Suhas Belapurkar

Others


4  

Suhas Belapurkar

Others


अरे बघतोस काय, मुजरा कर!

अरे बघतोस काय, मुजरा कर!

1 min 227 1 min 227

मध्यरात्रीच्या सुमारास नेते साहेबांची फॉर्च्यूनर घोडबंदर रोडवरून सुसाट वेगाने जात होती. एवढ्यात एकाएकी ड्रायव्हरने करकचून ब्रेक दाबला. गाडी थांबली, गणप्या…. काय झालं..?. आणि.. नेते साहेबांनी एक कचकचीत शिवी गणपत ड्रायव्हरला हासडली.. गणपत थरथरत्या आवाजात कसाबसा म्हणाला... साहेब….जनावर… साहेबांचं लक्ष फॉर्च्युनरच्या समोरच्या काचेतून दोन चकाकणाऱ्या डोळ्यांकडे गेलं.


साहेब स्वतःच्याच मस्तीत, नशेत खाली उतरले आणि बिबट्यासमोर जाऊन उभे राहिले. त्याच्याकडे बघून म्हणाले ए... चल... सरक… सभोवतालच्या उंचच उंच इमारतीकडे पाहात बिबट्याला म्हणाले.. तुला माहित आहे का, या सर्व जंगलाचा राजा कोण आहे? तारवटलेल्या डोळ्यांनी उजव्या हाताची तर्जनी उंच करून स्वतःकडेच दाखवत मागे उभ्या असलेल्या बॉडीगार्डला म्हणाले.. अरे बघतोस काय.. घाल गोळी..


अंगरक्षकाचा हात पिस्तुलाकडे जाताच बिबट्याने विद्युत वेगाने झडप घातली आणि नेते साहेबांच्या छाताडावर बसला व त्यांना म्हणाला, अरे मी नव्हे, तूच माझ्या राज्यात आला आहेस.. आणि हो.. जो राजा स्वतःचे रक्षण स्वतः करू शकत नाही, तो कसला राजा... 


खाली पडलेल्या साहेबांच्या छाताडावर पाय ठेवून तीक्ष्ण नजरेने बॉडीगार्डकडे पाहून बिबट्या म्हणाला, अरे बघतोस काय मुजरा कर!


Rate this content
Log in