Author Sangieta Devkar

Others

2  

Author Sangieta Devkar

Others

बड़ी खास है जिंदगी

बड़ी खास है जिंदगी

4 mins
78


हर पल मुस्कुराओ बडी खास है जिंदगी।

क्या सुख क्या दुख बडी आस हैं जिंदगी।

ना शिकायत करो,ना कभी उदास रहो,

जिंदा दिल से जिने का अहसास है जिंदगी।" (लेखक--अनामिक,एके ठिकाणी वाचलेली शायरी)


संपूर्ण आँडिटोरियम भरून गेले होते. सगळ्याना '" द बेस्ट सेलर ऑथर" मितेश ला भेटायची खुप उत्सुकता लागुन राहिली होती. पाचच मिनिटांत मितेश तिथे आला.

हैलो एव्हरी वन , नमस्कार आय होप तुम्हाला जास्त वेळ वाट नाही पाहायला लागली. तर मित्रांनो आणि मैत्रीणिनो आज जो काही तुमच्या समोर उभा आहे त्याच श्रेय तुमच्या सारख्या माझ्या बऱ्याच फैनस ना आहेच आहे पण अजुन एक व्यक्ति आहे जिच्या मुळे मी माझ्या पायावर येस पायावर उभा आहे आणि आज "द बेस्ट सेलर ऑथर "म्हणून नेम फेम् मिळवले हे इतक सोप नव्हते. त्या मागे माझी एक स्टोरी आहे.

मितेश त्याचा भूतकाळ सांगू लागला. खुप छान आयुष्य सुरु होत. चांगला जॉब होता आणि एक दिवस माझा मोठा अपघात झाला. त्या मध्ये माझा एक पाय मला गमवावा लागला. गुडघ्या पासून माझा पाय गेला. मी कुबडया घेवून चालत होतो. मी कायमचा अपंग झालो. मग डिप्रेशन मध्ये गेलो . मला कोणा सोबत बोलावेसे वाटत नव्हते की कोणाला भेटावेसे! मी स्व:ताला रूम मध्ये कोंडुन घेतले होते. मला जगावेसे वाटत नव्हते . आपल्याला शरीराचा एखादा भाग नसने हे आपण स्वीकारुच शकत नाही. तसेच माझे झाले होते. एक दिवस सहज माझे लक्ष रुम मध्ये असणाऱ्या रेडियो कड़े गेले आणि मी रेडियो ऑन केला. सकाळची वेळ होती. आणि एक सुमधुर आवाज कानावर आला " गुड़ मॉर्निंग पुणेकर,सुप्रभात,कसे आहात ..मस्त ना... " हर पल मुस्कुराओ बडी खास है जिंदगी।


क्या सुख क्या दुख बडी आस हैं जिंदगी।

ना शिकायत करो,ना कभी उदास रहो,

जिंदा दिल से जिने का अहसास है जिंदगी।" मी तुम्हा सर्वांची आवडती ,चुलबुली आर जे त्रिशा...आज आपण सकाळी उठलो,डोळे उघडले म्हणजेच एक दिवस आपल्याला अजुन एक्स्ट्रा मिळाला त्या साठी देवाचे या यूनिवर्स चे जरूर आभार माना. मितेश लक्ष पूर्वक त्या आर जे चे बोलणे ऐकत होता. त्रिशा खुप छान आणि पॉझीटिव्ह बोलत होती. मितेश मग त्यात हरवून गेला.

आता रोजची त्याची सकाळ त्रिशा च्या बोलन्याने सुरु व्हायची. ती रोज एक प्रेरणादायीं सुविचार सांगायची आणि त्याला अनुसरून छोटी गोष्ट ही सांगायची. मितेश ला तो कार्यक्रम मना पासून आवडु लागला. तो आता आपल व्यंग विसरून त्रिशा च्या गोष्टीत रमु लागला. आपल्याला जे त्रास देत,मनात सलत ते कुठे बोलता येत नसेल तर ते लिहून काढ़ा अस आर जे त्रिशा सांगत असे. मितेश ही मग रोज त्याच्या भावना लिहुन काढत होता. यातूनच तो कविता,कथा लिहू लागला. आता त्याच्या वागन्यात खुप फरक पडला होता.तो आपली रूम सोडून आई बाबा सोबत बोलत बसत होता,मित्र मैत्रीणि ना पहिल्या सारखा भेटू लागला.

