अफवा
अफवा
शांतीवाडी एक लहानसं गाव या गावाची लोकसंख्या फारच कमी, या गावात सुषमा, आणि तिचं कुटुंबही गुण्यागोविंदाने नांदत होते. गावात शेतीवाडी दुखती जनावरे संपूर्ण हिरवळीने व्यापलेल्या या गावात नेहमीच वातावरण शितल असेच होते. या गावातील लोकसंख्या जरी कमी असली तरी गाव नेहमी प्रसन्न आणि माणसाने भरलेले वाटे. गावात एक-दोन मंदिर सोडल्यास गावाच्या वेशी लगतच असलेल्या उंच डोंगरातून बारमाही लहानसा पीण्याचा झरी डोंगराच्या कपारीतून वाहत खाली येत असल्याने डोंगराच्या पायथ्याशी जमा असलेल्या या पाण्याला कठडा बांधून जमा केल जाई. लोक आपल्या परिसरात बारमाही पीक या पाण्यामुळे घेत.गावातील गुरंढोरं या पाणवठ्यावर जाऊन पाणी पित असत. बायाबापड्या या पाणवठ्यावर घरची धुणी घेऊन येत अन् विरंगुळा म्हणून अधिक वेळ तिथे बसत... अशा या देखण्या गावात कधीकधी पर्यटक भेट द्यायला येत. आलेल्या पर्यटकांचे स्वागत करणे त्यांना गावात असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती देणे, त्यांना पूर्ण गाव फिरून झाल्यावर एका धर्मशाळेत उतरवून सुषमीचे सासरे रामदत्त मोठ्या अभिमानाने आणि आवडीने काम करत. आज सकाळी ते आपल्या अंगणात चहा पीत बसले असताना त्यांच्या बाजूला असलेल्या गणप्या आरोळी देत गावात आला... रामदत्त ह्याना सगळ्या गावातील मंडळी अण्णाराव असं म्हणून संबोधित अण्णाराव, असत. आलेल्या सर्व पर्यटकांना फिरवता फिरवता अण्णा जणू गावचे भूषण होऊन गेले होते. पूर्ण गावच्या पंचक्रोशीत अण्णांची ओळख फार मोठी होती. अण्णांना गावात एकही माणूस ओळखत नाही अस नव्हतं.
एक दिवस कधी आण्णाराव कुणाला दिसले नाही तरी अण्णांच्या यांची चौकशी गावातील लोक मोठ्या आपुलकीने करीत. अण्णा हे स्वभावाने फार मनमिळावू असल्याकारणाने त्यांच्या चेहर्यावर नेहमी हास्य फुलले असायचे, अण्णांना लहान मुलांविषयी फार कौतुक वाटे. त्यामुळे अण्णा कुठे दिसले मुलांचा गराडा होई. पर्यटकानी, अण्णांना दिलेल्या मोबदल्यातून अण्णा एक हिस्सा आपल्यासाठी ठेवून बाकी घरात सुषमाच्या स्वाधीन करत असत. आयुष्यात फक्त अण्णांना चहाचे तेवढच वेसन, होतं बाकी अण्णा सुपारी सुद्धा तोंडात टाकत नसत. राहिलेल्या पैशातून अण्णा मुलांना चॉकलेट गोळ्या आवडीने घेऊन देत. कधीकधी गावात पर्यटक संख्या वाढली असताना अण्णाना जास्त मोबदला मिळाल्यावर अण्णा त्या पैशातून गावातल्या मुलांना वही, पेन्सिल, पेन ,पुस्तक, घेऊन देत. त्याचबरोबर एखाद्या गरीब व्यक्तीला आणि गरजू व्यक्तीला मदतही करत असत. आजारी माणसांची सेवा करणे हा अण्णांच्या आवडता छंद, तोही मनापासून तो जपत असत. अण्णा गावचे जणू भूषण होते. एक दिवस कोण जाणे काय बिघडले. ते कोणाच्याही लक्षात नाही आले.
