End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!
End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!

Rutuja Thakur

Others


3  

Rutuja Thakur

Others


अनघा - भाग पहिला

अनघा - भाग पहिला

2 mins 12K 2 mins 12K

काय करावं काहीच सुचत नाहीये, एकतर MSC च शेवटचं वर्ष त्यात परीक्षा, आणि घरच्यांचं हे असं.. विचार करत असताना च आई आली.

आई- अग अनघा, काय विचार केला मग तू????

अनघा- आई, कसला विचार??? 

आई- अगं, कसला काय लग्नाचा!!!

अनघा- आई तुम्हाला माझं सांगून झालंय जोपर्यंत माझं MSC पूर्ण होत नाही तोपर्यंत मी लग्नाचा विचार नाही करणार.

आई- अहो इकडे येताय का जरा....!!!

बाबा- आलो, आलो... बोल काय झालं???

आई- अहो बघाना, अनघा हट्ट करून बसलीय ऐकत च नाही मी समजावून थकली आता तुम्हीच सांगा तिला, आणि हो...ते जोशींचा फोन आलेला ते परवा यायचं म्हणताय अनघा ला बघायला, सांगा जरा हिला समजावून मग त्यांना फोन करून कळवावं लागेल...

बाबा- मी बोलतो तिच्याशी, तू जरा शांत हो.... अनघा, हे बघ बाळा सगळ्यांनाच कधी ना कधी लग्न करून सासरी जावच लागतं बाळा.. ही रीतच आहे, दुनियेची.

अनघा- बाबा, मग मी कुठे नाही म्हणतेय, फक्त एवढंच म्हणते आहे की इतकी घाई का??? मला माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे... नंतर स्वतःच्या पायावर उभी रहायचं आहे. मग करेल की लग्न!!!!

बाबा- अगं बाळा, ते तर तू लग्न झाल्यावर ही करू शकते त्यात काय एवढं, पण हे स्थळ खूप चांगलं आहे, परत असं स्थळ येईल की नाही माहीत नाही.... मला असं वाटतं आहे तू लग्नाचा विचार करावा बाकी तू समजदार आहेस.

आई- अनघा बाळा, आता सोड हा हट्ट मी जोशींना फोन करून कळवते की या म्हणून तू तयारीला लाग.....!!

अनघा- काय करू काहीच कळत नाहीये, एकतर शेवटच्या वर्षाचं टेन्शन, त्यात हे लग्नाचं!!! मी तर अजून लग्नाचा विचार देखील केला नाहीये. बघायला आल्यावर काय विचारू हे ही मला कळत नाहीये, आणि खूप घाई होतेय अस पण मला वाटतं आहे.(निराश होऊन).....

आई- अनघा, अग जोशी कुटुंब परवा येताय तुला बघायला. मुलगा खूप चांगला आहे म्हणे, नोकरी करतो. एकुलता एक आहे आई वडिलांना. सुखात राहील माझी लेक तिकडे... अनघाला म्हणत. आणि अनघा, तुला जे विचारायचं ते विचारून घे बाळा त्यांना. काही टेन्शन घ्यायचं नाही, आम्ही आहोत ना..!!!


असं म्हणत अनघा च्या आई वडिलांनी अतिशय घाईने अनघाला समजावून स्थळ बोलवलं खरे... त्यात अनघा आतून घाबरलेली, अस्वस्थ, कारण लग्नाचा विचार अजुन केलाच नसताना हे स्थळ येत असल्यामुळे तिला काही सुचेनासे झाले......!!!

बघुया पुढच्या भागात स्थळ आल्यानंतर काय होते ते......Rate this content
Log in