बॅड टच
बॅड टच
1 min
767
ती अवघी सात वर्षाची पोर आई बाहेरून येताच तिला बिलगून हमसाहमशी रडू लागली.
"अग! काय झाले बाळा?"
तुला मी शेजारच्या आजोबा - आजीकडे सोडून गेली होती ना."
ती रडत रडत म्हणाली -" आई! आजी मंदिरात गेल्यावर आजोबांनी मला मांडीवर बसवले...
आई! तू मला गुड टच, बॅड टच कसा ओळखायचा हे सांगितलेले आठवले अन् आजोबांच्या हाताला कडाडून चावा घेतला आणि तुझी वाट पाहत पायरीवर बसले."
