बहिणीचा वाढदिवस
बहिणीचा वाढदिवस
नम्रता.... नमु... नमा.... असे अनेक नावाने ओळखली जाणारी माझी प्रिय बहीण.... आज तुझा वाढदिवस .. त्या निमित्ताने तुला मंगलमय शुभेच्छा..
काय बोलावं तुझ्याविषयी.... अगं आई नंतर तुच तर असतेस .... समजून घेणारी... समजावून सांगणारी.... अगदी हक्काची आईनंतरची जागा जर कुठे असेल तर ती तुझ्यासारख्या बहिणीजवळच असते.... नाही का ग? आणि म्हणूनच...
तुला एक सांगू... तू मौल्यवान भेटवस्तूंचे लहान पॅकेज आहेस... आणि माझ्या आयुष्यातील सर्वांत मौल्यवान व्यक्ती आहेस. माझे बालपण तुझ्यासारख्या बहिणीशिवाय अपूर्ण राहिले असते... तुला आणि मला आठवतही नसेल पण घरातील मोठे मंडळी सांगतात म्हणून.... तुझ्यासोबत मलाही मोठ्या आईने दूध पाजले...अगदी आपण जुळे असल्याप्रमाणेच.... ते ही अगदी सोबतच.... का .. तर .. मी हट्टाने रडत होतो... कारण तेव्हा हक्क हा उपजत असेल.... नाही का....
नमा.... तू एक सुंदर व्यक्ती.... विश्वासू मैत्रीण आणि माझी खास बहीण आहेस.... तुझ्यामुळे माझे आयुष्य आनंदाने भरुन गेले आहे. सर्वांत लहान असूनही कधीकधी तू मोठ्या व्यक्तीसारखी वागतेस याचाच मला खूप अभिमान वाटतो...
अशा या सर्वगुणसंपन्न, माझ्या प्रेमळ, गोड, काळजी घेणाऱ्या वेड्या बहिणीला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
तुझाच लाडाचा आणि हक्काचा भाऊ
निकुंज
