STORYMIRROR

Priya Bhambure

Others Children

2  

Priya Bhambure

Others Children

आयुष्यातील इंद्रधनुष्य

आयुष्यातील इंद्रधनुष्य

2 mins
138

बाळा तुझ्यामुळे आई झाले......."कोठेही न मागता भरभरून मिळालेलं दान म्हणजे आई विधात्याच्या कृपेच निभैळ वरदान म्हणजे आई "आईची महती सांगणारी अनेक गाणी, ओव्या, कविता आपण वाचतो, ऐकतो पण आईचे बाळाप्रती भाव काय असतात?आई म्हणजे बाळाचे विश्व असते. त्यावेळी आईच्या मनात बाळाबद्दलचा एक कृतज्ञता भाव असतो,विश्वव्यापी बाळा तुझ्यामुळे मी झाले आई,


होऊ कधी उतराई बाळा तू माझ्या आयुष्यात आलीस, माझ्या देहात वाढलीस, माझे स्त्री जीवन समृद्ध केलेस.माझ्या आयुष्याच इंद्रधनुष्य केल. तीच येणं आमच्या आयुष्यात अचानकपणेच झालं. नुकतंच लग्न झालेलं असल्यामुळे लगेचच ही नवीन जबाबदारी स्वीकारावी का? हा प्रश्न सुरुवातीला खूप गोधळून टाकणारा होता. मात्र माझ्या पाठीशी गौरव (माझे मिस्टर ) अतिशय ठामपणे उभे होता.त्यामुळे हि मिळालेली आगंतुक चाहूल आयुष्य आणखी सुंदर करण्याच्या मार्गावर होती. ह्या संपूर्ण काळात गौरव पहिल्या दिवसापासून माझी काळजी घेत होता. दवाखान्यात घेऊन जाणं ,गोळ्या औषध ही सगळी जबाबदारी एक नवरा म्हणून,एक बाळाचा होणारा बाप म्हणून अगदी काटेकोर पाळत होता. कधीही कुठलीही खाण्याची मागणी केल्यास तत्परपणे पूर्ण करण्याचा तो प्रयत्न करत होता. ह्या काळात कधी ,कधी माझी चिडचिड होत,कधी मन हळवं होऊन डोळ्यांत पाणी येत असे . रात्री कधी झोप येत नसे. ह्या होणाऱ्या वेगवेगळ्या बदलांना देखील तो अतिशय छान प्रकारे समजून घेत . त्यांच्यापरीने ती परिस्थिती तो सांभाळून घेत असे. ते देखील माझ्यावर न रागवता.


त्याचशिवाय डॉक्टरांकडे अपॉंटमेंट देखील चुकवली नाही. प्रत्येक गोष्ट अगदी नेटाने पार पाडत होता. ह्या सगळ्या जाणाऱ्या काळात मी आई होतीये हि भावना माझ्यासाठी फार वेगळी होती. सुखद होती. पण,जसे जसे दिवस भरायला लागले, माझ्या मनाची अवस्था फार चलबिचल होऊ लागली. भीतीमुळे पोटात गोळा येऊ लागला. मात्र तो माझ्यासमोर टेन्शन न दाखवता मला धीर देत होता. आणि शेवटी ती वेळ येऊन ठेपली. दिवाळी तोंडावर असल्याने सुट्ट्याचा देखील गोधळ होणार होता. आणि काही चालेलेल्या घडामोडीमुळे आणि माझ्या शरीराकडून मिळणाऱ्या रिपोर्टमुळे डॉक्टरांनी

तारखेच्या आधीच अडमिट करून सीझर करण्याचा निर्णय घेतला. आधीच मी घाबरलेली आणि त्यांत वेळेच्या आधी ह्या गोष्टी घडत असल्यामुळे माझी तर भीतीने अवस्था वाईट झाली होती. त्यात एक फक्त एक चांगली गोष्ट म्हणजे गौरवच्या जोडीला माझे आई-बाबा देखील आलेले असल्याने जरा त्याचा आधार होता. आणि १९ ऑक्टोबर १९ ला दुपारी आमच्याकडे लक्ष्मीच आगमन झाले. ह्या गोड बाळाची मी आई झाले ह्यावर माझा विश्वास बसतच नव्हता.तीला जेव्हा हातात घेतलं. आणि आनंदाश्रूंनी त्या वेदनादेखील मी विसरून गेली.त्या क्षणी मला समजलं का? एका स्त्रीच आयुष्य आई झाल्यावर परिपूर्ण झालं असे म्हणतात...


Rate this content
Log in