Swapnil Kamble

Others

1.1  

Swapnil Kamble

Others

बाहेरख्याली

बाहेरख्याली

5 mins
17.5K


आमची नुकतीच नविन सरकारी सदनिकेमध्ये शिप्टिग चालु होती. आमच्या ह्यांची बदली बि वाँर्ड ला महानगर पालिकेत झाली होती.आमचे मिस्टर चिफ ईंजिनिअर म्हणून नुकतेच(ड्रेनेज डिपा.) रुजु लागले होते.आम्हाला पालिकेचा अधिकारी सदन(स्टाफ क्वाटर्स)मध्ये एक रुम मिळाला होता.त्याचीच आवरा आवर चालु होती.सामानाची आवरा आवर करता नाकी नऊ आली.आम्ही नवीनच दोघे फक्त होतो राहायला.


आमच्या बिल्डींगच्या खाली लागुन च बिएमसी ट्रीँसिट कँम्पमध् आहे कामगार लोक राहत आहेत.समोर गटार खाते कामगार लोकांची बिल्डींग आहे. आमच्या बिल्डींगच्या दर्शनिला धरुन एक आडवा रोड जातो त्यारोडलाच चिकटुन एक झोपडी उभी होती.त्यातुन कसला तरी ओरडण्याच आवाज येत होता.मि मुख्य दरवाजाची खिडकी उघडते व बघते तर एक बाईचा रडण्याचा आवाज ऐकु येत होता.एक दारुड्या पुरुष तिचे केस धरुन तिला आपटत होता.तिच अंग मारुन मारुन दगडावानी कडक झालं होत.सुन्न झालं होत.त्यानंतर रात्री आम्ही खुप आवरा आवर केल्यामुले आझे अंग खुप दुखत होते.आम्ही त्या रात्री झोपी जातो.

सकाळी सात -साडेसातच्या दरम्यान कोणी तरी कडी वाजवण्याचा आवाज आला .माझे मिस्टर त्यावेली बाथरुम मध्ये होते.जोर जोरात दरवाजावर ठोकण्याच आवाज वाढत होता.मी दरवाजा उघडते तर, एक बाई कुरल्या केसांची,रंग काळा सावळा,अंगानी मध्यम बाध्याची, जमतेम चाळीस पंचेचाळिस वयाची असनार,कपाळावर भळा मोठा कुंकवाचा टिळा,गळ्याभोवती काळ्यामण्याच मंगळसुत्र,काष्टी पाताल साडी घातलेली. मँडम नमस्ते,मी मंदा... तुमच्या अगोदर कुलकर्णी मँडम होत्या ना, त्यांच्याकडे मी लादी पोचा करायची. तु घरकाम करतेस.....मि म्टले मँडम तुमच नाव ..? मी मिसेस.शिंदे... "शिंदेमँडम...: 'तु राहतेस कुठे' 'समोरच्या झोपडीत' ...उत्तर येते. 'घरी कोण कोण असते, 'एक मोठी मुलगी दुबईला असते,ती पण घरकाम करते तिकडे, 'एक अपंग मुलगा, एका मुलाने पळुन लग्न केले, आता तो कुठे राहतो माहीत,नाही सांगत नाही, 'एकदा बायकोला घेवुन आला होता,तेवढाच' 'कुठल्यातरी साहेबांच्या येते ड्राव्हर आहे, एवढच माहीत, 'आता आम्ही नवरा बायको , व एक अपंग मुलगा' 'मोठी मुलगी येथे दोन तिन वर्षाने ' 'तिचं पण लग्न केले, तिकडेच' अच्छा,म्हजे रात्री ओरड्ण्याचा आवाज येत होता तो त्याच झोपडीतुन का..? हो, बाई....!मीच ओरडत होते. 'तो माणुस,तुझा नवरा का?.., 'तो माझा नवरा आहे, 'किती मारतो तुला...! 'का मारत होता.., 'काही नाही,रात्री जास्त ठोसकली होती' 'माझ्यावर संशय घेत होता'मी उशीरा येते म्हनुन, 'चार-चार कामे करुन उशी र होतो' 'एवढी घरकामे करतेस' 'नवर्याची जातचमुली संशयीमनाची, 'अलिया भोगाशी,कसं तरी ढकलायची गाडी, ...मी जास्त काय बोलत नाही तिला "उद्या ये"एवढे बोलुन मी तिचा निरोप घेते. ती दुसर्या दिवशी सकाळी त्याच वेळेला येते.लादी पोचा करते.व रात्री पुन्हा जेवण्याची भांडी घासायला येते.


