Sangieta Devkar

Others

3  

Sangieta Devkar

Others

अबोल प्रीत ( भाग 1)

अबोल प्रीत ( भाग 1)

4 mins
896


हॅलो संयु ,अग व्हाट्स अँप पाहिलेस का ? श्रावणी संयोगीताला विचारत होती. नाही ग श्रावू कामात होते. बोल कशी आहेस तू ? मी मजेत आहे अग ते सोड आपला कॉलेज चा ग्रुप काढला आहे सगळेजण आहेत त्या ग्रुप मध्ये तुला ही मी अँड केले आहे . बर श्रावू बघते मी. असे बोलून संयु ने फोन ठेवला. संयु ने व्हाट्स अँप ओपन केले "वूइ बेस्ट बडीज" अशा नावाने ग्रुप होता कॉलेज चे बऱ्या पैकी त्यात होते. अभिजित,निखिल,श्रावणी,आदित्य आणि संयु खास बेस्ट फ्रेंड होते. कॉलेज मध्ये यांचीच चर्चा जास्त असे,अभि एकदम हुशार स्टुडन्ट, निखिल वक्तृत्व मध्ये आणि कथा कविता लिहिण्यात एक्सपर्ट तर आदित्य म्युजिक प्रेमी,गिटार लवर. श्रावणी म्हणजे एकदम दिलखुलास ,बिनधास्त व्यक्तिमत्त्व तर संयु शांत हळुवार समंजस असे हे वेगवेगळंया स्वभावाचे पण मैत्री यांची घनिष्ठ .संयु ने पटपट आदित्य चा नंबर ओपन केला . त्याचाच डीपी लावला होता त्याने आज ही तसाच दिसत होता,एकदम डॅशिंग,रुबाबदार ,स्ट्रीम केलेली दाढी,डोळ्यावर नेहमी सारखा गॉगल,,खूप वेगवेगळे गॉगल आदी कडे होते त्याला आवडायचे गॉगल .. संयु आदी च्या फोटो कडे एकटक पहात राहिली ,मनात च बोलली आदी माझी आठवण येते का रे तुला कधी? का नाही बोललास कधी मनातलं, एकदा विचारून तरी बघायच होतं, माझं ही तुझ्या वरच प्रेम होतं रे वेड्या. त्याच्या आठवणीने तिचे डोळे भरून आले. आता फक्त आठवणी उरल्या होत्या त्या सोनेरी क्षणांच्या, ते सोनेरी क्षण आता पुन्हा येणार न्हवते. मनातल्या एका कप्प्यात या साऱ्या आठवणी आता बंदिस्त आहेत. त्या आठवणींच्या गावात जाणं होत नाही आणि गेले तरी पुन्हा परतन खूप कठीण होत. संयुने हलकेच आपले अश्रू पुसले आणि कामाला लागली.

