Sangieta Devkar

Others

4.0  

Sangieta Devkar

Others

"बाप" नावाचा माणूस..!

"बाप" नावाचा माणूस..!

3 mins
666


अलीकडे पाश्चात्य संस्कृती चे अनुकरण हे सगळ्याच बाबतीत होतं आहे. मग ते राहणीमान असो,खाणे,पिणे कपड़े ,विविध वस्तु सगळ्याच गोष्टीत् सारासार विचार न् करता अंधपणे पाश्चात् संस्कृती चे अनुकरण करणे हा प्रत्येकाच्या रहाणीमाना चा स्टैण्डर्ड झाला आहे. आपली संस्कृती,परंपरा या फुटकळ ,अंधश्रद् वाटनार्या गोष्टी बनल्या आहेत. मानसांचे वागणे,कपड़े,बोलणे बदलले,अजुन एक नवीन फँड आले ते म्हणजे विविध डे साजरे करणे. मग तो वँलेटाईन डे असो,फ्रेंडशिप डे असो,रोझ डे,ब्रदर्स डे,मदर्स डे,आणि याच महिन्यात येतो तो फादर्स डे होय. हे सर्व डे जो तो अगदी उत्साहाने ,आनंदाने साजरा करत असतो. मग त्या पायी किती पैसे खर्च झाले,वेळ किती वाया गेला याचा विचारच केला जात नाही,समोरच्या वर आपले इम्प्रेशन कसे मारता येईल हेच जो तो पहात असतो. हे डे साजरा करणे,याचा अर्थ खरच तुम्हाला तुमच्या नात्यांची जाणीव होतेय किवा आपल्या नातलगा पासून तुम्ही मनाने दुर गेला आहात त्याची भरपाई ,,आई वडिलांच्या आज पर्यंतच्या कष्टाची ,प्रेमाची भरपाई म्हणून तुम्हाला हे "डे" साजरे करणे भाग पड़तय,?मदर्स डे आणि फादर्स डे ला तुम्हाला आठवते का की तुम्हाला आई वडील आहेत? कोणताही डे साजरा करु नये असे माझे मत नाही,,काळा सोबत,चांगला बदल असेल तर आवर्जून स्वागत करा पण तुमच्या आनंदात,तुमच्या परिवारात तुमचे आई वडील ही सहभागी असावेत याचा विचार जरूर करा.त्यांच्या प्रति तुमचे काहि कर्तव्य आहे,जबाबदारी आहे याची जाणीव तुम्हाला असे डे साजरे करताना होते,मग उत्साहात्,हॉटेलिंग,आउटिंग,ला आई वडिलांना नेता,आणि डेज साजरे करता,आणि दाखवून देता की तुमचे तुमच्या पालकांवर किती किती प्रेम आहे!!खरच का,,आपले प्रेम,मग ते कोणाचे ही प्रेम असो,व्यक्त करायला अशा डेज ची गरज आपल्या भारतीयांना कधी पासून भासु लागली,? 

    

आज विभक्त कुटुंब पद्धती सगळी कड़े दिसत आहे. मी,माझी बायको,मूल,बस्स,,त्या चौकटीत् आई वडिलांना क्वचित स्थान असते. आणि आजकाल च्या मुलीं या स्वतंत्र आहेत,शिक्षणाने आणि मानाने ही,! त्यात ही त्या कमवणाऱ्या आहेत. मग आपल्या अशा गुणी बायकोने आपल्या आई वडिलांची सेवा करावी असे सगळ्याच मुलांना वाटत् नाही.कारण ती आय टी /मल्टीनेशनल कंपनीत् काम करते,दमते,थकते,घरी प्रत्येक कामाला बाई असते. अशा परिस्थितीत सासु सासऱ्यांची जबाबदारी ती कशी पेलनार ना? जरा विचार करा,तुमच्या जन्माआधी न्ऊ महीने ती तुम्हाला पोटात् वाढवते. तुमचे बोट धरुन चालायला शिकवते,ती आई असते,आणि स्व:ता फाटके कपड़े वापरून ,ओव्हरटाईम करून तुमचे भविष्य घडवतो. तो "बाप" असतो. आज पर्यन्त आईवर बरेच जनांनी लिहिल आहे,पण बाप मात्र कायम उपेक्षीतच राहिला आहे. तुमच्या संसारात त्याची तुम्हाला अड़चन होते. त्याच्या खोकल्या ने तुमची झोपमोड होते,पण जेव्हा तुम्ही लहान असताना तापात फणफणत् होता तेव्हा हाच बाप तुमच्या उशाशी रात्रभर बसून होता. हे तुमच्या स्मरणशक्ति तुन डिलीट झालेल असत. बाप म्हातारा होतो,त्याचे हात् थरथर कापतात् ,त्याच्या कड़े तुमचे बाळ तुम्ही देत नाही,कारण बाळ हाता तुन पडले तर ही भीति,,,,अरे ज्या हातानी तुम्हाला 20,25 वर्ष पेलल,सांभाळल,त्या हातावर तुमचा विश्वास नाही? मोठ्या थ्री,फोर बीएचके फ़्लैट मध्ये एक खोली बापाला मिळत नाही. त्याला वृद्धाश्रम मध्ये राहावे लागते. आणि कौतुक करता त्या "फादर्स" डे च!!!


तुमच्या मुलांना आजी आजोबा पेक्षा पाळणाघरात विश्वासाने सोडून जाता,जरा विचार करा,तुमच्या मुलांना तुम्ही काय संस्कार देता,? तर उद्या तुमची ही रवानगी वृद्धाश्रमात होणार! फादर्स डे,मदर्स डे आला की तुमच आई वडिलां बद्दल च प्रेम उचंबळून् येते,ओसांडूंन् वाहत,व्हाट्सअप,फेसबुक,इंस्टाग्राम वर या डे च्या शुभेच्छा चा अक्षरशा पाऊस पडतो. मग इतर दिवशी तुमच्या प्रेमाला ओहोटी का लागते? एकवेळ आई माघरी एक्ट्या राहिलेल्या बापाला तुम्ही चार शब्द सुनावता,पण बायकोला एका शब्दानी दुखवत नाही. बापाचे प्रेम,जे तुमच्या जन्मा आधी पासून असत,ते बायको च्या प्रेमा पुढे क्षुल्लक्,शून्यच असते? मग कशाला हा दिखावा डे साजरे करण्याच्या? या गोष्टीला काहीजन अपवाद ही असतील. मी कोणते ही डे साजरा करण्या विरुद्ध नाही पण जिवंत आई वडिलांना तुमची गरज आहे,तुमच्या प्रेमाची ,आधारा ची गरज आहे,,निदान याची जाणीव ठेवा. तुमच्या आनंदात त्यांना सामिल करा,तुमचा आंनद,तोच त्यांचा आनंद असतो,थोड़े तुम्हीच त्या थकल्या जिवाना समजून घ्या,

जन्म देणारी जशी आई तसेच जन्म सार्थकी लागावा यासाठी आयुष्यभर झगडणारा तो बाबा... आईच्या मऊशार तळव्या मागचा तो राकट हात म्हणजे बाबा... पोरांनी कितीही आपलं घरटं सोडून नवी क्षितीजे गवसण्याचा प्रयत्न केला तरी बाप मात्र त्या घरट्याचा पाया मजबूत ठेवून मायेचं छत्र कायम ठेवत असतो. आपली अपूर्ण स्वप्न आपल्या पोरांमध्ये बघणारा त्यांच्या यशात आनंदी होणारा आणि खचलेल्या मनाला उभारी देणारा हात म्हणजेच बाबा...


Rate this content
Log in