कधी कधी रात्रीचे जेवन आम्ही बाहेरुन आँडर करुन मागवायचे.उरलेले जेवन ती घेवुन जायची.कधीतर हे कामातुनच घेवुन यायचे,मग मी तिला खिडकीतुन आवाज देवुन बोलवायची.ती लगेच धावत यायची. असे खुप दिवस जात होते.कधी तिचा नवरा रात्री अपरात्री मारण्याचा आवाज ऐकु यायचा , मग मी तिला विचारायची तु हे कसे सहन करतेस, त्यावर ती म्हनायची की,'नशिबाचे भोग'बोलुन निघुन जायची.कधी कधी तर ती बोलायची की,' बाईचा जन्मच मुलात..मार खाण्यात जातो.' 'शेवटी संसार हा दोघांनाच रेटायचा आहे' 'नवर्याला उलटे बोलुन चालत न्हाय ..बाई' "तुम्ही कधी मार खाल्ला का?...साहेबांना वेसन वगैरे नाही की?... "नाही.." 'नशिबवान आहात बाई,...तुम्ही शिकली सवरलेली माणसे नवरा बायको मध्ये भेद करीत नाही. 'माझा नवरा बोलतो की, ज्यांना कसलंच नाद नसतो ना, ते" बाहेरख्याली "असतात. "म्हनजे" 'म्हनजे,बाईचा नाद असतोया,साहेब लोक हे हप्त्यातुन "लेडीजबार"किंवा "मुजरा"बघायला हजेरी लावयला जातैत...तस.., बस्स..!बस्स...! किती बोलतेस..मी रागानेच भडकले. "माझ्यानवर्यावर माझा पुर्ण विश्वास आहे" मी बोलते. 'असु द्या, असु द्या..!जे आमचा नशिबी नाही ते तुमचा तरी आहे. त्यादिवसापासुन माझ डोकं चकरावु लागल.ती काय बोलतेय हे तर मी वर्तमान पत्रातुन वाचते रोज..पण आपल्या नवर्यासंबंधी मी ऐकु किंवा वाचु शकत नाही. अधुन मधुन रात्रीचा त्याबाईचा नवरा तीला मारायचा. खिडकितुन एक मिणमिणता दिवा पेटलेला झोपडीत दिसायचा.

