भक्ती म्हणजे...
भक्ती म्हणजे...
आज अगदी सर्वच ठिकाणी दिखाऊ भक्ती पहायला मिळते आहे. कोणत्याही मंदिरात, वा कोठेही दिखाऊ भक्ती फार प्रमाणात वाढली आहे
पण भक्तीची वेगळीच कल्पना आपल्या समोर सांगत आहेे.
भक्ती जेेव्हा अन्नात शिरते तेव्हा तिला प्रसाद म्हणतात आणि भक्ती जेव्हा भूकेत शिरते तेव्हा तिला उपवास म्हणतात. भक्ती जेव्हा पाण्यात शिरते तेव्हा तिला तीर्थ म्हणतात. भक्ती जेव्हा प्रवासात निघाते तेव्हा तिला यात्रा म्हणतात. भक्ती जेेव्हा संगीतात शिरते तेेव्हा तिला भजन म्हणतात. हीच भक्ती जेव्हा का लोकसंगीतात शिरते तेेव्हा तिला भारूड म्हणतात. भक्ती जेव्हा माणसात निर्माण होते तेव्हा तिलातिला माणुसकी म्हणतात.
हीच भक्ती जर घरात शिरली तर त्या घराला मंदिर म्हणतात. भक्ती जर का शांतपणेे मनाच्या गाभाऱ्यात शिरली तर तिला ध्यान म्हणतात. आणि भक्ती जर का कृतीत उतरली तर तिला सेवा म्हणतात.
