The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Meenakshi Kilawat

Others

5.0  

Meenakshi Kilawat

Others

भारतीय स्त्रीयांचे महत्व "

भारतीय स्त्रीयांचे महत्व "

2 mins
643


 भारतीय स्त्रीयांचे महत्व समाजात किती आहे. अमुल्य मानव जीवनाची अविरत यात्रा या जन्मात नरनारीमध्ये भेदभावाने भरलेले जीवन आणि मृत्यू यांच्या भोवती झुलतांना दिसत असते. पहिले कर्तव्य मानसाला भरणपोषण करण्याचा विचार देतो. त्यांच्या मनात ध्यास असतो.त्या व्यतिरिक्त अनेक जबाबदारी मध्ये माणूस गुंतलेला असतो. प्रत्येकाला वाटतं माझा झोका आकाशी गेला पाहिजे. हा विचार करनारे बहुतेक ज्ञानी असावे,बुद्धीवंत असावे,वा विचारक असावे.ते मनुष्य अहोरात्र झटत असतात. त्यांचा समाजात सन्मान होतो,ओळख मिळते,प्रतिष्ठेत वाढ होत असते,प्रसिद्धी मिळत असते.

 

  लहानपण हे अगदि बिनधास्त असते पण मोठे झाल्यावर अनेक जवाबदा-या पेलंताना ह्रदयाचा चुराडा होत असतो.या पथावर अनेक रुपे आपल्या समोर असतात,त्यांच्या साठी काही कराव किंवा करता यावे म्हणुन जीवाची धडपड होत असते. या सर्व गोष्टींचा विचार केला असता त्यात स्त्रीयांचे जीवन अधिक कष्टमय दिसुन येत असते,त्या महिलांनी जर उंच माझा झोका नभांगनी गेला पाहिजे म्हंटल तर त्यांच्या जीवनात असंख्य अफलातून वादळ निर्माण होतांना दिसतात,आणि ती जागेवरच बसतात. यातुन काही एक महिलाच आपले नाव करतात, महिलांना जागोजागी अपमान झेलावा लागतो.कित्येक महिलांनी शिखर गाठलेले आहेत पन त्यांना असहनिय त्रास भोगावा लागला.

 

 स्वतंत्र भारत करण्या करीता कित्येक महिलांनी आपल योगदान दिलेले आहे,त्यात राणी लक्ष्मीबाई सोबत अनेक महिलांनी स्वर्णक्षरात आपले नाव नोंदवले होते.तेंव्हा त्यांनी साहस करुन महिलांना प्रेरणा दिली होती.त्या सर्व शहिद झाल्या होत्या. त्यात मुख्यत: चेन्नमां,बुलूनचियार,झलकारी,मै.भीकाजी कामां,मैनावती,अरुना आसफ अली,14 वर्षीय सुनिती चौधरी,सरला देवी,राजेंद्र कुमारी नर्तकी,डॉ.लक्ष्मी सहगल,काशीबाई,लक्षमां,राजमां,बबाई लक्ष्मण विरांगना,शामबाई,पासनी,अनुसुया,सिंधु देशपांडे, प्रभा साठे,शांता नायक या सर्व महिलांच अद्भूत, अद्वितीय योगदान त्या काळात मिळाले,पन त्यांना कधी स्वता:साठी जगता आलेल नाही.त्या जीवंत असतांना त्यानां हा सन्मान मिळालेला नाही,म्हणजे उंच भरारी घेण्या करिता जीवनाची आहूती देणे गरजेचे आहे काय?

   

  मला असे वाटण्याचे कारन की आजची महिला जर जीवंतपनी काही करती आहे,तर तिला समाजात मानाचे स्थान दिले पाहिजे. तिला प्रोत्साहन दिले पाहिजे,मिळुन मिसळून राजकारन,समाज कारन करायला हातभार लावला पाहिजे. स्त्रीयांना भोग्य वस्तू न समजता त्यांना स्वर्गीय सुखाचा पर्याय समजून आकाशात उंच झोका जाण्यासाठी मदत केली पाहिजे.


Rate this content
Log in