STORYMIRROR

Sumit Sandeep Bari

Children Stories Action Fantasy

4  

Sumit Sandeep Bari

Children Stories Action Fantasy

बालवीर : भाग १

बालवीर : भाग १

3 mins
541

     महाशक्तीशाली बालवीरचा हमशकल कालचा अंत केल्यानंतर बालवीर ,बालपरी व बाकी सर्व चिंतामुक्त झाले होते .हा विचार करून की ,आता कोणतेही संकट उरलेले नाही.बालवीर,शौर्य व बाकी पऱ्यांनी मिळून पृथ्वीवर ब्रम्हकवच लावून दिले जेणेकरून पृथ्वीबाहेरून कोणत्याही वाईट शक्तीमुळे संकट येऊ नये.सर्वजण खूप आनंदात होते व उत्सव साजरा करत होते.

 

    पण तेवढ्यात वीरलोकवरून त्यांना एक संदेश आला. तो संदेश वाचताच सर्वजण चिंता व्यक्त करू लागले, कारण तो संदेशच असा होता की वीरलोकच्या कैदेमधून एक मानसिक अवस्था ठीक नसलेला वैज्ञानिक पसार झाला आहे. तो वैज्ञानिक वीरलोकचा असल्यामुळे त्याच्याकडे काही जादूच्या शक्त्या देखील होत्या व तो तंत्रज्ञानाच्या बाबतीत अत्यंत ज्ञानी असा वैज्ञानिक होता, पण तो त्याच्या ज्ञानाचा व शक्त्यांचा गैरवापर करून स्वतः शक्तीशाली होतं होता व वाईट शक्त्यांचा साथ देणार होता. हे पऱ्यांना कळताच शौर्यने व बालपरीने त्याला माहित नसतांना त्याच्यावर हल्ला केला व त्याला बंदिस्त करून वीरलोकच्या कैदखान्यात टाकून दिले होते. तो एक वीरलोकचा सदस्य असल्यामुळे त्याचा अंत नाही केला होता. 


     आता सर्वजण कालच्या मागे असल्यामुळे वीरलोकवर एवढे लक्ष देत नव्हते, व त्याचाच फायदा घेऊन तो वैज्ञानिक तेथून पसार झाला. बालवीर व इतर सर्व पऱ्या इतक्या चिंतेत नव्हत्या त्याचे कारण म्हणजे त्यांनी पृथ्वीवर अगोदरच ब्रम्हकवच लावून ठेवले होते, त्याच्यामुळे वैज्ञानिक पृथ्वीला कोणताही धोका निर्माण करू शकणार नाही याची त्यांना खात्री होता. परंतु शौर्यला पुन्हा पुन्हा पूर्वाभास होत होते की पृथ्वीवर कोणतेतरी मोठे संकट येणार आहे. त्या वैज्ञानिकाला स्वतःच्या शक्त्या वाढविण्यासाठी वेळेची गरज होती व त्याला चिंता होती की बालपरी त्याला पुन्हा पकडणार, त्यामुळे त्याच्या डोक्यात विचार चालू होता की बालवीर व पर्यांना कसे भटकवावे ?


     बालवीर व पऱ्या वीरलोकात चर्चा करत असतानाच बालवीरला पृथ्वीवरून मदतीच्या हाका ऐकू येतात, बालवीर लगेचच जेथून हाका ऐकू आल्या आहेत तेथे जातो तर तेथे फार नुकसान झालेले असते, लोकं घाबरून घरात तर कोणी जिथे लपायला जागा मिळेल तेथे लपले होते. बालवीरला पाहताच सर्वजण बाहेर येतात व त्याला सांगतात की येथे एक रोबोट आला होता जो सर्व नुकसान करत होता. बालवीर हे सर्व शौर्य व बालपरीला सांगतो. ते याचा शोध घेतात तर त्यांना समजते की आपण ब्रम्हकवच लावण्याच्याधीच वैज्ञानिक पृथ्वीवर आला आहे व आता पृथ्वीला धोका आहे. बालवीरला पुन्हा आवाज ऐकू येतात तो तेथे जातो पण रोबोट पुन्हा चालला गेलेला असतो. हे असे पाच ते सहा वेळा होते , त्यामुळे शौर्य बालवीरला एक यंत्र देतो. ते यंत्र असे असते की बालवीरला आवाज ऐकू येताच तो सेकंदापेक्षाही कमी वेळात तेथे पोहचेल. बालवीरला पुन्हा आवाज ऐकू येतात तो यंत्रचा वापर करुन बालवीर तात्काळ तेथे जातो, पाहतो तर काय 2.0 रोबोट सर्व नष्ट करत असतो, बालवीरला पाहून तो पळण्याचा प्रयत्न करतो पण बालवीर त्याला आपल्या शक्त्यांमध्ये कैद करतो व विचारतो की त्याला येथे कोणी पाठवले व का पाठवले ?


     बालवीरच्या शक्त्यांचा मार पडल्यावर 2.0 सर्व सांगत नसतो. बालवीर व पऱ्यांना समजते की हा रोबोट म्हणजेच 2.0 विजेवर काम करतो. बालवीर व पऱ्या त्याची विजशक्ती ओढून घेतात, तो त्यांना चेतावणी देतो की मला सोडा नाहीतर मी तुम्हाला नष्ट करून टाकेल. पण त्याची शक्ती हळू हळू कमी होऊ लागते व तो गयावया करू लागतो. बालवीर त्याला विचारतो की तुला येथे कोणी पाठवले ? मग स्वतःचा अंत होऊ नये म्हणून तो सांगतो की, त्याला येथे त्याच वैज्ञानिकाने पाठविले आहे जो विरलोकातून पसार झाला होता. नंतर बालवीर त्याला सांगतो तू आम्हाला तुझ्या शक्त्यांचें गुपित सांग मग आम्ही तुला सोडू. तो सांगतो की माझ्या अंगात एक लाल कार्ड आहे ज्यात सर्वाना नष्ट करण्याचे काम आहे, ते कार्ड माझ्या अंगात असल्यामुळे मी त्या कार्डचा गुलाम आहे. हे ऐकल्यानंतर बालवीर त्याच्या अंगातून लाल कार्ड काढून घेतो व त्याच्या विरुद्ध सर्वाना वाचवेल असे काम करणारे कार्ड त्याच्या अंगात टाकतो व त्याला आपल्या सेनेत सामील करून घेतो जेणेकरून त्या वैज्ञानिकाशी लढायला शक्ती कमी पडणार नाही. 2.0 चे नाव बालवीर आता चिट्टी ठेवतो...

तिकडे वैज्ञानिक आपल्या शक्त्या वाढवत असतो...


Rate this content
Log in