Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

बैलपोळा

बैलपोळा

1 min
270


 शिंगे रंगवली

      बांशिंगे बांधली

        ऐनेदार.....

आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे.भारतात सण उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.सण उत्सव तेही पारंपारीक सण साजरे करताना घरातील,कुटुंबातील सर्वजण एकत्र येवून साजरे करतात.ऐक्य जपतात.

     तसाच आजचा हा प्रामुख्याने शेतकर्‍यांचा सण असे मानतात.बैलपोळा म्हणजे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस .

    श्रावणातील हीआमावस्या ,पिठोरी आमावस्या या दिवशी संपूर्ण महाराष्र्टात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात.

   वर्षशर बैलजोडीकडून शेतात नांगरणीचे काम करून घेतले जाते.

आजच्या दिवशी यांचा सन्मान केला जातो.बैलांना मालीश करून स्वच्छ आंघोळ घालतात.त्यांचे शरीर रंगीबेरंगी रंगाने छान सजावतात.मखमली झूल पांघरतात.शिंगे सजवतात त्यांनां गोंडे बांधतात.आणि गावातून यांची मिरवणूक काढतात.त्यांच्या कष्टाचे स्मरण करतात.

   आम्ही फलटण या गावी राहत असताना हे सर्व प्रत्यक्ष पाहत असू.अनुभवत असू.बैलांना सजवत असू.मजा यायची खूप.

   पण पुण्यात आल्यापासून प्रमाण कमी झाले हे.शेतात गेलो या दिवसात तर पाहायला मिळते.पण पुण्यात घरोघरी मातीच्या बैलजोडीचे पूजन करतात.बैलांप्रती कृतज्ञता ठेवतात.

   शेतकरी आजबैलांसाठी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात.खायला घालतात. बैल शेतकर्‍यांच्या जीवनात खूप आनंद निर्माण करतात.त्यांना साथ देतात त्यांची उतराई म्हणून हा दिन साजरा केला जातोय.

   उगवला दिन सोन्याचा आज

   शेतकरी खूशीत हो आला

   पुरणपोळीचा घास भरवला

   बैलजोडीला आज आनंद झाला...


Rate this content
Log in