Vilas Yadavrao kaklij

Children Stories Tragedy Children

3  

Vilas Yadavrao kaklij

Children Stories Tragedy Children

बालपण

बालपण

5 mins
161



    हसणारे, खेळणारे, बागडणारे मूल किती छान दिसते. एक चैतन्य उत्साह निरागसता मुलात सहजपणे ओसंडून वाहत असते म्हणूनच म्हटलं जातं असावं... बालपण देवा देगा प्रत्येक व्यक्तीत एक लहान मूल असते. 

 

आजही वर्तमान काळात जगतांना लहान मुलांकडे बघितले की भूतकाळ जागा होतो खरेच माझ्या मध्ये असेल का ?हसणारे, खेळणारे, बागडणारे मूल ' गो डंसपणा , बाल तीला किती छान दिसते तेव्हा चे ते एक चैतन्य , उत्साह, निरागसता मुलात सहजपणे ओसंडून वाहत असते . म्हणूनच म्हटलं जातं असावं... ते ... ? बालपण देवा देगा व्हावे पुन्हा एकदा बालक ...... प्रत्येक व्यक्तीत एक लहान मूल असते. ते पण ते वर्तमान काळात स्वतःच्या आयुष्यात दडलेले व भूतकाळात लोप पावलेले पण ? अस्थित्व टिकून असते आपल्या मनात . नेहमी प्रमाणे आई शेतात कामा साठी जात वडिल नोकरी निमित्त बाहेर गावी जात आठवड्यात घरी येत सकाळी लवकर उठून शाळेत जात एक साधी नायलॉन ची पिशवी घेऊन त्यात दगडी पाटी , एक दोन पुस्तकं . पेन्सिल पाच नये पै . देवून आठवडा भर पुरवावी लागे मधल्या सुटीत घरी येवून भाजी -भाकरी खावून परत घंटा वाजली की शाळेत जावे सकाळची शाळा सुटली की परत दुपारी २ वा . भरत असे मधल्या काळात मुली मुले एकत्र खेळत मूली भातुकलीचा खेळ दंगडाच्या भांड्याचा संसार खेळ खेळत मातीवर रेघोट्या मारून घर व खोल्या बनवत , दरवाजा बंद करण्यासाठी रेषा ओढली की बंद , 