सकाळीच अण्णा फेरफटका मारत असताना त्याच वाडीतला रम्या नावाचा मुलगा अण्णा पाशी धावत येऊन म्हणाला... अण्णाराव गावात पाहुणे आलेती ते तुमचीच वाट बघत या ओढ्यापाशी थांबले!! अण्णां धावतच ओढ्यापाशी आले आलेल्या पर्यटकांची आपुलकीने चौकशी केली. त्यांच्या बोलीभाषेवर अण्णनांना कळलं की ते इंडिया बाहेरचे आहेत. त्यांच्या राज्याचं नाव विचारल्यावर अण्णांना कळलं युकेवरून आलेले आहेत हे कळल्यावर अण्णांना मोठा आनंद झाला. बाहेरगावावरून आलेली ही माणसं अण्णांना जरा जास्तच मोबदला देत. त्यामुळे घरात देऊन जरा जास्त पैसे अण्णांकडे राहत अण्णांकडे जरा जास्त पैसे राहिले की अण्णा ते मनमुरादपणे गावातल्या लोकांवर आणि मुलांवर लुटत असत. अण्णा कोणत्याही घरी जरी उभे राहिले तरी इथली मंडळी त्यात चहा पिल्याशिवाय पाठवत नसत. त्यामुळे अण्णांचे पैसे वाचत..
पर्यटकांना घेऊन अण्णा प्रथम गावच्या वेशीवर डोंगरातून वाहणाऱ्या लहानसं झरा दाखवून ते साईटला जरा उभे राहिले.. तोपर्यंत पर्यटकाने त्या डोंगराच्या आतून फोटो काढले डोंगराच्या कडेवर नुकताच उतरलेला रवी सोन्याची किरणे घेऊन धरतीवर अवतरला होता.. ते सौंदर्य पाहून ते पर्यटक मंत्रमुग्धतेने फोटो काढत राहिले. मनमुराद तिथली मजा लुटल्यावर अण्णा त्यांना पुढच्या गावच्या मध्यभागी असलेल्या मंदीरापाशी घेऊन आले. गावातले ते मंदिर जुन्या घडणीचे असल्याकारणाने अत्यंत सुबक कलाकुसरीने मंदिराचे खांब सुदंर दिसत. अत्यंत मन मोहक वाटणारी मंदिराची कमान तर जणू मंदिराची शोभा वाढवत होती... त्याहीपेक्षा मंदिराचे सौदंर्य गाभाऱ्यात असणाऱ्या राम, लक्ष्मण, जानकीच्या विलोभनिय मूर्त्या अत्यंत मोहक आणि सुंदर भासत होत्या.. पर्यटकाने याही मंदिरात आणि आजूबाजूचा निसर्गाचे फोटो काढून ते पुढच्या बाजूच्या लहानश्या वाटेवरून गावाला वळसा घालून आडवाटेवर असलेल्या हनुमान मंदिराच्या टेकडीवर आले. हनुमान मंदिरच्या टेकडीवर येता-येता संध्याकाळी त्यांना पाच वाजले होते. सूर्य नुकताच मावळतीला झुकल्या कारणाने त्याची सकाळ जास्त सोनेरी पिवळीधम्मक किरणांनी पिंपळाच्या सळसळत्या पानातून हनुमान मंदिराच्या कळसावर टीकून होती.. कळसही झगमगताना दिसत होता. सोबतीला सळसळणारा वारा, रातराणी फुलत असल्याची जाणीव करून देत होता. लपाछपीचे खेळ सूर्यकिरणे करत असल्याचे पाहून पर्यटक तिथेच सात वाजेपर्यंत बसून राहिले. अण्णांनी त्यांना पूर्ण परिसर फिरून दाखवल्यामुळे इथून ते आता बाहेर निघणार होते. त्यांच्याशी हात मिळवणी व रामराम करून, अण्णा आपल्या वाटेने आणि पर्यटक आपल्या वाटेने निघून गेले. संध्याकाळी सातच्या सुमारास खेळत असलेल्या मुलांना अण्णांनी खाऊ घेऊन देते.. ते आपल्या घरी आले.. घरी येऊन त्याने प्रथम स्वच्छ स्नान केलं सुनेने आणून दिलेले जेवण जेवले...
आज कमाई जास्त होती ..ती सूनेजवळ दिली..मुलाने अण्णांचा बिछाणा केल्यावर अण्णा बिछान्यावर पडल्या पडल्या थकले असल्याकारणाने पटकन झोपी गेले..