त्याच्या मनात आले की आपण त्या आर जे त्रिशा ला एकदा भेटायला हवे. मग एका मित्राच्या मदतीने तो त्रिशा ला भेटायला रेडियो केन्द्रा मध्ये आला. जिच्या नुसत्या बोलन्याने माझ्यात इतका बदल झाला तिला निदान थैंक यू तरी बोलावे म्हणून तो त्रिशा ला भेटायला आला होता.

त्रिशा तिचा कार्यक्रम संपवून येत होती . मितेश वाट बघत बसला होता. थोडयाच वेळात एक सुंदर दिसनारी,बोलक्या डोळयांची मुलगी मितेश कड़े आली ,मितेश ने तिला पाहिले आणि तो शॉकच झाला. ती सुद्धा एका पायाने अपंग होती आणि कुबडया घेवून चालत आली . " नमस्कार मी आर जे त्रिशा . बोलत बोलत त्रिशा खुर्चीवर बसली. मी मितेश मला तुम्हाला भेटायचे होते.

मला अस बघून शॉक झालात ना मिस्टर मितेश. तुम्हाला वाटले असेल की एक आर जे म्हणजे छान सुंदर मुलगी असेल हो ना.

अस नाही ..पण खरच तुम्ही सुंदर आहात पण मग हे अस ..काय झाले पायाला ?

मी जन्मताच अपंग आहे माझा एक पाय अधु आहे पण म्हणून मी स्व;ताला कधी कमी नाही लेखले. अभ्यासात हुशार त्यामुळे शिक्षण घेऊन चांगला जॉब करायचे ठरवले होते. माझा आवाज छान आहे म्हणून मला हा आर जे चा जॉब मिळाला. मी नेहमी माझ्या प्रोब्लम कड़े सकारात्मक दृष्टिने बघत आले म्हणून मी कधी निराश नाही झाले. आयुष्य खुप छोटे आहे तेव्हा तक्रार न करता प्रत्येक क्षण आनंदाने जग़ायचे हे माझे तत्व आहे.

हो तुम्ही बरोबर बोलत आहात. आज मी तुमचा कार्यक्रम ऐकुन माझ्यात सकारात्मक बदल घड़वला आहे. तुम्ही माझ्या इन्सिपरेशन आहात. अपघातात एक पाय मी गमवला त्याच नैराश्यात मी जगत होतो पण रोज चे तुमचे सुविचार ऐकून मी पूर्णपणे बदलत गेलो. थैंक यू सो मच.

मिस्टर मितेश मला खुप आनंद झाला हे ऐकून की मी लोकां साठी इंस्पिरेशन बनत आहे. माझ्या कामाचे चीज झाले.

मैंम तुमच्या पाया साठी तुम्ही उपचार नाही केले का?

नाही जन्मजात मी अशी आहे याला उपचार नाही पण म्हणून मला माझ्यात काही कमतरता आहे अस वाटत नाही. आजचा दिवस आपला अस मानून मस्त आनंदात जगायचे. तुम्ही तुमच्या साठी जयपुर फुट चा पर्याय निवडू शकता मिस्टर मितेश.

हो मी नक्की प्रयत्न करेन. मग मितेश घरी आला. त्या नन्तर त्याने जयपुर फुट बद्दल माहिती घेतली आणि कृत्रिम पाय बसवून आज तो व्यवस्थित चालत ही होता.

सो गाइज अशी माझी ही कहानी. मिस त्रिशा ला भेटून आल्यावर मला खरच खुप छान वाटले. एंड शी इज माय आएडॉल नॉउ. मी मग लिखानात रमत गेलो. हळूहळू कविता कथा लिहित आज माझ आत्मचरित्र तुम्हा सर्वा समोर माझ्या कादम्बरी तुन सादर केले. मला इतकेच सांगायचे आहे की अडचणी ,संकटे तुमच्या मार्गात येत राहतील त्यांना इतकच सांगा" ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है,कह दो मुश्किलों से मेरा खुदा बड़ा है।"

मितेश आज एक नावाजलेला लेखक होता. रोज त्रिशा चा प्रोग्राम ऐकत त्याची सकाळ होत असते.

आयुष्य सरळ कधीच नसते. त्यात गुंतागुंत असणारच म्हणून हार मानु नका ..कायम हे लक्षात ठेवा "हर पल मुस्कुराओ बडी खास है जिंदगी।

क्या सुख क्या दुख बडी आस हैं जिंदगी।

ना शिकायत करो,ना कभी उदास रहो,


जिंदा दिल से जिने का अहसास है जिंदगी।"


समाप्त


Rate this content
Log in