रेषा पुसली की दरवाजा उघडा ' कोणी बाप , कोणी आई कोणी शेजारी अशी पात्र रंगत व प्रत्येकाच्या घरातील निरीक्षणा वर पात्र रंगत खोटी भांडणे , मुलांना ओरडणं अशी पात्र मात्र जणु एकांकिका सादर होत . त्यात कोणाच्या घरची मोठी माणसांनी बोलावले किंवा रागावले तर सार्‍या संसाराचा खेळ व्हायचे . शाळेत नदीवर पाण्यात भिजत , खेळणे , पोहणे न सांगता होणारे हे सर्व काही सुरळीत चालू होते .यातील पात्र कधी कधी शाळेत प्रवेश मिळाला की मुले मुलींना चिडवत . मुला मुलींच्या जोड्या लावल्या जात मग त्या प्रमाणे मदत करणे . वागणे बोलणे ऐकून इतरांना आनंद होत . मला मात्र आठवते तेंव्हा पासून मध्यल्या सुटीत मला घरी मदत करावी लागत घरी बकऱ्या असत त्यांना घेवून शेतात जाणे चारणे व त्यांना शेतात बांधून परत दुपारच्या सत्रात (२ते ५ )शाळेत येणे . परत पाच वा . शाळा सुटल्या नतंर शेतात जाणे बकऱ्या परत आणणे .येतांना त्यांना चारा आणणे गरजेचे होते . इतर मुलांना मात्र अशी कामे नव्हती ती जास्त वेळ खेळण्यात दंग होऊन जात . शनिवारी शाळेत वर्ग खोल्या खाली मातीच्या असत त्या सारवण्यासाठी रस्त्यावर येऊन शेण जमा करणे व बादली घेवून पाणी आणणे व मुलींना सारण्याचे काम अशी कामे मात्र आनंदाने करत एका काढिला बादली अडकवून दोन मुले पकडत प्रत्येकाची गाडी वेगवेगळी ' कुणाची बैलगाडी किंवा घोडे किंवा ट्रॅकर अशी वेगाने चढाओढ मध्ये च कधी कधी टक्कर देणे मुद्दाम पाणी सांडणे मग खटला गुरुजी कडे गेल्यावर मात्र धपाटे मिळत ओल्या काठीने छडी वरून परत एकदा तेच काम करावे . गुरुजींना प्रत्यक्ष घटना सांगण्या साठी ती खट मीट लावून सांगणे पूरावा म्हणून मित्रांची साथ देत मग मात्र एखादा खरा विद्यार्थी खोटा ठरवून शिक्षा भोगावी लागे . मात्र शाळा सुटल्यावर सर्व काही विसरून पळत घरी पोहचत दुसऱ्या दिवशी घरून एकएक मित्राला बोलावणे व शाळेत जाणे असी हि निरागस पणा आहे त्यात आनंद कधी रुसवा फुगवा नाही . की घरी सांगत नव्हते कारण परिणामांची व दुप्पट शिक्षा मिळत. गुरुजींनी मुलांना खेळतां ना बघितले तरी शाळेत समोर जाणे साठी घाबरतात कारण दरारा पण होता व प्रेम पण करत . एखाद्या मित्राने पुस्तक फाडले तर ते त्याच्या कडून चिकटवून घेत त्या साठी शाळेच्या कंपाऊंड साठी शेर (थोर) लावलेला असत त्याच्याने चिकटवत मात्र त्याचा पाढंरा द्रव म्हणजे गोंद म्हणून वापरत मात्र त्याचा फवारा चेहर्‍या वर गेल्यास चेहरा सुजला जात दोन दिवस सूज उतरत नव्हती . पून्हा शाळेत मुले मारुती म्हणून चिडवत . तेव्हां शाळेतही आज प्रमाणे सरकारी शाळेत खेळणी उपलब्ध नव्हती . खेळ ठरलेले असत . कब्बडी , खोखो , विटीदांडू , गोट्या खेळणे , लपाछपी , कुरघोडी अशी खेळ खेळत , शाळेत एकच गणवेश पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्ड , सर्व विद्यार्थी ग्रामिण भागातील असल्यामुळे खेळ व इतर . मर्यादा असत कधीही पालक शाळेत सोडण्यासाठी वा घेण्यासाठी येत नसत ' नाही पॉकेट मनी वा नाही खर्च त्यामुळे फक्त चिंचा ' बोरे, आवळे , शेतात उपलब्ध फळे ' शेंगा हा खावू हमखास प्रत्येकाच्या खिशात , दप्तरात असत व एक मेकांना शेअर करणे बदली दुसरा पदार्थ घेणे व गुरु जी शिकवत असंताना टरफले , बोरांच्या बिया एकमेंकानां मारणे ' अशा खोड्या काढत व इतरांना बोलणी वा मार मिळाला की आम्हाला आनंद होत .पण गुरुंजी पुढे बोलण्याची हिम्मत होत नव्हती , घरी दिलेला अभ्यास केला नाही तर शाळेत जाण्याची भिती वाटत मग शाळेची वेळ झाली की पोट दुखणे सुरु , कधी जुलाब होत अशी कारणे सांगून घरी थांबणे , वेळ टळली की खेळणे , खाणे सुरू व चुकून एखाद्या मित्राने बघितले की मग गुरुजींना निरोप दिला जात व गुरुजी त्याला घेण्यासाठी मुले पाठवत तेंव्हा मात्र चढाओढ सुरू होत मग चार पाच मूले त्याला घरि घेण्यासाठी येत तेंव्हा मात्र तो कोठे तरी लपूण बसत एका मित्राला आम्ही धान्याच्या कोठीत लपला तेथून शोधून काढले व त्याची उचलबांगडी करून शाळेत हि यात्रा पोहचत जणू आम्ही गड सर केल्याचा आनंद मिळत . असे रोज एक तरि घटना घडत असे .. वर्गात खोड्या केल्यावर अंगठे धरणे , कोबंडा बणणे यासाठी काही मुद्दाम खोड्या करत त्यातही त्या वयात आनंद मिळत होता . सर्व काही संस्कार , एकमेंका प्रती आदर, प्रेम . एकाच वातावरणात मिळत खऱ्या अर्थाने ती शाळा एक सरस्वती मंदिर होते. सवंगडी मित्र आणि गुरुजी आमचे साठी सर्वकाही तेच होते . गुरुजींनी सांगितले कि घरच्यांचे पण खोटे वाटत . इतका विश्वास व खात्री होती व गुरूही तसेच वागत त्या घटना आजही बाल मनात रुजल्या आहेत . आजही वाटते धन्य ते बालपण " लहान पण देगा देवा "

कळीचे फुल व्हावे पाकळ्या प्रमाणे जीवन फुलावे, ज्ञानाचा सुगंध पसरावा , गुरुप्रती रुणानुबंध असावा शाळेप्रती जिव्हाळा मित्रांचा लव्हाळा असावा तोची लळा होता पालक तोची जिव्हाळा आपल्या बालका 'प्रती बालदिनी आठवावा हिच एक विलासरावाची आठवण आपल्या प्रती बालदिनी विलासी बालकथा .



Rate this content
Log in