भेट
भेट


समर आणि काव्या एकाच वर्गात शिकत होते. दोघेही खूप हुशार. हस्ताक्षर तर मोत्यासारखेच. समर अभ्यासात काव्यापेक्षा थोडा सरस. पण दोघांमध्ये सतत स्पर्धा असायची.दोघांचं छान ट्युनिंग जमायचं. परीक्षा झाली की शिक्षकांना आधी एकमेकांचे मार्क्स विचारायचे नंतर स्वतःचे.सहावी आणि सातवी मजेत गेली त्यांची. एक मैत्रीचं अतूट नातं निर्माण झालं होतं त्यांच्यात. पण काव्याला तिच्या बाबांची बदली झाल्यामुळे दुसऱ्या शहरात जावं लागलं.दोघेही एकमेकांना खूप मिस करत होते.एकत्र केलेला अभ्यास,सोडविलेल्या व्यवसायमाला दोघेही सतत आठवत होते.दोघांचा संपर्क पूर्ण पणे तुटला होता. नवीन मित्रमैत्रिणीमध्ये काव्या आता रमून गेली होती.पण कुठेतरी आपल्या त्या मित्राची कमी तिला जाणवत होती. दिवस खूप भरभर निघून जात होते.दहावी झाल्यावर काव्या गेली होती परत त्या गावात.पण समर भेटलाच नाही तिला. तो दुसऱ्या कुठल्या तरी शहरात राहायला गेला असं तिला कळलं. खूप हिरमुसली झाली होती ती.नंतर काव्याने तिचे शिक्षण पूर्ण केले होते.लव्ह मॅरेज केलं होतं तिने. एक मुलगा होता तिला.आणि अचानक २५ वर्षांनंतर काव्याची मैत्रीण अनु काव्याला फेसबुक वर दिसली.चला आपली जुनी मैत्रीण भेटली हयाचा आनंद गगनात मावेना.तिचा फोन नंबर मिळवून काव्याने तिच्याशी खूप गप्पा मारल्या. तिने तिला समरबद्दल पण विचारले, त्याचा नंबर आहे का असं पण विचारलं. ती नाही म्हणाली.वाईट वाटलं काव्याला.काव्याने फेसबुक वर खूप शोधलं त्याचं नाव.पण नाही सापडलं. आणि काय चमत्कार अनुने एका महिन्यात व्हाट्सएपवर आम्हा सर्वांचा ग्रुप केला होता. काव्याने समरचा नंबर घेतला आणि बोलली त्याच्याशी " काय समर ओळखलस का मला.मी काव्या. अरे आता खूप जाड झाले कदाचित ओळखणार नाहीस तू मला म्हणून ओळख करू दिली मी माझी."समर हसत म्हणाला " अग काव्या कसं विसरेन मी तुला मैत्रीण तू माझी" दोघांचे डोळे भरून आले होते बोलतांना. मग एक दिवस समर घरीच आला काव्याच्या. त्या दिवसाच शब्दात वर्णन करता येणं थोडं कठीणच."अरे, समर तुला आठवतोय का तो लंबू काय रे नाव त्याचं" "अग, तो हा आपला समाधान". चहाचा एकेक घोट घेत गप्पा सुरू होत्या. बाकी सर आणि मॅडम कश्या आहेत रे आपल्या? एक कप चहा पहिल्यांदाच दिड तास पिला असेल त्यांनी."अग, डॉक्टर झालो मी. हॉस्पिटल आहे माझं.आपण एक फॅमिली ट्रिप करू असे म्हणत त्याने काव्याचा निरोप घेतला.