कू.शुभम संतोष केसरकर

Others

5.0  

कू.शुभम संतोष केसरकर

Others

बालपणीची गोष्ट !!

बालपणीची गोष्ट !!

3 mins
960


दोन दिवस बाकी होते वर्ष संपायला. कधी गेले एवढे दिवस मला कधी समजलेच नाही. त्याआधी आठवतात ते क्षण जेव्हा ह्या वर्षाची सुरवात झाली होती एक नवीन उमेद आमच्या सर्वांच्या मनात एक जागा करून बसलेली होती सर्व जण एकमेकांना विचारण्यात उस्फुर्त होते की ह्या वर्षात तुझे कोणते निर्धार किंवा कोणते अपेक्षा ठरवले आहेस का तू मनात?? सर्व एकमेकांना ते सांगण्यात व्यस्त होते पण माझ्या मनात जणू एक वेगळीच कणकण होती की ह्या वर्षात मी कोण कोणत्या गोष्टी पूर्णत्वास नेल्या व कोणत्या गोष्टी राहिल्या आहेत का?? मी ते विसरलो तर नाही ना?? का बर मला वाटत असेल?? ह्या सर्व प्रश्नांचा जणू माझ्या मनात भडिमारच चालू होता. आता फक्त दोन दिवस बाकी होते वर्ष संपायला मग आता मी कस शोधून काढू की कोण कोणत्या गोष्टी राहिल्या आहेत माझ्या?? आणि ह्या दोन दिवसात मी ते कसं थोडक्यात पूर्ण करू?? पण मी ठरवलेलं होत मनात की काही होउदे पण अपूर्ण राहिलेल्या गोष्टींना पूर्णत्वास नेहुन ठेवायच्या. मग माझी लगबघ सुरू झाली ती दुसऱ्या दिवसापासून सकाळी लवकर उठून, सर्व माझं काम आटपून मी एका वहीच पान व एक लेखणी घेऊन एका शांत ठिकाणी जाऊन बसलो, व मनातल्यामनात सगळ्याच काही गोष्टींच चिंतन व मनन करत राहिलो कधी वाटत होतं की सगळ्याच गोष्टी तर पूर्ण आहेत पण कधी त्याच उत्तराची उलटी भावना मनात येत होती. मग ह्या विचित्र परिस्तिथीतिमधून बाहेर पडू कसा ह्याचा विचार मी करत राहीलो. मग एक छोटी गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे की मी एकदा आई बाबा ना विचारून बघतो कदाचित त्यांना मी सांगितलं असावं कधी तरी ह्या पूर्ण वर्षात, मग मी एक पण क्षण वाया न घालवता आई - बाबांकडे गेलो व त्यांना ह्या सर्व गोष्टी मी स्पष्ट शब्दात सांगितल्या, पण तरीही त्यांच्या कडून मला उत्तर मिळालं नाही. मी परत निराश शुद्ध भावनेने तिथून निघालो व परत ह्या गोष्टीबद्दल विचारविनिमय करत राहिलो. ह्या सगळ्या धावपळीत पूर्ण दिवस मावळण्याच्या मार्गावर होता व रात्र येण्याच्या मार्गावर अस करत करत दिवस अखेर संपला पण आता फक्त एक दिवस बाकी होता ते जाणून घेण्यासाठी. मग काय आपला दिनक्रम पुन्हा चालू ह्यांना विचार नि त्यांना विचार अस करत करत वेळ जात होता व नवीन वर्ष चालू होणार होतं. त्यावेळची स्थिती थोडी बिकट होती कारण नवीन वर्ष येण्याच्या तयारीत व गतवर्षाला निरोप देण्याच्या तयारीत आता बर काय करावं आणि कसं करावं हे काही मला सुचत नव्हतं. कोणाला विचारू ते सुद्धा कळत नव्हतं. निराशेच्या वाटेने मी पुन्हा घरी जात होतो तर रस्त्यातुन जात असताना कधी नव्हे तर मला एक अनोळखी व्यक्ती सोबत ओळख झाली तो दिसायला उजळ व संतुष्ट वाटत होता. चेहऱ्यावर हसू एकदम बोलका वाटत होता. मी सहजच त्यांना एक प्रश्न विचारला की सर तुमची कोणती इच्छा अपूर्ण आहे का?? जी तुम्ही ह्या वर्षात पूर्ण करू शकले नाही. तर त्यांनी एका सुंदर वाक्यात मला उत्तर दिले की ते म्हणाले की " इच्छा ही एक अशी गोष्ट आहे की जी पूर्ण सुद्धा होते पण कधी जीवनात काही अडचणी आल्यास ती आपल्याला अपूर्ण पण ठेवावी लागतात, ह्याचा असा अर्थ नाही की ती कधी पूर्णच होणार नाही प्रत्येक गोष्टीला एक वेळ व एक काळ असतो त्या वेळेतच ती गोष्ट पूर्ण होते त्यामुळे त्या सदर परिस्तिथी बद्दल विचार न करता येणाऱ्या वर्षाचे आपण स्वागत करू व मुक्तछंद प्रमाणे ती गोष्ट पूर्णत्वास नेऊ" असे त्याचे सुंदर वाक्य ऐकून व समजून मी मनात ठरवलं की ज्या गोष्टी मी विसरलो आहे, त्या गोष्टी आता नाही आठवत आहेत. पण मी कधी त्या गोष्टी जवळ गेलो तर मी गोष्ट मला नक्की आठवले व ती मी पूर्णत्वास नेईन अस मनात निर्धार ठेऊन नवीन वर्षाचे स्वागत करू व आनंदी जीवन जगू . असे म्हणत मी माझ्या कुटुंबासोबत नवीन वर्षाचे स्वागत केले व गतवर्षाचं निरोप देऊन शेवटच्या दिवशी जे शिकलो ते मनात धरून आनंदाने व हर्षउल्लासाणे जगत राहिलो.


Rate this content
Log in