बाप ओळखता येत नसतो
बाप ओळखता येत नसतो
आपला बाप आपल्याला चांगले वळण लावत असल्याने आपल्याला वाईट वाटतो. कोणाचाही बाप वाईट नसतो. कोणाच्याही बापाला वाटते की आपला मुलगा चांगला हुशार निघावे, मोठा ऑफिसर व्हावे.
बाप हा आपल्या मुलाचे हितचिंतक असतो. बापामुळे घराला घरपण असते. बाप हा स्वत: फाटके कपडे घालून राहतो पण आपल्या मुलांना चांगले नवीन फपडे घेतो. स्वत: एक वेळेस उपाशी राहतो पण आपल्या मुलांना उपाशी ठेवीत नाही. बाप हा आपल्याला रागराग करतो तो ही आपल्या हितासाठीच. त्यांच्या मनात काहीच नसते. आपला बाप जर कोठे कमी पडला असेल तर तो इतरांचे बोलणे ही ऐकून घेतो.
आतल्या आत आपला बाप तसाच रडत असतो. प्रत्येकाच्या गरजांसाठी एकटा बापच वाहत असतो. सर्वांच्या आवडी -निवडी आपला बापच पुरवितो. मुलांना स्वत:च्या पायावर उभे करणारे औषध म्हणजे आपल्या बापाचा राग असतो. त्यांच्या रागामागे आपल्या मुलांचे सुख पाहणारा आपला बाप असतो. आईसारखा आपला बाप ओळखता येत नसतो. मुलांना घडवण्याचे काम आपला बापच करत असतो. बापाला कुठे कमी पडण्याची परवानगी नसते.
बाप हा आपल्याला रागराग करतो, पण आपले लाड, कोडकौतुक तोच करतो. बापाला येणाऱ्या अडचणी तो कुठेही सांगत नसतो. बाप कुठेही थकत नसतो. हा बाप आपल्या शिदोरीवर सोय उपलब्ध करून ठेवतो. पण एक दिवस तो महातारा झाला की घराच्या एका कोपऱ्यात पडून राहतो. हा बाप सहज ओळखता येत नसतो.
त्यांचे अश्रू कोणालाही दिसू देत नसतो. तो दु:ख झाल्यावर रात्रीच्या वेळेस उशीत तोंड घालून रडत असतो. त्यांचे रडणे कोणालाही दाखवत नसतो. कारण त्यांना घर सांभाळायचे असते, घरातील इतरांचा आधार व्हायचा असतो. कितीही दु:ख झाले तरी तो दाखवत नसतो. तो घराचा कर्ता असतो. त्यांचे घरातील इतरावरील असणारे प्रेम तो दाखवत नसतो.. म्हणून बाप ओळखता येत नसतो.!!!!!.