एकदा तर सकाळचा खुप बेभान मारलं तिला,चक्क लाथा बुक्याने तिला जर्जर केल.मी मध्यस्ती केली.तिला सोडवुन आणले.त्यावर मला बघुन तो जरा बिचकला,'मँडम,माफ करा एवढ्यापुरते...." मी तिला माझ्याकडे दिवसभर ठेवते.रात्र होते.नवर्याचा ओरड्यानाचा आवाज येतो.पण मी तिला जावु देत नाही,मी म्टलं"थांब ,थोडा वेळ,जिरवु त्याची उपाशी पोटी पोटात कावळे ओरडतिल तेव्हा समजेल. मी तिला माझ्याकडे दिवसभर ठेवते.रात्र होते.नवर्याचा ओरड्यानाचा आवाज येतो.पण मी तिला जावु देत नाही,मी म्टलं"थांब ,थोडा वेळ,जिरवु त्याची उपाशी पोटी पोटात कावळे ओरडतिल तेव्हा समजेल. त्यादिवशी खुप उशीरापर्यंत ती होती. 'बाई,जावु द्या,नवरा उपाशी आहे" "दिवसभर अंगमेहनत करुन वैतागतो बिचारा" 'हातगाडी ओडुन दिवसभर, वरती धंदेवाल्याची बोलनी ऐकावी लागतात त्याला, 'दिवभरचा राग, पिवुन माझ्यावर काडतो, 'बायकोवर नाही काडनार मग, कोनाला सांगनार, "त्याचा शिवाय माझे कोण आहे, ह्या दुनियेत" 'मारलं झोडलं तरी तोच माझा धनी, 'लोक काय आता येतील, डोळे पुसायला मग, आपल्यालाच जिवन कंटायच हाय, 'नवर्याबिगर जिवन नाही, 'जा मग,खा मार' काही दिवस शांत गेले मग,खिडकितुन तोच मिणमिणता दिवा , रोज रात्रीचा पेटलेला असायचा.रात्रीचा कुत्रांचा भुंकण्याच आवाज व त्या झोपडीतुन विव्हळन्याच आवाज एकजिव व्हायचा. पुन्हा तेच 'तु तु मै मै ' चालु झाली. एकदा तर बाई म्हनाली, ' 'नवर्या बायकोच्या भांडणात पडु नका बाई, एकदा अशीच घर काम करताना,कपडे वांशिंग मध्ये धुवायला सांगितले होत.कपडे धुवायला घेत असताना तिचा हात पँटीच्या खिशात चाचपुन बघते तर, तिला 'गजरा' सापडतो.ती धावतच माझ्याकडे येते, 'बाईसाहेब, रात्री वाटत गजरा द्यायला विसरले साहेब, 'काय, 'होय,बाईसाहेब हा बघा गजरा,.हात पुढे करुन दाखवते. मी थोडे बिचकते, मला गहिवरुन आले मी एकप्रकारे त्यादिवशी बाई बोलली होती की,' मुजरा बघायला जाताना पुरुष हाताच्या मनगटात गजरा ओवळतात. आता तर तिच्या दुःखापेक्षा माझे दुःखाचे ढग गडद मोठे मोठे होताना दिसत होते.माझ्या दुःखाचे आभाळ तिच्या दु:खा पुढे ठेंगने वाटु लागले.तिच्या आयुष्यात आता लुडबुड करायचे सोडले;पण आता माझ्याच संसारात मी लुडबुड कारायला लागले होते.

मी तिच्या नवर्याला दारुड्या , व्यसनी समजत होते.पण ते कदाचित त्याचे खरे रुप असेल .....त्यात लपवुन ठेवत नव्हता.बायकोला मार झोड करतो ..पण बायकोला फसवत नाही , बायकोपासुन काही लपवत नाही. माझ्या मनात संशय कल्लोळ वाढत होता.खरंच मला माझा नवारा सर्व गोष्टी मला शेअर करतो का?.की तसा आमच्या संवाद होतच नाही.मी आजुन माझ्या नवर्याला पुर्ण नाही ओळखु शकले कदाचित...... त्या दिवशी माझा नवरा उशीरा येतो.त्यादिवशी एकदा नवर्याल विचारुन पाहु खरे की खोटे . पुन्हा मी त्याचे कपडे चाचपडते, त्यावर शर्टाच्या काँलरवर एक लांब लचक केस.....एवढा मोठा केस हा बाईचा असु शकतो. फ्रेश झाल्यावर ...जेवन उरकुन ..वामकुक्षी घेण्याआधी..नवर्याला मी थोडे ...रोमानंस मुड...ध्ये प्रेमाने ..विचारते, 'सकाळी कपडे धुवताना पँंटीच्या खिशात गजरा सापडला, 'तुम्ही मला कधी गजरा आणीत नाही, 'आज तुमच्या काँलर वर "केस" सापडला .....लांबलचक ....बाईचा ....., 'काय म्हनायंचय तुला,.....नवरा. तुम्ही. लेडीज बार किंवा मुजरा वगैरे बघायला ...जातात का....? 'नाही ...म्हटल'...... हल्ली साहेब लोकाना.......लेडीज बार चा "शोक" भारी आहे. साहेबांना सर्वेच 'बाहेरख्याली'म्हनतात...असं ऐकलंय. 'हल्ली लेडीज बार व मुजरा बघंन हे फँशन आहे...ह्या ला प्रतिष्टीत लोकांच राहानीमान स्टेटस वाडतो., 'आमचे वरिष्ट साहेबांबरोबर जातो कधी कधी ...त्यांची मर्जी करावी लागते' 'म्हजे,तुन्ही..बाहेरख्याली' आहात तर, त्याला ....उच्च लोकांचा स्टेटस ...प्रेस्टिज...बोलतात. 'मला ते पटत नाही' '

