Savita Jadhav

Others

4.0  

Savita Jadhav

Others

अनन्या... एक चाहूल सुखाची

अनन्या... एक चाहूल सुखाची

4 mins
510


अनन्या... मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली. ग्रामीण भागातील शाळेत शिकली. आई, बाबा, मोठी बहीण, लहान भाऊ यांच्यासोबत रहात होती. नंतर कॉलेजला गेली. मैत्रिणी मिळाल्या. जग बदलले तिचे. कॉलेज जीवन हवेहवेसे वाटू लागले. पण लग्नासाठी स्थळे येऊ लागली... तिची खूप इच्छा होती शिकून काहीतरी करायचे... आईबाबाला मदत करायची... नाव कमवायचे.... . लग्न झाले, संसार सुरू झाला, मुुलंही झाली... सासू ,सासरे, नवरा आधुनिक विचारांची होती.... मुल झाल्यानंतरसुध्दा त्यांनी अनन्याला शिकायला संधी दिली. सासूबाई मुलाला सांभाळत होत्या... अनन्या .... मुळातच हुशार आणि काहीतरी करून दाखवायचे जिद्द तिला स्वस्थ बसू देत नव्हती. खूप मन लावून अभ्यास केला... आणि गुणवत्ता यादीत आली... अनन्याची वाटचाल सुरु झाली. थोड्याच कालावधीत ती सगळ्यांना प्रिय बनली. बघता बघता चार वर्षे झाली... छान जम बसला होता...पण तिच्या नवऱ्याची बदली झाली 

शहराच्या मध्यवर्ती भागात एक फ्लॅट भाड्याने घेऊन ते रहात होते... गावाकडच्या वातावरणात वाढलेली रमलेली तिला करमेनासे झाले होते. नव्या ठिकाणी कुणाशी मैत्री करावी तर शहरातील लोकांचा अनुभव नाही.... विश्वास ठेवायला मन तयार होत नव्हते... मैत्रिणी झाल्या पण हाय हँलो पुरतच दिवसभर स्वतः ला रूममध्ये कोंडून घ्यायची.

मग संध्याकाळी नवरा नि मुलगा आले की फिरायला जायचे बागेत... हळूहळू सवय झाली सगळ्या गोष्टींची. 

मुलांच्या देखभालीसाठी,त्यांना हवं नको ते पाहण्यासाठी वेळ कसा जायचा कळायचं नाही...मुलं मोठी झाली. आपल्याला विश्वात रमू लागली.... . जो तो आपल्या विश्वात रमलेला....अनन्या एकाकी पडली. तिला कुणाच्या घरी जाऊन गप्पा टप्पा करायला आवडत नव्हते.... बोलायला खूप आवडायचं पण बायका एकत्र आले की एकमेकांना उणेदुणे करायच्या... एकमेकीबद्दल चुगली, कागाळी करायच्या हे प्रकार अनन्या ला मुळात पटत नव्हते.. त्यामुळे ती एकटे रहायची...अशातच तिने बरेचसे कला प्रकार शिकून घेतले... काही महिन्यात ते पण नकोस झाले. मग मोबाईल मिळाला... मोबाईलवर बोलणं, मैत्रीण ला मँसेज वगैरे.... कधीतरी चालू असायचं. .. मुलांना आईचे बोलणे बडबड वाटायचे... आईला काही कळत नाही....एखादी गोष्ट सांगितले की ती चुकीचे ठरवली जायची... मुलं ऐकत नाही...का?...तर आई ओरडते... अरे पण तुमच्या भल्यासाठी असते ना... का समजून घेत नाही....मुलांच्या तक्रारी बाबाकडे कराव्या तर बाबाचा पारा लगेचच चढणार..... मग दोष बिचाऱ्या अनन्या ला ...घरात असते म्हणून तिच्या मनाचा विचार कोणी नाही का करावा. अनन्या स्वतः ला तरीही नशीबवान समजते..... नव्हे आहेच... 