सकाळी सहाच्या सुमारास अण्णांची सून सुषमा उठून पहिल,पूर्ण घराचा परिसर झाडून काढला .त्यानंतर तिने स्नान करून ,देवपूजा करून, सुषमाने रोजच्याप्रमाणे चहा केला.. चहा कपात ओतून ती पहीली अण्णाना द्यायला गेली...सुषमाची यायची वेळ झालेली असल्याने अण्णा नेहमी सुषमा ची वाट पाहत बसलेले असत ..पण आज तिला अण्णा वाट न पाहता झोपलेले पाहून तिला जरा आश्चर्यच वाटलं ..चहाचा कप बाजूला ठेवून अण्णांना दोन-तीन हाका मारल्या अन्नाने हाकेला प्रतिसाद देत नाही पाहून तिने हाताने अंगावरची चादर बाजूला केली आणि त्यांच्या अण्णाच्या अंगाला स्पर्श करताच अंगात भरपूर ताप असण्याचे तिला जाणवलं त्याही परिस्थितीत तीव त्याना उठून बसवलं आणि आपल्या नवर्याला हाकेन बोलून घेतल..अण्णांच्या तोंडाला पाणी लावून कसाबसा चहाचा कप त्यांच्या तोंडाला लावला. पण अण्णांनी आज चहा घेतलाच नाही ..मुलाने गावात जाऊन रिक्षा आणली आणि अन्नाला बाजुलाच असलेल्या दवाखान्यात नेल..डाँ.गोळ्या औषध देऊन घरी पाठवलं ...औषध घेवूनही अण्णाच्या तब्येतीत सुधरणा नजानून...पून्हा दवाखाणा ,अस सत्र 5ते6 दिवस चालू असूनही गूण येण्याची चिन्हे नव्हती..एव्हाना गावाला अण्णाच्या तब्येतीविषई कळून जोतो येवून अण्णांना पाहून जाई...आणि त्या रात्री गावचा संपंच टीव्ही पाहात असताना बातमीत समजल की पदेशी कोरोना नावाचा रोग य़ेवून तो भारतातही पसरला आहे ..यावर औषध नसून तो बरा हेण्याची चिन्हे दिसत नाही...आजारी माणसांची लक्षणे.. अमुक.. असं ऐकताना सरपंचाला आठवलं, ही सर्व लक्षणे अण्णांमधे दिसून येत आहेत.. लगेच गावातल्या प्रत्येक घरात अण्णाच्या अजारपणाला कोरोनो हे नाव देवून गाव मोकळा झाला.. आणि तडकेफड गावाने अण्णांना त्यांच्या कुटुंबासकट गावातून बाहेर काढायचा निर्णय घेतला... हे केलं तरच गाव या रोगाच्या तावडीतून वाचेल..
क्षणात होत्याच नव्हतं झालं.. गावचं भूषण असणारे अण्णा एकाएकी गावचे भक्षक झाले... सर्व गाव एका बाजूला ,आणि अण्णाच कुठूंब एका बाजूला ..अण्णांच्या कुठूंबाला लोकानी जनू वाळीत टाकलं..तरीही त्या गावात अण्णांच्या कुटुंबावर गाव सोडण्याची सक्की केली जात होती.. परंतु कुठे जावं हा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून ऊभा होता...
सुषमाने गाववाल्यांना विनवणी केली.. आम्हाला आमच्या घरात राहू द्या... तुम्ही कुणी नाही आलात तरी वाईट वाटून घेणार नाही.. परंतु तिचं कुणी ऐकलं नाही.. परिणामी हताश निराश झालेल्या त्या निराधार कुटुंबाने गाव सोडला... सोबतीला जमेल तेवढं सामान घेवून ते कुटुंबं उघड्या धरतीवर... दिवस काढत राहीलं... घर गाव असून निराधार... परंतु गावाला दया आली नाही... परंतु ज्याचं कुणी नाही त्याला त्या देवाचा सहारा.. त्याप्रमाणे अण्णा काही दिवसांत बरे झाले... आणि अण्णांनी..डॉक्टरजवळ सारी कहाणी सांगितली. ती ऐकुन डॉक्टर अण्णांच्या कुटुंबाला घेवून सपंचांच्या घरी आले... त्यांना पाहून सरपंच प्रथम वैतागले, कांगावा केला, पण, डॉक्टर मात्र हटले नाही, हळूहळू सर्व गावची माणसं सरपंचाच्या घरी जमली.. ते पाहुन डॉक्टरांनी बोलायला सुरवात केली.
