Vilas Yadavrao kaklij

Children Stories Tragedy Thriller

3  

Vilas Yadavrao kaklij

Children Stories Tragedy Thriller

जनी - भाग ८

जनी - भाग ८

5 mins
215


मोना कोणाला न सांगता प्लन करण्यासाठी घरातून बाहेर पडलेली असते व इकडे राजेशच्या घरी लग्नाविषयी चर्चा चालू असते .

मोनाने तिची मुलगी होस्टेलमध्ये सोडल्यानंतर तिच्या आईचे प्रेम नेहमी तिच्याकडे आकर्षित होत असे व ती कोणत्या ना कोणत्या कारणाने त्या हॉटेलमध्ये जाऊन इतर मुलांबरोबर तिने सोडलेल्या त्या मुलीलाही ती भेटून येत असे कारण तिने सोडलेल्या मुलीकडे फक्त तिच्या पायावर एक लाल डाग होता . त्यावरून ती ओळखता येत होती व मोनाने पूर्ण आयुष्य तेथे काढल्यामुळे तिला याची कल्पना होती ती मुलगी ज्या दिवशी दाखल केली होती बेवारस म्हणून तिची नोंद झाली होती मात्र मोनाला माहिती होतं की तीच मुलगी आहे म्हणून ती त्या प्रेमापोटी खाऊ घेऊन इतर मुलांना वाटण्याच्या निमित्ताने तिला ती भेटत असे करण अटीमुळे ती तिला स्वतःच्या घरी वाढवू शकत नव्हते त्यानंतर मात्र करण च्या पहिल्या पत्नी ची मुलगी म्हणून सांभाळावी लागत होती . व स्वतःची मुलीला घेवून येऊ शकत नाही . व घरी करणच्या मुलीला खोटे प्रेम देण भाग पडत असे .जीचा प्रेमाचा हक्क आहे तिला प्रेम देवू शकत नाही व सावत्र मुलीला खोटे प्रेम दिल्याशिवाय जीवनात स्वतःला प्रेम मिळणार नाही ? मोना सावत्र आई म्हणून पहिल्या मुलीशी वागत असे तीची काळजी घेताना तिला नेहमी स्वतःच्या मुलीचा भास होत असे मात्र ती या गोष्टी तिला विसरणे भाग होत . आज जवळजवळ लग्न होऊन सहा महिने ! होस्टेलमध्ये मुलीला सोडून आल्यानंतर ती ही जवळजवळ सहा महिन्यांची झाली होती आज सकाळी ती करण ऑफिसला गेल्या नंतर तिने मुलीला शाळेत सोडले आणि सरळ तिच्या जुन्या मित्रांकडे त्यांच्या दुकानावर वस्तू घेण्याच्या निमित्ताने पोहोचली ! तिने हॉटेलच्या बाहेर असलेले मित्र यांना आपलेसे करून खलबते करू लागली .तिने मात्र आता असा प्लॅन केला होता की जनी आणि राजेश चे लग्न मोडण्याचे व ते लग्न मोडल्यानंतर जनी ला त्रास देऊन हॉस्टेलमधून मुदत संपण्याच्या आत बाहेर काढणे . तिचे लग्न होऊ न देणेची खूणगाठ बांधली होती .आता तिने तिच्या मित्राच्या मदतीने राजेशच्या मित्रांपर्यंत जनी ची माहिती पुरवण्याचे तिने डाव रचला होता .राजचे वडील व्यवसायिक असल्यामुळे त्यांच्या संबंधित असे नवीन ग्राहक बनून तिच्या मित्रांना पाठवले व ओळखीतून तुमचा मुलगा राजेश च्या लग्नाची चर्चा ऐकली होती . अशा गप्पांच्या ओघात विषय काढला तेव्हा राजेशचे वडील बोलण्याच्या ओघात बोलले की राजेश ने एक मुलगी पसंत केली आहे व लवकरच लग्नाचा विचार चालू आहे तेव्हा मात्र यांनी संधीचा फायदा घेऊन राजेच्या वडिलांना सांगितले कि तुमच्याप्रमाणेच श्रीमंत व मोठे उद्योगपती असतील ? त्यांचा स्वतःचा स्वाभिमान जागृत करण्याचा प्रयत्न केला व एक दोन दिवस झाले या पद्धतीने विषय काढून ते विचारपूस करू लागले राजेशच्या वडिलांनी स्वतः म्हटलं तुम्ही राजेश ला ओळखता का ? हो आम्ही ओळखतो . कॉलेजमध्ये बऱ्याच मुली त्यापैकी काही मूली नां आम्हा ओळखतो .तेव्हा राजेश च्या वडिलांनी सहज सांगितलं की मी तुम्हाला त्या मुलीचा फोटो पाठवेल तुम्ही तपास करून त्याविषयी मला माहिती द्याल का ? आता मात्र त्यांचा हेतू साध्य झाल्या सारखा त्यांना आनंद झाला . कारण त्यांनी एवढी खटाटोप याच गोष्टीसाठी केली होती व त्यांना जनी .'ची खोटी माहिती पुरवून राजेश च्या वडिलांच्या मनामध्ये जनी विषयी द्वेष निर्माण करून लग्न कसे मोडता येईल याची त्यांनी खूणगाठ बांधली होती . त्या पद्धतीने त्यांनी हळूहळू नकळत सांगितले की पसंत मुलींपैकी काही मुली होस्टेलमध्ये असाव्यात असं वाटतं .