Meenakshi Kilawat

Others

5.0  

Meenakshi Kilawat

Others

बाल संस्कार काळाची गरज आहे

बाल संस्कार काळाची गरज आहे

3 mins
4.6K


आज आधुनिक युगात बालकांचे जीवन धोक्यात आहे. मुलांना आपल्या कक्षेत ठेवणे अतिशय महत्त्वाचे झाले आहे तसेच बालपणीच आपण त्यांना घडवू शकतो अन्यथा केल्या सवरल्यावर मातीच पडेल. परंतु आपण काय करू शकतोय हे खूपच महत्वाचे आहे. मुलांविषयी महत्वाकांक्षा असावी पण तिची सीमारेषा ही ठरवावी.


बाल मनावर संस्कार करायला फक्त आई वडिलांना parentsना पुरेसा वेळ असायला लागतो. आपली पूर्ण जबाबदारी समजून वागल्यास आपली अखंड मेहनत वाया जाणार नाही, ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे. मुलांना घडवणे एक तपश्चर्याच असते. मुले सुसंस्कारी असणे ही गोष्ट अतिशय भाग्याची समजली जाते. जसे आपण बाळ जन्माला घालतो तशीच त्यांची पूर्ण जबाबदारी parentsवर असते त्यात काही दुमत नाही ही गोष्ट प्रत्येकाने जर का आपल्या मनात गाठ मारून ठेवली असता आपली मुले हमखास संस्कारक्षम बनतात.


आपण जन्म दिलेला जीव काही धातू नसतो रक्तामांसाचा, हाडामांसाचा असतो त्याला कोमल भावभावना असतात. आजकालच्या काळात मुलांच्या जीवनात व करीअरमध्ये जरा कमी-जास्त झाल्यास मुले दुखावतात, नाराज होतात, कुणाचा हस्तक्षेप त्यांना सहन होत नाही. त्याउलट parents मुलांच्या भविष्यसाठी career साठी अतिशय चिंतीत असतात. यामुळे अभ्यास करण्याचा तगादा लावतात तेव्हा मुले irritated होत असतात. तेव्हा महत्वाकांक्षेला आटोक्यात ठेवणे महत्वाचे आहे. जीवन सकारात्मक असायला पाहिजे. बालसंस्कार ही आज बदलत्या काळाची गरज आहे, ही गोष्ट समजून घ्यायला हवी आहे.


जुन्या पिढीत मुलांमध्ये सहनशीलता असायची. परंतु आता ती सहनशीलतेचे प्रमाण कमी दिसतंय. या मुलांना व्यवस्थित चालना मिळाली पाहिजे. अतिशय प्रेम देऊन जपणूक करायला पाहिजे, तसे न केल्यास जसा आत दडलेला पायातला काटा शल्यात रुपांतरीत होत असतो त्याप्रमाणे आपल्या मुलांच्या मनातले शल्य काही घटित वलय बालपणीच निर्माण होवून शल्यात रुपांतर होत असतात याची खबरदारी बालपणीच घेणे आवश्यक असते. एकापेक्षा अधिक मुलांची संख्या असायची तरी पण वातावरण एवढे प्रदूषित नसायचे आणि सर्वच मुले व्यवस्थित संस्कारीत असायची आणि समाधानाने आपले जीवन जगायची. परंतु आज आधुनिक काळात इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे संस्कार हावी होताना दिसतात.


गरीब असो श्रीमंत असो सर्वच इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे धाव घेताना दिसतात आणि मुलांना सर्व सुखसोयी उपलब्ध करून देतात. सायन्सने असामान्य खूपच तरक्की केलेली आहे ही काही कोणाची चूक नाही. ही आपल्या देशाची प्रगती आहे. ही प्रगती योग्यच आहे आणि आवश्यक आहे. सायन्सच्या जगात कोणतीच गोष्ट ही अशक्य नाही रिमोटपासून रोबोटपर्यंत साधने आलेली आहेत. अख्खे जग इंटरनेटच्या विळख्यात जीवन जगत आहे. त्यामुळे मोठमोठ्या उलाढाली होऊन व्यापार, उद्योगात अग्रेसर होऊन उन्नतीच्या शिखरावर भरीव कामगिरी करीत आहेत. त्याचा फायदा प्रत्येकाने घेतला पाहिजे. परंतु अतिरेक नको आणि आजचे parents खूपच महत्वाकांक्षी असतात त्यामुळे मुलांमध्ये भिती, राग, लोभ, प्रेम, मत्सर ह्या सगळ्याच गोष्टींचा अतिरेक हल्ली पाहायला मिळतो आहे. त्यामुळे आजकालच्या तरुण पिढीत टेंशन खूप लवकर येत असते.

suicideचे प्रमाण वाढलेले आहे. अगदी 25 ते 30 वर्षांच्या वयात उच्च रक्तदाब, मधुमेह, मानसिक व्याधींनी ग्रासलेले असतात. नाना व्यसनाच्या अधीन होताना दिसतात.


पिक्चर, अश्लील व्हिडिओ पाहून मुला-मुलींचे अख्खे आयुष्य उध्वस्त झालेले आहे म्हणून लाड पुरवायचे ते किती त्याकडे पूर्ण लक्ष असायला पाहिजे. आजकालचे काही अपत्य प्रत्येक सुख-सुविधांचा उपभोग करु पहातो. चांगले कपडे, चांगली सौंदर्य प्रसाधने, किंवा गाडीचा हट्ट, किंवा मोबाईलचा हट्ट आजच्या अपत्यांमध्ये दिसून येतो आणि या सर्व गोष्टी पालक पैसापैसा जमवून मुलांना घेवून देतात. त्यांना खूप अपेक्षा असतात. परंतु त्या कधीच पूर्ण होत नाहीत. "आपलेच दात आपलेच ओठ" समजून कोणतीही गोष्ट लपवून मुक्याने मार खाण्यापेक्षा वेळीच सावधगीरी बाळगावी. मुलांना चांगले संस्कार देवून सुसंस्कृत करून जीवनात समाधान मिळवावे आणि वेळीच बालसंस्कारासाठी पालकांनी सज्ज असायला पाहिजे.


Rate this content
Log in