STORYMIRROR

🤩ऋचा lyrics

Others

3  

🤩ऋचा lyrics

Others

भिकारी(अलक)

भिकारी(अलक)

1 min
292

श्रीमंतीच्या आणि यशाच्या शिखरावर पोचलेल्या शामरावांच्या डोक्यात हवा गेली होती की माझ्याजवळ सर्व काही आहे. पैसा, अडका, सुबत्ता, सुंदर पत्नी आणि गोंडस मुलं. साक्षात अन्नपूर्णा स्वयंपाक करते व लक्ष्मी पाणी भरते असं जे म्हणतात ना अगदी लागू पडत होत त्यांच्या कुटुंबाला,गर्विष्ठ बनले होते. शामराव,त्यांच्याजवळ सगळं काही आहे ह्या गोष्टीमुळे...त्या दिवशी संध्याकाळी शाळेतून त्यांची मुलगी आली, आणि शामरावांजवळ येऊन बोलली की बाबा,बाबा आज आमच्या शाळेत किनी बाईंनी एक सुविचार सांगितला शामराव म्हणाले, "कोणता सुविचार रे बाळा?" मुलगी म्हणाली "स्वामी तिन्ही जगाचा आईबाप विना भिकारी" आणि ह्याउपर चिमुरडी म्हणते, बाबा तुम्हीच म्हणताना आपल्याजवळ सगळं आहे, पण तरी तुम्ही आता आजी आजोबांविना भिकारी झालात का?


Rate this content
Log in