म्हजे,तुन्ही..बाहेरख्याली' आहात तर, त्याला ....उच्च लोकांचा स्टेटस ...प्रेस्टिज...बोलतात. 'तु माझ्यावर संशय घेतेस का?, 'तुम्ही जाता हे का नाही सांगितले, 'ह्यात काय सांगण्यासरखे, 'तुझा माझ्यावर विश्वास नाही का?, हो ,आहे ना, 'तुम्ही तसे काही नाही करनार ते, पण,.. ..पन बिन काही नाही ....कोणी काही सांगो ..... 'आपला आपल्या मांसावर विश्वास असावा, 'अशा संशयीवृत्तीमुळे,तुझी संसार उध्वस्त करशिल,

"संशय माणसाला निर्बुध्दी बनवते,विश्वसावरच संसार चाालत असते, 'हो,खरंच मिउगाच तुमच्यावर खार खाते, 'अग,तुझ माझ्यावरती,त्याप्रेमापोटी तु माझ्यावर संशय करतेस, तुझ्याशिवाय माझ्याआयुक्षात कोणीनाही. 'नवरा बायकोवर विश्वास नसेल तर संसार बिघडतो, 'मि उगाच भावनेच्या भरात बोलले, त्या रात्री मनात असलेल संशयी ढग स्वच्छ व नितळ झाले हेते. पण .....तरीसुध्दा माझे संशयी मन झोपु देत नव्हते. मी मनाच्या मनात म्हनत होते की,का आपन संशय करावा आपल्या नवर्यावर, ह्याने काय सिध्द होईल. मध्यरात्री मी आपसुक जागी होते .पुन्हा उठुन समोरची खिडकी उघडते .पाहते तर समोरच्या धोपडीत तो मिनमिनता दिवा पेटलेला होता.ते दोघे गाढ निंद्रेत होते .पण मलाच झोप येत नव्हती .अधुन मधुन कुत्री भुंकण्याचा आवाज येत होता .दाट काळोख पसरला होता.अगदी वातावरन सुन्न झाले होत.हळकी मंदसी गार झुळक खिडकीतुन येवुन मनाला टोचत होते. रात्रभर डोळा लागला नव्हता.पहाटे पाच साडे पाच वाजता थोडी डुंलकी घेतली .त्यानंतर अचानक कसला तरी रडण्याचा भास होतो.मी ताडकन जागी होते.समोरची खिडकी उघडते तर त्या झोपडीतुन रडण्याचा आवाज येत होता.मी फ्रेश होवुन खाली जावुन पाहते तर खुप मानसे जमा झाली होती.ती कामवाली बाई रडत होती.तिचा नवर्याचे प्रेत चादरी मध्ये लफेटुन ठेवले होते.त्यानंतर त्याचा अंतविधी चंदनवाडीत विद्युद दहन करण्यात येते.तेरावे व शोकविधी एक हप्त्येने ठेवला होता.ती खुप रडत होती.आता एका अपंग मुलाला. कसे संभाळणार हे तिला एक कोडेच पडले होते. पंधरा दिवसानी अगदी काहीच न झाल्यासारखी त्याच वेलीस कामाला येते.मी लगेच दार उघडते.माझ लक्ष तिच्या गळ्याकडे व कपाळावर जाते.गळ्यात तिचा तेच काळ्यामण्याची दुड, कपाळावर कुंकू, हातात एक हिरवी बांगडी असा पेहराव रोजचाच पा हीला व मी आश्चर्य चकीत होते.अगदी काहीच नविन न घडल्यासारकी वावरत होती.मी तिला त्या दिवशी विचारले नाही ती मुकाट काम करीत असायची.काहीच बोलायची नाही .