STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

1  

Pallavi Udhoji

Others

अहंकार

अहंकार

2 mins
508


एकाच ह्या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी एका गोड गळ्याची नेहा स्टेजवर गाणं गात होती. सर्वत्र पिन ड्रॉप सायलेन्स. सगळे अगदी तन्मयतेने नेहाचं गाणं एकात होते. गाणं संपताच टाळ्यांचा कडकडाट झाला कार्यक्रम संपताच स्टेजवर नेहाच्या चाहत्यांनी गर्दी केली. नेहा सगळ्यांसमोर चेहऱ्यावर स्मित हास्य करून चाहत्यांशी बोलत होती. मनातून ती नाराज होती. आज नेहानी आपल्या गाण्यानी पूर्ण जनमानसात ती प्रसिद्ध झाली होती. पण आपल्याला जे दिसत तसं नसत. घरामध्ये नेहा, तिचे यजमान सुनील, सासू, सासरे व तिची छोटी मुलगी प्रिया असा नेहात कुटुंब होतं.

   कुटुंबात एखादी व्यक्ती यशाकडे वाटचाल करत असेल तर तिला समोर जाऊ देण्याऐवजी तिला मागे ओढण्याचा प्रयत्न केला जातो.

     का होतं असा?

पुरुषाचा अहंकार की तिच्या यशामुळे त्याचा अभिमान. आपल्या सोबतच्या आपल्या आयुष्यात साथ देणाऱ्या आपल्या व्यक्तीला मागे खेचण्यात क

ोणता पुरुषार्थ आडवा येतो.

    ही गोष्ट आज आपल्याला समाजात प्रत्येक ठिकाणी बघायला मिळते. आज स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीने सगळ्या क्षेत्रात अग्रेसर आहे . ती जे काही करते ते सगळ्यांच्या हिताचाच विचार करून. सगळ्यांसाठी झटते ती, कुटुंबात सगळ्यांना बरोबरीने घेऊन चालते, नवऱ्याचे दुखो व मुलांचा दुखो सगळ्यांची अगदी जीवापाड काळजी घेते. पण ह्या सगळ्यातून ती वेळ काढून यशाचा पल्ला गाठते तर पुरुषाचा अहंकार का दुखावल्या जातो. स्त्री ही नुसती बाहुली नाही तर तिलाही मन आहे. तिचेही काही स्वप्न असतात हे पुरुष का जाणत नाही. तसं पाहिलं तर अहंकार तो अहंकार नसतो तर तो मी

पणा असतो. मी हा मी पणाला मारू शकत नाही. अहंकार हा एखाद्या राक्षासासारखा आहे. जेवढे त्याला डीवचाल तेवढा तो अधिक भुकेला होतो.

    म्हणून म्हणते स्त्रीला डीवचू नका . तिचा सन्मान तुम्ही कराल तर समाजात तिचा सन्मान आपोआप होईल.


Rate this content
Log in