घराण्यात चालत आलेय म्हणून केवळ या गोष्टी करत असतात ज्याचा परीणाम घरातील अगदी लहान मुलांवर सुद्धा नकळत होणार असतो होतो हे कसे समजत नाही एकविसाव्या शतकात आपण वावरतात एके काळी जिथ या देशात समुद्र ओलांडणे पाप होत तिथेच विशिष्ट ठराविक लोकांची मुल लाखोंच्या संख्येने शिक्षणासाठी परदेशात आहे तर दुसरीकडे असाही वर्ग आहे जोगवा मागत दारोदार भटकत आहे का तर देवाची भक्त आहे अंगात देवी आहे असल्या बालिश फालतु गोष्टी करणार्या लोकांना खरतर मानसोपचार तज्ञांची गरज आहे व फुले पेरीआर आंबेडकर त्यांच्या मस्तकात घुसवून पुस्तकात प्रती त्यांची निष्ठा वा भक्ती वाढविण्याची गरज आहे. बकरयाचे बळी दया प्रसाद म्हणून त्या मुक्या जीवाचे मांस चवीने फस्त करा मग अंगात देवी आणून कधीही डोक्यावरचा पदरही न पाडणाऱ्या बाईचे बिभत्स पणे नाचणे याला भक्ती म्हणावे काय?
सभोवताली कित्येक गोष्टी खटकतात मन खिन्न विचलित करून तावातावाने आक्रोश करायला लावतात राग येतोय मनात प्रचंड ऊथल पुथल सुरू आहे ऊदास वाटतय पंरतु उद्रेक ही आहे. कित्येकजण पैशाअभावी ऊपचाराविना मरून जातात कित्येक जण ऊपाशीपोटी फुटपाथवर झोपतात घर नाही म्हणून वनवन फिरतात शिक्षणापासून मुल, ऊदयाच भविष्य वंचित आहे.गावात आदीवासी भागात शाळा नाहीत शहरातील सरकारी शाळा व शिक्षणही दूर्लक्षित हिन स्वरूपाचे आहे.गरीबाची लेकर नोकरीसाठी फीरत आहेत स्त्री यावर मुलींवर बलात्कार हि तर नेहमीच घडत. बाब झालीय वर्तमान पत्रात रोज एक तरी बाललैंगिक अत्याचाराची बातमी असतेच.ह्या प्रातिनिधिक समस्याची काहीच थोडीफार ऊदा आहेत अजूनही पुष्कळ गंभीर समस्या आहेत त्यावर मात करायला वा काही प्रमाणात कमी करणयासाठी, भक्तीचे स्तोम माजविणारे कीती नेते वा धार्मिक संस्था पुढे येतात अगदीच नगण्य बोटावर मोजता येतील त्याही अजीर्ण होऊन पैशाच्या राशीत लोळणारया.मंदिरासाठी लाखो रूपयांचा निधी देणारे कोटयावधी रूपयांची संपत्ती बँकेत धुळ खात पडलेल्या ट्रस्ट मंदिराच्या जिर्णोद्धार वा नवे बांधण्यासाठी धनिकाकडून पैसे लाटणारे विश्वस्त कींवा मग मंदिरामध्ये पुजारी गुरुजी यांची बेहिसाब कमाई कूठे जाते.भक्तीचे स्तोम माजवून समाजाला निर्बुद्ध ठेवुन आपापली ऊखळ पांढरी करणारा हा वर्ग ज्ञानमंदिर ऊभी करायला कीती प्रमाणात सरसावतो पुढे गळक्या छताखाली वा झाडांखाली शाळा भरताना दुसरीकडे मंदिराना सोन्याचे कळस चढवले जातात ही विसंगती केवळ भक्ति च्या नावावर होत असेल तर मग भक्तीचा खरा अर्थच समजला नाही अथवा जाणून बुजून समजुन घ्यायचा नाही समाजाला समजु द्यायचा नाही असली मोठीच कारस्थाने आपल्याकडे चालतात याला निव्वळ कूटनीती वा भंपकबाजी म्हणावे भक्ति नाही.
आयुष्य मोठ व्यापक आहे सुख दुख अडीअडचणी संकट सोबत घेऊनच पुढे जावे लागते कधी कधी तर सारच संपवाव नकोच हे जगण समाजातल दुख अनुभवताना स्वताःच्याही पुढ्यात नियती तिचे अवघड डाव केव्हा टाकते हे समजत नाही मानसं अर्ध्यावर सोडून जातात कधी नकळत दुखावली जातात दुरावतात समज गैरसमज जिव्हारी लागलेले शब्द झेलायची हिम्मत नसते तुटुन जातात अशावेळेस एकटी पडतात मानसिक आर्थिक संकटात सापडून आयुष्यात खचुन कोलमडून पडतात अशा संकट समयी मदतीला येऊन मानसिक आधार देवुन प्रेमाने मायेने आपुलकीने तु धीर धर असे जरी कोणि म्हणले तरीही मोठे बळ मिळते. संकटाशी सामना करायला धैर्य मिळते कोणितरी आहे सोबत आपण या संकटात एकटे नाही आहोत म्हणून जगण्याची आशा वाढते मग तुमची भक्ति वा निष्ठा वा समर्पण अशा व्यक्तिच्या प्रती असायलाच हवे ना !जीवन आहे हे राजाचा रंक वा रंकाचा राव कोण कधी होइल कोणिही सांगू शकणार नाही बदल हा सृष्टीचा नियम आहे.क्षणार्धात होत्याचे नव्हते कधी होइल नाही समजणार आपल्या डोळ्यादेखत आपण आपलच ऊधवसत जालेल जग पहातो पंरतु हतबल असतो जगातली सारीच व्यथा माझ्याच नशिबात आली म्हणून उद्विग्न मनाने अंधाराच्या स्वताःला खाईत लोटून मरणाची वाट पहात असतो.अशा वेळेस जर कोणि व्यक्ति आपल्या सहाय्याला आली असेल आर्थिक पाटबळ देऊन परिस्थितीशी लढण्यास हिम्मत देत असेल मोठ्या मनाने आपल्या वाटयाचा थोडासा हिस्सा देऊन,नव्याने ऊभा रहायला मदत करीत असेल कोलमडलेले जगण्याची विस्कटलेली घडी बसविण्यासाठी योगदान देत असेल तर तेही समर्पणच नाही का?मानवाचे मानवतेसाठी मनाने केलेले मौल्यवान समर्पण दुसर्यासाठी त्याग छोटासाही करणे हि सोपी गोष्ट नाही साऱ्यांनाच जमते असेही नाही.फार कमी लोक असतात असे मग अशा व्यक्तीसमोर नकळत आपली हात जोडले जातात लाचारी किंवा मजबुरीने नाही तर निष्ठा आदर सन्मान ऊतुंग मानवतेचे ऊदाहरण असलेल्या माणसांप्रती भक्ती ठेवणे हे निर्जीव दगडांसमोर माथा टेकण्यापेक्षा कीतीतरी श्रेष्ठ नाही काय?
