Vilas Yadavrao kaklij

Children Stories Tragedy Action

3  

Vilas Yadavrao kaklij

Children Stories Tragedy Action

"जनी"(भाग-१०)

"जनी"(भाग-१०)

4 mins
210


(क्रमशःजनी.भाग १० ) 

दुसऱ्या दिवशी जनी अतिशय आनंदात होती . कारण राजेश ने तिला घरी भेटण्यासाठी बोलावले होते. जनीलाही वडिलांना भेटण्यासाठी घरी जायचे होते. ती अतिशय आनंदात असण्याचं कारण तिच्या आणि राजेश च्या लग्नाला त्याच्या वडिलांनी दिलेली परवानगी होती मात्र तिच्या मनामध्ये एक शंका सतत येत होती ती म्हणजे एवढ्या मोठ्या श्रीमंत घरामध्ये राजेशचे नातेवाईक आपल्याला स्वीकारतील काय? किंवा आपला निभाव लागेल काय? सत्य परिस्थिती कळल्यानंतर मला मला राजेश चे नातेवाईक स्वीकारतील वा नाही याबद्दल. तिच्या मन सतत खात होत नेहमीप्रमाणे तिच्या मैत्रिणींना घेतले व जाताना राजेश च्या वडिलांना भेटवस्तू द्यावी म्हणून ती मोठ्या मॉलमध्ये गेली तेव्हा मॉल मध्ये एन्ट्री करताना मोनाच्या मित्रांनी तिला बघितले होते व ते तीच्या पाळतीवर आहेत अशी तिला शंका आली होती. तिने मॉलमधून राजेश च्या वडिलांना एक भेटवस्तू घेतली व जातांना खाऊ घेतला जातांना नेहमीच्या रस्त्याने न जाता तिने मुद्दाम लांबून जाण्याचे ठरवले कारण तिला बघायचे होते की मोनाने पाठवलेले तिचे मित्र आपला पाठलाग करतात काय आणि तीची शंका खरी ठरली लांबच्या रस्त्याने सुद्धा ते पाठीमागे येत होते आता मात्र त्यांना अद्दल घडवली पाहिजे यासाठी तिने ही एक बेत केला होता. ती लांबच्या रस्त्याने जात असताना एक हॉटेल वर थांबली हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी मैत्रीणसह हॉटेलमध्ये गेली तेव्हा तिला माहित होते की ही मित्र पण येतील काही क्षणांनी मोनाने पाठवलेले दोघं मित्र हे सुद्धा त्या हॉटेलमध्ये आले व जनीच्या टेबल शेजारी बसले त्यांचे सारे लक्ष तिकडेच होते तेव्हा मात्र जेनीने स्वतःच्या संरक्षणासाठी भारतीय पोलीस दलाने तयार केलेले ॲप एक्टिव केले होते व स्वतः धोक्यात आहे असे असल्यास त्या ॲप द्वारे आपण विशिष्ट संकेत पोलीस स्टेशनला पाठवू शकतो याची तिला कल्पना होती. तिने मुद्दामून त्यांचे जवळून दोनदा चक्कर मारल्यावर जाताना एका मित्राने तीला मुद्दाम पाय आडवा केला तेव्हा जनी ही मुद्दाम जोरात कोसळली व तिच्या मैत्रिणींनी जोरात आरडाओरड केली. ताबडतोब हॉटेल मालक, वेटर सारे धावून आले तेव्हा त्यांनी माझी छेड काढली व सकाळपासून माझा पाठलाग करत आहे तिने ताबडतोब मेसेज दिल्याप्रमाणे दहा ते पंधरा मिनिटांमध्ये पोलिस हजर झाले तेव्हा तिने दोन्ही मित्रांना सकाळ पासून माझा पाठलाग करीत आहे.