ते म्हणाले.. सरपंच तुम्ही फक्त टीव्हीवरील बातमी ऐकून अण्णाच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडलंत हे अयोग्य... तुम्ही प्रथम अण्णाचा ईलाज व्यवस्थित करायला हवा होता... डॉक्टर काय म्हणतात हे न पाहता केवळ बातमीवरून अण्णा कोरोनाचे रोगी समजून तुम्ही त्यांना गावातून तडीपार करून माणुसकी या नात्याला काळिमा लावला...
आपण आपली नाती शेजारी माणुसकीने बांधून ठेवतो. हीच नाती अडचणीच्या वेळी धीराने साथ देतात... त्या वेळी खचल्या माणसाला बळ मिळतं... परंतु तूम्ही केवळ एका चुकीच्या निर्णयाने अण्णांच्या घरावर सक्ती दाखवली ती वाखाणण्यासारखी नसून, तुम्ही सरपंच या पदाला गालबोट लावलंत
खरंतर कदाचित अण्णा, कोरोना रोगाचे शिकार असले असते तरी तुम्ही त्यांच्या कुटुंबियांना धीर द्यायला हवा होता... आणि तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने गावचीही काळजी घ्यायला हवी होती...पण तुम्ही संकटात साथ द्यायची सोडून, त्यांच्यावर गाव सोडण्याची सक्ती केली हे योग्य नाही.. तुम्ही स्वत: अण्णांच्या जागी असता तर... तुम्हावरही अशीच सक्ती केली असती.. तर विचार करा तुमची अवस्था काय झाली असती.. एखाद्या गोष्टीची पुरेपूर मीहिती न घेता एखाद्याची जगण्याची उमेद संपवून टाकायची हे कुठले धोरण!!
आम्ही डॉक्टर मात्र कुठलाही रोगी आमच्याजवळ आला असता आम्ही आमच्या मरणाला न घाबरता सेवा करत असतो. त्यावेळी आमच्यापुढे एकच ध्येय असतं. रोगी बरा व्हावा. तुम्ही जशी देवाची पुजा मनभावे करता, तशी आम्ही कुठल्याही रोगी माणसांची सेवा तनमनाने करतो, आम्हीही एकप्रकारे जिवंत माणसांची भक्तीच करत असतो. रोग्याचे कुटुंब त्यावेळी आमच्याजवळ आशेने पाहत असते. त्यांना त्यावेळी आमच्यात देव दिसतो. त्यांची जेवढी आस्था देवावर असते त्याच्या कैकपटीनं आमच्यावर असते. त्यांना भरवसा असतो त्याचा माणूस आम्ही त्यांना बरा करून परत देणार, परंतु सरपंच तुम्ही विचार करा..जर जीवाच्या भीतीने आम्हीच पेशन्टवर ईलाज करण्याचं सोडलं तर काय होईल. माहीत आहे..आमच्या पेशाला ते कंलक असेल. म्हणूनच आम्ही डॉक्टर दिनरात आलेल्या रोग्याचा ईलाज करते आणि आमच्या पेश्याचा मान राखून त्याची शान वाढवतो. पण तुम्ही मात्र सरपंचपदाला धरून वागला नाहीत सामान्यातल्या सामान्य माणसाला लाजेन खाली मान जाईल असेच वागलात.
मुकाट्याने ऐकत असलेल्या गावच्या लोकांची मने आणि सरपंचांचे मन आत्मग्लानीने भरून गेले.. अण्णांना कसला आजार आहे याची चौकशी न करता आपण पशूसारखे वागलो यांची खंत वाटून पूर्ण गाववाल्यांनी अण्णांच्या कुुटुंबाची व डॉक्टरांची माफी मागून अण्णांना मानानं गावात आणलं आणि यापुढे कोरोनाचं काय पण याहीपेक्षा भयानक रोग जरी गावात आला तरी सर्वजण मिळून त्याचा सामना करू अशी शपथ घेऊनच गावाने झालेल्या चुकीची भरपाई केली.