जेंव्हा राजेशच्या वडिलांनी त्या मुलीचा फोटो दाखवला तो जनी'चा होता हे यांना माहिती होतं आता मात्र त्यांनी तेल मीठ लावून तिच्याविषयी वेगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगण्यास सुरुवात केली . काही दिवस तिला किडनॅप केले होते ! व ती अनौरस अशी, होस्टेलमध्ये सापडलेली , बेवारस मुलगी , असून कोणत्या जातीचा आहे ? याची कल्पना नाही अशा एक ना अनेक गोष्टी सांगून त्यांनी त्यांचा हेतू साध्य केला तिकडे मात्र राजेश आणि जनीला तीन महिण्याच्या आत लग्न होणे आवश्यक होते . यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते . एक दिवस गप्पांच्या ओघात राजेश चे वडीलानी आवाज दिला ! अरे राजेश मला तू अजून त्या मुलीचा पत्ता किंवा वगैरे दिला नाही . तेव्हा मात्र तो स्पष्ट बोलत नव्हता तेव्हा राजेश च्या वडिलांना शंका आली होती त्यांनी सांगितले की मला कळाले की पंसती पैकी बऱ्याच मुली होस्टेलमध्ये असतात !त्यापैकी तर नाही ना ? राजेश ला काय उत्तर द्यावे हे मात्र सुचत नव्हते म्हणून त्यांनी वेळ निभावून नेली नंतर आईला सांगून झाल्या प्रकाराची माहिती पुरवली अनेक वेगळे प्रयत्न करून वडिलांचे मत मिळवण्याचा प्रयत्न करीत होता व इकडे त्याचे मोनाचे मित्र मात्र मन दूषित करण्याचा प्रयत्न चालू होता . अशातच एक दिवस राजेशच्या वडलांनी त्यांच्या मित्राला मुलीला घेऊन त्यांच्या मुलीला रा जेश साठी घरी येण्याचे आमंत्रण दिले व याची कल्पना त्यांनी राजेशला दिली तुला बघण्यासाठी मित्र चांगले उद्योजक असून त्यांची एकुलती एक कन्या तिला घेऊन आपल्या घरी येत आहे . तेव्हा तुझी पंसती असेल तर पुढे गोष्टी विचार करू ! असं म्हणून राजेशला त्यांनी सूचना दिली . दुसर्‍या दिवशी ठरल्याप्रमाणे तिच्या वडिलांनी त्यांच्या मित्रांना आमंत्रित केलं होतं व त्यांची एक टि मुलगी . एक कॉम्प्युटर इंजिनिअर असून स्वत:ची कंपनीची सिवो होती . स्वतःच्या अनुभव व व्यवसायिक नॉलेज असल्यामुळे ती वडिलांचा व्यवसाय सांभाळत होती . त्यामुळे राजेश च्या वडिलांना व आईला ती मुलगी अतिशय रूपवान , रुबाबदार दिसली . ओळख करून घेण्यासाठी त्यांना काही वेळ दिला तेव्हा राजेश ला घेऊन बाहेर गेली .त्या मुलीचं नाव होतं कमला ... ! तिला घेऊन पूर्ण बंगला दाखवला व फार्महाऊसमध्ये बसले असता कमलाने स्पष्ट सांगितले अरे राजेश तू ही बिजनेस मॅन चा मुलगा आहे मीही बिझनेस मॅन ची मुलगी आहे . तेव्हा काही शंका असतील तर स्पष्ट विचार कोणत्याही प्रकारची तक्रार किंवा अडचण येता कामा नये .जो काही विचार मनामध्ये असतील ते स्पष्ट सांगावे कोणत्याही प्रकारची अडचण स्पष्ट सांग ! मी वडिलांच्या शब्दाबाहेर जाणार नाही ! कारण त्यांनी शोधलेल्या किंवा सांगितलेल्या गोष्टी आजपर्यंत कधीही नाव ठेवण्यासारख्या किंवा अडचणीच्या असतील असे मला वाटत नाही . तेव्हा मी स्पष्टपणे सांगते माझ्या कडून होकार आहे . ... ! मला तुझे आई-वडील व तुझे स्थळ पसंत आहे . तू सुद्धा तुझ्या मनात जे काही असेल ते आजच स्पष्ट सांग . ! नंतर सांगितल्यानंतर ते मलाही आवडणार नाही ! तेव्हा मात्र राजेश मुलीपेक्षाही जास्त गोंधळला नतंर निर्णय कळवतो . आता का नाही ? तेव्हा कमलाला थोडासा संशय आला . राजेश स्पष्टपणे बोलत का नाही . मी तुला नंतर कळवतो असं म्हणून दोघेही खाली आले . आई वडिलांचा दोघांनी आशीर्वाद घेतला . व निरोप देऊन ते त्यांच्या घरी पोहोचले .इकडे मात्र एक दिवस झाला . दुसरा दिवस झाला . तरीही राजेश अपेक्षित उत्तर देत नव्हता . तेव्हा मात्र राजे च्या आई ने सांगितले अरे तुझ्या मनात जर एखादी पसंत केलेली मुलगी असेल तर सांग . ! तेव्हा राजेश ने सांगितले कि ती मुलगी होस्टेलमध्ये राहते व ती माझी पसंत आहे . तेव्हा मात्र राजेश यांच्या वडिलांचा पारा चडला ...... ? ? ..व त्यांनी सांगितले तिचा थांगपत्ता नसलेली बेवारस अशी मला चालणार नाही . तुला जर ती पाहिजे असेल तर तुला हे घर सोडावे लागेल व घरासाठी तिला सोडावे लागेल . ! तुला जो निर्णय पसंत असेल तो मला सकाळी स्पष्ट सांगावा ... लग्न करायचे असेल तर या घरातून चालता हो अन्यथा त्या मुलीला विसरायच . व मी सांगितलेल्या मुलीशी लग्न करून आपण थाटामाटात राहू !

असा निर्णय दिल्यानंतर मात्र राजेश घाबरला.


Rate this content
Log in