तिचा जिवनातील सोभती गेला होता.तिला आता फक्त एका आशेचा किरण तिचा मुलगा हाच एक शेवटचा जगण्याचा मार्ग दिसत होता.ति यायची तिचे केस विस्कटलेल आशा अवस्थेत यायची.पण ती काम नेकीने करायची .."माणुस हा कधीच संकटाना घाबरत नसतो" अशी ती नेहमी म्हणायची . "बाईही कमजोर मनाची असली तरी, अंगमेहतीने मजबुत हवी"तरच ती एकटा पण संसार करु शकते......अशी ती कधी कधी पुटपुटायची स्वता:शीच एक दिवस मी तिला विचारते की,' तिच्या नवर्याचा मृत्यु कसा झाला ?.... "नशिबाचे भोग"....उत्तरायची 'गळ्यात तरी मंगळ सुत्र व कुंकु का लावतेस,मी पुन्हा वि चारले. .'नवर्याची साथ जन्मी सोडायची नाही , मग नवर्याची निशानी का काडायची....... तिचं हे उत्तर म्हजे एक स्री जातीत एक बदसाव एक नविन विचार प्रबोधन होतं. शेवटी. मी तिला नवर्याविषयी विरल्यवर नंतर मला समजले की, तिचा नवर्यायचे अनैतिक संबंधामुले त्याचा "बाहेरख्याली "स्वभावामुले, मृत्यु ने त्याचवर झेप घेतली. त्यानंतर तिची दुबईला राहायला गेलेली मुलगी तिला घेवुन आली होती प्ररंतु ती जात नाही व तिला सांगते की, "शेवटचा श्वास हितेच घ्यायचाय ह्या झोपडीत"असे बोलुन ती पुन्हा आपल्या कामाला लागायची. असे कित्येक महिने वर्ष गेली पण ति आहे त्याच ठिकाणी राहत होती.आता त्या झोपडीतुन रडण्याचा विव्हळ्याचा आवाज येत नव्हता. खिडकी उघडता तोच रात्रीचा मिणमिणता दिवा पेटत असायचा. रस्त्यावर कुत्री एकटीच भुंकत असायची.मध्येच पोलिसांची पेट्रोलिंग असायची तेवढीच. एक दिवस एक कुत्रा तिच्या झोपडीच्याबाहेर जीभ काढुन जमिनिवर बसला होता.ति त्याच्याकडे बोट करुन काहीतरी बोलत होत,'तु ह्या जन्मी कुत्रा चा रुपात कसा आलास ..माझा पिछा सोडणार नाहीस , मरे प्रर्यंत ......माझ्या जिवाचा काळ.....मेल्यावरही.....संशय वृत्ती सोडलीस नाही...शेवटी आलासच पुन्हा.......... रात्रीचा तिच्या त्या कुत्राबरोबर एकटीच बोलत बसायची वेड्यासारखी....आपल मन त्या च्यासमोर हलके करायची...मनात खद खद ण्यार्या भावना हलक्या करायची.....कधी कधी मुलगा उठुन.........च्यावर खेकसायचा.......रागाने ....... एकदिवस मी तिला विचारते की,'तुझा झोपडीतुन बोलण्याचा आवाज याेतो कधी कधी ,....कोणाशी असतेस एकटीच .... "नवर्याशी"ती बोलते. "काय...?......मी दचकुन बोलते. "मी कितिंदा सांगितले , मेल्यावर माणव वंशातच जन्म घे म्हनुुन पण मेल्याला घाय लागली होती, .......आलं कुत्राच्या मोसान" ...मानगुुुुटीवर. बसायलाा"


