ऐसी अक्षरे
ऐसी अक्षरे
1 min
205
"भांड्यावर नाव टाकायचे का? ही हाक कानावर पडली की आई म्हणायची -" अरे! बोलाव रे त्याला. "
खिशातून छोटीशी छिन्नी हातोडी बाहेर निघायची आणि कोरीव सुंदर अक्षरात भांड्यांवर नावं टाकली जायची.
आज मशीन आली आणि अशी माणसं हरवली. पण पंचवीस वर्षांपूर्वीचे ते भांड्यावरचे नाव पाहून टोपी, अंगावर सदरा विजार घातलेली किडकिडीत बांध्याची ती व्यक्ती डोळ्यापुढे उभी राहते. आजही ठसठशीत दिसणाऱ्या त्या कोरलेल्या अक्षरासारखीच.
