Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

अती तेथे माती

अती तेथे माती

1 min
150


एक गाव होते. त्या गावात एक गरीब भिकारी राहत होता. तो दिवसभर भिक मागून आपला उदरनिर्वाह करत असे. एका दिवशी त्याला कोणीतरी सांगितले की इंद्र देवाची साधना करत. तो प्रसन्न झाला तर तुझे दारिद्रय संपेल.भिकाऱ्याने इंद्र देवाची तपस्या सुरू केली.

       खुप खडतर तपस्या केली. यावर इंद्रदेव प्रसन्न झाला. कृपा म्हणून इंद्र देवानी त्यास सुवर्ण नाणी देऊ केली.भिकाऱ्याने आपली पसरली. तेव्हा इंद्र त्यास इशारा दिला की झोळीतून नाणे जमीनीवर पडले की त्याची माती होईल. भिकाऱ्याने आपली झोळी भरताच इंद्रास थांबवले.

        झोळीत मावले तेवढे सुवर्ण नाणी घेऊन आनंदाने घरी आला. नवीन कपडे, खाऊ, घेतले. घर बांधले.गावात सर्वाना आश्चर्य वाटले की हा एकाएकी श्रीमंत कसा झाला.त्याच्या एका मित्राने त्यास विचारणा केली.त्यास भिकाऱ्याने आपली सर्व हकीकत सांगितले.. ते ऐकून तो पण इंद्राची तपश्चर्या करण्यास सुरुवात केली.

          त्याच्या तपश्चर्या ने इंद्र प्रसन्न झाला. इंद्राने त्यालाही सुवर्ण नाणी देऊ केली. त्याने झोळी पसरली, झोळी भरली पण तो बेभान होऊन गेला आणि सुवर्ण नाणी खाली पडू लागल्या. तेव्हा तो भानावर आला आणि पाहतो तर सर्व सुवर्ण नाणी माती होऊन गेली होती. तो नाराज झाला. एवढे करूनही आपण काय करुन बसलो  . 


Rate this content
Log in