आयुष्य धावणाऱ्याचं
आयुष्य धावणाऱ्याचं
आज अगदी सर्वत्र धावपळीच युग आहे. या युगात कोणता माणूस काय करत आहे हे कळायला मार्ग नाही. या चालू युगात माणसांनी आपलं आयुष्य इतकं धावपळीच, दगदगीचं आणि म्हणूनच वरवरचे का करुन घेतलं आहे?. आशा-निराशा, वैफल्य, सुख--दु:ख, मिलन - विरह, हे सगळेच भाव ही माणसं कातडीवरच्या तिळासारखे वागवतात. कातडीवर तीळ असला काय अन् नसला काय? काय आडतं? ही माणसं अशीच असतात.
यांंना दुधावरची साय हवी असते. दुध तापवण्याचा खटाटोप नको असते. फुलाांच सुगंध हवा. पण रोपटेे लावण्याचा खटाटोप नको असते. मुले हवीत पण संंगोपनाची यातायात नको असते. प्रगती हवी पण गती नको, प्रसिद्धी हवी पण सिद्धी नको असते.
अशी माणसं आयुष्य काढतात. जगत नाहीत, चालणारा माणूसच फक्त पाायाखाली किडा--मुंगीचीी हत्या होत नाही ना हे बघतो. धावणारा माणूस फक्त तुडवण्याचे काम करत धावतो. त्याला दुसऱ्याचे काही देणंघेणं नाही. तो फक्त आपले पाहत असतो.