तिला गरज होती मायेची.....तिलाही हवी होती कौतुकाची थाप कधीतरी....... तिच्या मनाला काय वाटते.... तिला काय हवय याचा विचार कुणी नाही केला....

अनन्या सतत उदास राहू लागली. . ..  एक मैत्रीण  तिच्या संगे छान अनन्याची मैत्री झाली होती... कधीतरी तिच्या सोबत मन मोकळे करायची... पण नंतर समजले की ती सहानुभूतीने बोलायची... एक गोष्ट मात्र तिने छान केली. अनन्या ला डिप्रेशनमधून बाहेर काढले.... तिने समजावून सांगितले अनन्याला..,"तुझा विचार तू स्वतः कर...कुणी तुझा विचार करेल अशी आशा सोडुन दे,तुला काय आवडते ते कर...स्वतःला वेळ दे. अनन्याला पटलं हे..." हळूहळू ती महिला मंडळ मधे सामील झाली... वेगवेगळ्या उपक्रमामधे भाग घेऊ लागली. 

आणि अशातच... एक मुलगी तिच्या आयुष्यात आली. मानसी...अनन्यापेक्षा वयाने खूप लहान... पण तरीही छान मैत्री झाली..हो ..मैत्रीच...नवल वाटते का?नवल काय वाटायचं..... मैत्रीला वय नसतं.. आणि आपल्या पेक्षा वयानं लहान असणाऱ्या मुलीशी मैत्री... बिघडले काय त्यात..... जिथं विचार जुळतात..... तिथं मैत्री मजबुत असणारच की..असो....

अनन्याची मानसी बरोबर मैत्री झाली.  मेसेजेसवर बोलणं व्हायचे. कमी वयातच खूप समजूतदारपणा होता तिच्याकडे..... व्यवहारात अतिशय हुशार.... इंजिनिअरिंग ची विद्यार्थीनी....कॉलेज करत असताना आईबाबाला काम करून हातभार लावायची... अभ्यास आणि काम यांच्या व्यापात कुठल्याही मुलीशी मैत्री करायला वेळ कुठे होता....पण योगायोगाने अनन्या सोबत मैत्री झाली.... अनन्याला तिचा स्वभाव पटला ती फोन करून कधी मेसेजेस वर वेळ मिळेल तेव्हा अनन्या सोबत बोलायची... समाजातील प्रतिष्ठित लोकांच्या मध्ये वावरत असल्याने फार कमी वयात एखाद्या पोक्त माणसासारखे बोलायची..... समाजात कसं वावरायला पाहिजे.....अनेक सामाजिक, वैचारिक, घडामोडीबद्दल बोलत असतात. तिच्यासोबत बोलताना अनन्या खूप खूश असायची. मानसी आयुष्यात आल्यापासून अनन्याचे आयुष्य बदलून गेले.

कधी थट्टा, मस्करी, काळजी. निखळ, निर्मळ मैत्री... अनन्याच्या आयुष्यात आनंदी चाहूल घेऊन आली. अनन्या माानसीची स्वीट फ्रेंड बनली. आणि मानसी बनली अनन्यासाठी बेस्ट फ्रेंड. मानसी सतत काही ना काही कामात असायच. खूप मोठं होण्याची स्वप्न आहे... त्यासाठी खूपच मेहनत घेते...पण आपल्या मैत्रिणीची विचारपूस करायला विसरत नाही. तिच्यासोबत गोष्टी हक्काने शेअर करते. कुणाच्याही मदतीला सदैव तत्पर असते. या छोट्या मैत्रीणी मुळे  तिचेेेे आयुष्य अगदीच फुलून गेले.

म्हणतात ना... ढीगभर मैत्रीणी असण्यापेक्षा एकच मैत्रीण बरी...जी तुमच्या सुखात, दुःखात सदैव पाठीशी खंबीरपणे उभी असेल.


Rate this content
Log in