बालवीर : भाग २
बालवीर : भाग २
चिट्टी हा बालवीरच्या सैन्यामध्ये सामील होऊन जातो. चिट्टी बालवीर व बालपरीला त्या वैज्ञानिकाचा पत्ता सांगतो, बालवीर वेळ वाया न घालवता बालपरी व आपली सेना घेऊन त्या ठिकाणी पोहचतो, तो तेथे पोहचल्यावर त्यांना कळते की तो वैज्ञानिक तेथून पसार झाला आहे. कारण त्या वैज्ञानिकाला त्याच्या शक्त्यांमुळे हे कळून चुकले होते की 2.0 चे रूपांतर आता चिट्टी मध्ये झाले आहे. बालवीर व पऱ्या आता चिंतेत असतात, कारण त्यांनी लावलेल्या ब्रम्हकवचामध्येच ही वाईट शक्ती कार्य करत आहे व आपण काहीही करू शकत नाही आहोत. त्या वैज्ञानिकाला चहुदिशांमध्ये शोधण्याचे कार्य सुरूच होते परंतु त्याचा काही पत्ता लागत नव्हता. शौर्य हा बालवीर व बालपरी यांना बोलवून वैज्ञानिकाला कसे कैद करावे याची चर्चा करत असतात व वैज्ञानिकाला पराभूत करण्याचे मार्ग शोधत असतात. शौर्यला पुन्हा पृथ्वीवरील महासंकटाचे पूर्वभास होऊ लागतात परंतु सुदैवाने पृथ्वीवर सर्व काही सुरळीत होते. तब्बल एक महिना सर्व सुरळीत चालले होते.
त्या वैज्ञानिकाचा शोध सुरूच होता परंतु तो वैज्ञानिक बालवीरला काही सापडायचा नाही. काही वेळेस बालवीरला माहिती मिळायची की तो वैज्ञानिक कोठे आहे पण बालवीर तेथे पोहचायच्या अगोदरच वैज्ञानिक तेथून पसार व्हायचा. बालवीर आपल्या सेनेसोबत चर्चा करत असतानाच त्यांना पृथ्वीच्या दिशेने खूप भयंकर असे आवाज येऊ लागले होते. बालवीर व त्याचे सोबती लगेच पृथ्वीच्या दिशेकडे निघाले. सुदैवाने पृथ्वीवर कोणतेही संकट आलेले नव्हते परंतु महाशक्तीशाली दानव थॅनोस हा पृथ्वीवर लावलेले ब्रम्हकवच तोडण्याचा प्रयत्न करीत होता. ऍव्हेंजर्सने थॅनोसचा अंत केला होता , पण त्या दृष्ट वैज्ञानिकाने थॅनोसला पुन्हा जिवंत केले होते तेही त्याच्या आधीच्या शक्त्यांपेक्षा अधिक शक्त्यांसाहित. बालवीर सोबत थॅनोसचे युद्ध सुरू झाले, बालवीर थॅनोसवर प्रहार वर प्रहार करत होता पण थॅनोस महाशक्तीशाली असल्यामुळे तो बालवीरच्या प्रहारांना प्रत्युत्तर देत बालवीरवर प्राणघातक हल्ला करत होता. थॅनोसने बालवीरला जखमी केले, बालपरी बालवीरला घेऊन वीरलोकमध्ये गेली.
इकडे थॅनोस सोबत चिट्टी व अन्य सेना लढत होती व त्याला ब्रम्हकवच तोडण्यापासून थांबवत होते. थॅनोस हा त्यांना भटकवण्यासाठी स्वतःचे शेकडो रूप तयार करतो व चिट्टी व सेनेला भटकवतो. बालपरी बालवीर वर तात्काळ उपचार करून त्याला युद्धासाठी पुन्हा तयार करते. बालवीर परत थॅनोस सोबत युद्ध करायला सुरुवात करतो व आपल्या सेनेचा मनोबल वाढवितो. जसा थॅनोस स्वतःच्या शेकडो प्रतिमा तयार करत होता परंतु तो फक्त एकच होता त्याच प्रकारे बालवीरने चिट्टी त्याची एक रोबोटिक सेने तयार करायला सांगितले. पण ही सेना थॅनोसच्या प्रतिमेतील सेनेप्रमाणे खोटी सेना नसणार होती. ही सेना थॅनोसवर दाही दिशांकडून प्रहार करत होती. परंतु चिट्टी ची सेना ही विजेवर चालणारी होती म्हणून काही वेळानंतरच सेनेमधील काही रोबोट्स अंतराळात विलीन होत होते व थॅनोस वर काही प्रहाराचा प्रभाव दिसत नव्हता. शौर्यने बालवीरला बोलवून घेतले, शौर्य बालवीरला सांगू लागला की थॅनोसचा अंत आधीही झाला होता. त्याचा अंत ऍव्हेंजर्सने केला होता. बालवीरला हे कळताच त्याने शौर्यला सांगितलं की, मी आताच ऍव्हेंजर्सकडे जाऊन त्यांना थॅनोसच्या अंतचे गुपित विचारतो, पण शौर्य त्याला सांगतो की ते आता आपल्या आकाशगंगेत नाहीत ते दुसऱ्या आकाशगंगेत गेलेले आहेत. बालवीर शौर्यला विचारतो की ते कुठल्या आकाशगंगेत गेले आहेत? तेव्हा शौर्य उत्तरला की , ते चुंबकीय आकाशगंगेत गेले आहेत. शौर्य बालवीरला आकाशयंत्रबद्दल सांगतो, की हे यंत्र वापरून आपण एका आकाशगंगेतून दुसऱ्या आकाशगंगेत जाता येते. आकाशयंत्राचा पत्ता लागताच बालवीर व चिट्टी चुंबकीय आकाशगंगेत जातात....