मॉलमध्ये वस्तू घेतल्यापासून माझा पिछा करीत आहे. आता मुद्दाम त्यांनी माझी छेड काढली. विनयभंगाची तक्रार तिने दाखल केली. त्यामुळे दोन्ही मित्रांची भांबेरी उडाली व त्यांना पोलीस घेऊन गेले व ती राजच्या घरी पोचली. मोनाला कळाले आपल्या मित्रांना जेनीने पोलिसांच्या हवाली केल्यामुळे ती अतिशय चवताळली होती व तिचा हेतु जनी चे लग्न मोडणे हाच होता. तिच्या घरी गेली तेव्हा प्रथम त्याच्या वडिलांच्या पाया पडली व त्यांना खाऊ आणि भेटवस्तू दिली सर्वांशी प्रेमाने वागून स्वतःच्या हाताने कॉफी करून देण्याची परवानगी मागितली सहाजिकच त्याच्या आईने सुद्धा तिला कॉफी करण्या साठी स्वयंपाक घरामध्ये पाठवले. तेव्हा राजेश घरा मध्ये हजर होता राजेश हि नकळत स्वंयपाक घरा मध्ये गेला जेनी ला भेटला आता मात्र त्याला परवानगी मिळाल्यामुळे तो एकदम निवांत झाला होता व कोणीही शंका घेण्याच कोणतेही कारण नव्हत. त्यामुळे त्यांनी पाहता क्षणी जनीला मिठी मारली. अंगावर शहरे आले, तिच्या अंगी असणारे नवतारुण्य..! तारुण्याच्या रोमान्स त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचे लहरी निर्माण झाल्या तेव्हा त्याने जनी ला स्पर्श केला. जुनीच शरीर टवटवीत झाल्यासारखा झाल. जनीचे सौंदर्य गोरे गोरे गाल. पृष्ट असे तीची छाती आणि नितंब हे बघून राजुच्या मनातील पुरुषत्व जागे झाले. त्यानी जनी ला किस करण्यासाठी तीला अजुन जवळ ओढले त्याचे ओढ जनीच्या गालावर पोहचले. मात्र तितक्यात कोणी आवाज दिला, जनी  कॉफी घेऊन खाली हॉलमध्ये गेली. आता मात्र राजेश च्या मनामध्ये जनी विषयी आतुरता व ओढ निर्माण झाली होती ती जवळ असावी असं नेहमी वाटत होतं. कॉफी केल्यानंतर तिच्या वडिलांनी सर्वांची विचारपूस केली आणि लग्नाची तारीख पुढच्या महिन्यामध्ये पक्की करण्याचे ठरवले आहे ही बातमी दिली त्या प्रमाणे सर्व तयारी चालू होती तिकडे मोनाने मात्र त्याच्या मित्रांना पोलिसांकडून जामीन घेऊन बाहेर सोडले.आता मात्र मित्र अधिकच चवताळले होते. आता त्यांनी जनी चे लग्न मोडण्याचा घाठ घातला होता. ते वेगळ्या प्रकारचे प्लॅन आखून जनीला त्रास देण्याचा प्रयत्न करत होते मात्र जनी ही साधी मुलगी नव्हती. तीने राजेश च्या मदतीने करण ज्या कंपनीमध्ये नोकरी करीत होता त्याचे मित्र आणि करण हा सुद्धा राजेश चा मित्र झाला होता. त्यामुळे, त्यांनी करण या कंपनीत काम करत होता त्या कंपनीचा मालक राजेशच्या वडिलांच्या ओळखीचा होता. त्यामुळे त्यांनी राजेशने घडलेला प्रकार न सांगता करण ची लांब बदली करण्याचे ठरवले.दुसऱ्या प्लांटमध्ये! त्यामुळे राजेशला व जनी ला या ठिकाणी बदला घेण्यासाठी यावे लागेल व या एरिया पासून लांब जाईल या पद्धतीने त्यांनी योजना केली होती आणि लवकरच त्याप्रमाणे मोनालाही आपले घर बदलावे लागले व लांबच्या दुसऱ्या शहरांमध्ये त्याची ट्रान्सफर केल्यामुळे त्या शहरांमध्ये राहण्यास गेले. आता मात्र तिला जाऊन त्या मित्रांना भेटून येण्या साठी वेळ कमी मिळू लागला. तेव्हा ती वेगळे प्लॅन तयार करू लागली.इकडे मात्र राजेशच्या लग्नाची जंगी तयारी सुरू होती. अचानक रात्री बारा वाजता फोन ची रिंग वाजली.

------------------------

( भाग १० - क्रमश:)


Rate this content
Log in