"मी कितिंदा सांगितले , मेल्यावर माणव वंशातच जन्म घे हनुन , पण, मेल्याला घाय लागली होती, .......आलं कुत्राच्या मोसानं....सुड घ्यायला ..... मी कधीही तिच्या जिवनाची गिनिते समजु शकलो नाही. असे तित्येक दिवस महिने लुटली.रोज त्याच खिडकीतुन मी तिचा आयुष्यात डोकावुन पहायची.तोच आवाज भुंकण्याच कुत्राचा , तिचं एकटच बडबडणे,रात्री अपरात्री एकटीच शिव्या देणं चालु च होतं.तोच मिणमिणता दिवा, सुनसाट रस्ता ,..असंच जिवन चालंत होत.अशाप्रकारे तिला कधी वाटायच तिला मानसिक आजार जडलाय. त्यानंतर अचानक. ती कामाला यायची थांबली .तिची तब्बेत बिघडली.ती बिछानाला खिळली .अधुन मधुन मी तिची भेट घ्यायची.ती अदबिने मला बसायला सांगायची , मध्येच उटायची प्रर्यंत करायची .व कधी कधी म्होणायची की ," वर्षाचा आत घेवुन जाईल मेला"....माझ्याशिवाय करमत नाही.तिच प्रेम नवराप्रति पाहुन माझा ऊर भरुन यायचा. एकदिवस खरोखरच तो दिवस उजाडला ....वटपोर्णीमा दिवतिची अखेरची ज्योत मावळली.त्या. सकाळी सहा वाजता रडण्याच आवाज त्या झोपडीतुन आला.कुत्राचा विव्हळण्याच आवाजही त्यात येत होता.मी खिडकी उघडली पाहते तर खरंच ....माणसे जमा झाली होती झोपडीभोवती. अखेर तिचा मुलाने अंत्यसंस्कार केला.त्यानंतर दोन तिन दिवसाने तिची मुलगी येते .व तिचे तेरावे त्याच झोपडीत करतात.तिचा अपंग मुलाला तिची मुलगी घेवुन जाते.झोपडी आता सुन्नी सुन्नी वाटत होती.झोपडीभोवती तो कुत्रा फिरक्या घेत होता. रात्री जेवन वगैरे उरकुन खिडकी जवळ आली पाहते तर त्या झोपडीच्या बाजुला स्ट्रिट लँपच्या उजेडाने दोन कुत्रे बसलेली त्या झोपडीच्या बाजुला एकमेकांना ओरबडताना दिसत होती त्या मंद प्रकाशात. दोन तिन दिवसानी मुनिसिपाल्टीची गाडी येते.व त्या झोपडीवर बुल्डोजर फिरवते.पण त्याच क्षणी ती दोन कुत्री आक्रमक होतात.त्या बुल्डोझरवर धावुन जातात.त्यासरशी तिथे आलेले कामगार तिथरबिथर होता.कुत्री खुपच हिंस्र झाली होती.जनु काही आपल्या. हक्का साठी लढत होती.नंतर कुत्रे पकडनारी गाडी पकडुन घेवुन जाते त्याना.व अखेरचा बुल्डोजर त्या झोपडीवर फिरवला जातो.त्या झोपडीत वसलेल्या आठवणी चक्का चुर होतात एका क्षणात . काहीदिवस मी आता ती खिडकी उघडायचे सोडुन दिले होते.पण एक दिवस मी रात्री ची पुन्हा ती खिडकी उघडते व काय पाहते ते माझ्या डोळ्यावर विश्वास बसण्यासारखे नव्हते .ती दोन कुत्री त्या लाईट खांबाच्या प्रकाशात झोपडीजवळ झोंबत बसली होती.



Rate this content
Log in