आयुष्य
आयुष्य
2 mins
163
- आयुष्य अत्यंत मर्यादित आहे आणि जीवनाचा जेव्हा शेवट होईल तेव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्याला सोबत नेता येणार नाही. मग जीवनात खूप काटकसर कशासाठी करायची? आवश्यकता काय ? आवश्यक आहे तो खर्च केलाच पाहिजे. ज्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो त्या गोष्टी केल्याचे पाहीजेत.
- आपण गेल्यानंतर पुढे काय होणार याची मुळीच चिंता करू नये. कारण आपला देह जेव्हा मातीत मिसळून जाईल तेव्हा कुणी आपले कौतुक केले काय, टीका केली ? जीवनाचा आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशाचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असेल.....
- तुमच्या मुलांची खूप काळजी करू नका. त्यांना स्वत:चा मार्ग निवडू द्या. स्वत:चे भविष्य घडवू द्या. त्यांच्या इच्छा, आकांक्षा चे आणि स्वप्नाचे तुम्ही गुलाम होऊ नका. मुलावर प्रेम करा, त्यांची काळजी घ्या, त्यांना भेटवस्तू द्या. मात्र काही खर्च स्वत:वर, स्वत:च्या आवडीने करा. जन्मल्यापासून मरेपर्यंत नसते राबराब राबणे म्हणजे आयुष्य नाही हे देखील लक्षात ठेवा.
- तुम्ही पन्नासीत आहात आरोग्याची हेळसांड करून पैसे दिवस आता संपले आहेत. पुढील काळात पैसे मोजून सुद्धा चांगले आरोग्य मिळणार नाही. या वयात प्रत्येकापुढे दोन म्हत्वाचे असतात. पैसा कमावणे कधी थांबवायचे ना आणि किती पैसा आआपल्याला पुरेल ! तुमच्याकडे शेकडो, हजारो सुपीक शेतजमीन असली तरी तुम्हाला दररोज किती अन्नधान्य लागते. ज्याच्याकडे अनेक घरं असले तरी रात्री झोपण्यासाठी एक खोली पुरेशी असते. एक दिवस आनंदाशिवाय गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही गमावला आहात. एक दिवस आनंदात गेला तर आयुष्यातला एक दिवस कमावला आहात. आनखी एक गोष्ट म्हणजे तुमचा स्वभाव खेळकर, उमदा असेल तर तुम्ही आजारातून बरे व्हाल. आणि तुम्ही कायम प्रफुल्लित असाल तर आधारित पडणार नाही.
- सगळयात महत्त्वाचे म्हणजे आजूबाजूला जे जे उत्तम आहे त्याकडे पहा. त्याची जपणूक करा. आणि हो तुमच्या मित्रांना कधीही विसरु नका. त्यांना जपा. हे जर तुम्हाला जमले तुम्ही मनाने कायम तरुण व्हाल. आणि इतरांना ही हवेहवेसे वाटाल.मित्र नसतील तर तुम्ही नक्की एकटे, एकाकी पडाल.
- आयुष्य खूप चांगले आहे.....
