बाँडी
बाँडी
हाँस्पिटल मधुन त्या दिवशी प्रेत घेवुन येतात.दहा बाय च्या खोलीत एक खाट असते.तिला बाहेर काढली जाते.फक्त दहा बारा बायका रडत होत्या. मुलगी तोंडाला साडीचा पदर लावुन होती.तिला दुःख नव्हते किंवा आनंदही.मुलगा हुंदका देत डोक्याला हात लावुन बसला होता.पुरुषमंडळी बाहेर येरझर्या मारत शवाहिणीची वाट पाहत होते.बाँडी पोस्टमार्टम करुनच बाहेर पडणार.
पोस्टमार्टम झाल्यावर बाँडी कुटुंबाचा ताब्यात देण्यात येते.सफेद कपड्यात गुंडाळलेली बाँडी तसेच शववाहिणी मध्ये टाकतात.गाडी हाँर्न वाजवत येते. गाडीचा आवाज ऐकुन थोडा वेळाने गप्प झालेल्या बायका मोठमोठ्याने रडु लागतात.आजुबाजुला घोळका जमतो.प्रेत बाहेर काढले जाते.प्रेत घरात घेवुन जातात.थोड्या वेळ कुटुंबात मधोमध ठेवले जाते.रडारड चालू होते.
एकीकडे प्रेताला न्हावु घालण्याची तयारी केली जाते...शेवटी आंघोल.गुलाबजल शिंपडण्यात येते.एका ताटात पाच मेणबत्ती पेटवल्या जातात.एका कपात मुठभर तांदूळ कोंबुन त्यात अगरबत्ती गुत्ता खुपसल्या जातात.त्याचा धुर घरभर पसरला जातो.काही बायका चहा पाण्याचे पाहत होते.काही भावकीमंडळी जलधान विधी कधी घ्यायची हे ठरवत होते.पुढच्या रविवारी घेवुया असे ठरले.बायकांनी नारळाचा किस करुन हळदीचा मेख तयार करुन एका ताटात ठेवला.
आता शेवटचा अंघोळ घालायची होती.नातेवाईक,सगेसोयरे, भाव की देवकी, यांनी तयारी केली होती.सर्वजण कामाला लागले होते.अस्तरचा कपडा आणी फुलांचे गुच्छे, हार,जाळीहार,असे एका बाजुला लटकून एका लाकडाचा खुंटीला.आता बायका त्याचा बायकोला घेवुन येतात.तिच्या हातून हळदीची मेख अंगाला फासला जाते.जशी लग्नात हळदीत अंगाला हळद माखली जाते तशीच चडवली व उतरवली जाते.नंतर पाण्याने अगं धुवून नविन टाँवेलने त्यांचे अगं पुसले जाते.नविन वस्रेपरिधान केले जातात.नविन सदरा लेंगा व डोक्यावर सफेद टोपी पेनवली जाते.भलीमोठी अंगावर जाळी हार चडवले जातात.शेवटचा विधी म्हणुन बुध्दवंदना म्हटली जाते.शेवटचा अंतयात्रा काढण्यात येते स्मशानभुमीकडे.त्या दरम्यान जमलेल्या बायका एकमेकांत कानात कुजबुत असतात, बोटाने खुणवत होत्या;
"ति त्याची मुलगी" एक बाई,
"तो तिचा मुलगा" दुसरी बाई.
तो कोपर्यात उभा आहे ना, तो तिचा नवरा,
"असं, का..?
'तो वेडा, बावळट दिसतो"
काय,आईवडिल,पैस्यासाठी,मुलीचा विचार केला नाही, फक्त सरकारी नोकरी पायी, एवढ्या गोंडस, देखन्या मुलीला मेल्या वेड्यांच्या गळ्यात बांधले….
'एकुलता एक मुलगा,व नोकरी बघुन लावुन टाकले लग्न,
कशी यासाठी फक्त," सरकारी नोकरी "साठी डोळे फिरले.
"मुलीच्या डोळ्यात एक अश्रु नाही बाबा साठी"
"पैसा आहे,घरदार आहे पण शरीरसुख नाही"
काय फायदा अशा लग्नाचा, लग्नाला दहा वर्ष झाली पण, अजुन पाळणा हळत नाही
"कसा हळणार ….,एक बाई मध्ये बोलते.
"तिने रंगवलेले स्वप्न फक्त आईवडिलांची खा तर दाबुन टाकली"
"आईवडिलांची मुलींच सुख बघितले नाही"
त्या दरम्यान त्या व्यक्तींचा कार्याची कुजबुज चालू होती.मित्रमंडळ,शेजारीपाजारी,सगेसोयरे दारुडे,आयुष्यभर एकांत गुंत्यात बसलेले,मित्रांना जास्त दुःख होत होते,मेल्याचे नाही तर,फुकट पाजनारा एक गिर्हाईक कमी झाला म्हणुनि.
बायका एकमेकांत कानात कुसर ,कुसर चालू होते.बायको हुंदक्याने. रडत होती.तिच्या अंगावरचे सर्व दागिने तिरडी ठेवले.दागिने कसले फक्त फुटक्यामण्याचे एक काळ्यामण्यात विनलेले एक गळ्याभोवतीचे मंगळसुत्र.नाकातिल एक सोण्याचा फुली नवर्याची तोंडात ठेवण्यात आली.कपाळावरच कुंकु पुसण्यास आले.हिरव्य बांगड्या फोडणत्यात आल्या.आता बोडकी झाली होती.
अंतयात्रेत्या रस्त्यावर ती सर्व संपत्ती,जी त्याने आयुष्यभर कमवली होती, तेवढाच एक फुटका मणी तो घेवुन जात होता.त्यांचे हात बांधून ठेवले होते.माणुस रिकाम्या हाताने येतो, पण तोंडात एक फुटकामणी घेवुन जातोच.तिरडीला खांद्याची गरज नव्हती.