पण कामात तिचे लक्ष लागेना राहून राहून आदित्य चा चेहरा नजरे समोर येत होता. संयु मागे मागे भूतकाळात हरवत चालली. कॉलेज चे फर्स्ट इयर सुरू होते.जून महिना चालू झाला होता. पावसाला सुरुवात झाली होती. संयु कॉलेज ला आली तिची स्कुटी नेहमीच्या जागी पार्क करून बॅग घेऊन क्लास रूम कडे निघाली होती. पाऊस थोडा थोडा पडतच होता. तिच्या समोरून बाईक वरून एक जण आला आणि तिथे खड्डा होता त्यात पावसाचे पाणी भरले होते. नेमके त्या खड्डा तुन त्या मुलाने बाईक घातली तो ही पार्किंग कडे चालला होता. आणि खड्ड्यातले पाणी संयु च्या अंगावर उडले. तशी ती रागाने बोलली ,हॅलो मिस्टर जरा डोळ्या वरची झापडं काढा आणि गाडी चालवा,सगळं पाणी माज्या कपड्यांवर उडाले. तसा आदित्य थांबला आणि म्हणाला, सॉरी मिस, पण कसे आहे ना की मुद्दाम पाणी नाही उडवले, खाली खड्डा आहे हे मला माहित न्हवते. ती म्हणाली, हो का मग पावसात गॉगल घालून बाईक चालवले की असेच होणार ना.! उगाचच हिरो गिरी करायची. मिस, तुम्ही माज्या गॉगल वर का राग काढता आहात,पावसाळा आहे असे पाणी उडणारच त्यात काय एवढं..हे बघा मला वाद घालायचा नाही उगाच सकाळी सकाळी डोकं नका खाऊ संयु म्हणाली. अहो मी ही तेच म्हणत आहे आदित्य म्हणाला. तोपर्यंत निखिल तिथे आला. अरे संयु काय झालं? बघ ना कोण हा नीट गाडी चालवता येत नाही सगळं पाणी उडवलं याने. निखिल ने आदित्य कडे पाहिले, म्हणाला न्यू ऍडमिशन का? हो, फर्स्ट इयर ला आजच जॉईन केले कॉलेज. ओके मी निखिल असे म्हणत निखिल ने आदित्य ला शेकहँड केला. माय सेल्फ आदित्य. निखिल संयु कडे पहात म्हणाला आणि ही संयोगीता . हॅलो मिस आदित्य हसत म्हणाला, फ्रेंड्स.. त्याने तिला ही शेकहँड केला. तिघे ही क्लासरूम मध्ये आले. अभिजित,श्रावणी आधीच आले होते. निखिल ने आदित्य शी सर्वांची ओळख करून दिली. पहिला दिवस फक्त नॉमिनल इन्ट्रो मध्येच गेला पण आदित्य मात्र चोरून चोरून संयु कडे पहात होता. सिल्की केस मोठे डोळे गुलाबी ओठ ,सरळ नाक संयु दिसायला सुंदर होती. पण स्वभावाने शांत. पहिल्याच नजरेत आदित्य ला आवडली. असे हे पाच जण पहिल्याच दिवशी एकमेकांचे खास मित्र बनले. कँटीन मध्ये एकत्र क्लास मध्ये एकत्र असे हे पंचम नुसता कल्ला करायचे. आज एक लेक्चर ऑफ होते सो आज हे पाच जण कॅन्टीन ला बसले होते. बाकी जास्त गर्दी ही न्हवती. संयु ला कविता वाचायला ऐकायला आवडायच्या . ती निखिल ला म्हणाली निक्या एखादी कविता ऐकव ना? आणि आदित्य तुला माहीत आहे का निखिल खूप छान लिहितो कविता तर ऑसम असतात त्याच्या आणि अभि तर काय हुशार स्टुडंन्ट आणि श्रावू म्हणजे उत्साहाचा नुसता धो धो धबधबा... ओहह आदित्य म्हणाला. आणि तू काय करतेस संयु गाणं म्हणतेस की लिखाण की वाचन? ती काहीच नाही करत फक्त कुल राहते आणि आम्हाला ऐकायच काम करते निखिल म्हणाला. असू दे रे निक्या ऐकायला श्रोता पण पाहिजे असतो नाहीतर कोण ऐकणार तुझ्या कविता. हम्म,,निखिल म्हणाला. अरे आता भांडत बसणार काय तूम्ही अभ्या म्हणाला. बर बर ऐका माझी ग्रँड न्यू कविता कवितेचे नाव आहे प्रेम हे... आणि निखिल बोलू लागला,

मी तुला नेहमी गृहीत धराव

तू मला नेहमी समजून घ्यावं

मी तुझ्या वर रुसावे,पण

तू मात्र तटस्थ रहावे.

प्रेम असच असत का?

माझे तुझ्या वर प्रेम किती

कितीदा हे सांगावे..

मला वाटते मी न सांगता ,

तू ते ओळखावे.

पण तू मात्र नुसतंच

गालातल्या गालात हसावं.

तुझं म्हणणं असत प्रेम असं का सांगावं.?

तू शांत हळवा मी तितकीच अधीर..

मी बडबड बोलणारी तू कायम स्थिर गंभीर..

मनातून मात्र नेहमी मला जपणारा..

न बोलता ही बरच काही बोलणारा..

कायमच असा का रे तू धीर गंभीर..

बघ ना डोळ्यात माझ्या किती आहे मी तुझ्या साठी अधीर..

जपलंय मी तुला माझ्या श्वासा श्वासात ..

विरघळला आहेस तू माझ्या प्रेमात.

सावली बनून राहीन मी कायम तुझ्या आयुष्यात.

काहीच कमी नसेल मग माझ्या जीवनात...!!

वा किती मस्त लिहिलंस निक्या पण कोणा साठी ही कविता श्रावणी ने विचारले. निखिल म्हणाला अजून नाही ग भेटली कोणी की जिच्या साठी कविता लिहीन. पण निखिल चे डोळे संयु लाच पाहात होते हे आदित्यने पाहिले .


क्रमश... कसा वाटला हा भाग नक्की कमेंट्स करा. कथेचे सर्व हक्क लेखिकेच्या आधीन आहेत


Rate this content
Log in