अलक
अलक
1 min
117
आई....
ती शेजारीच एका कार्यक्रमाला उत्साहाने गेली. परत आली ते रडतच. नवऱ्याला म्हणाली.... "तुम्ही मला समजून घेता हो. पण या बायका सारख्या हिणवतात. अद्याप आई नाही ना होऊ शकले." ह्याच विचाराने ती रात्रभर फक्त तळमळत राहीली.
सकाळी पुरते उजाडायच्या आतच फिरायला निघाली. एवढ्यात एका तान्हुल्याच्या रडण्याचा आवाज कानी पडला. बघते तो काय? कुणी तरी इवल्याशा मुलीला काटेरी
झुडपात फेकले होते. तिने पटकन उचलून तिला पोटाशी धरले आणि त्याच क्षणी झाली एका गोजिरवाण्या मुलीची आई......
