आठवणीतलं झाड
आठवणीतलं झाड
1 min
228
आठवणीतलं झाड. हो भले थोरले लिंबाचे झाड.ज्याच्या सावलीत पशुपाखरे, माणसं सारेच विसावा घ्यायचे. आम्ही कॉलेजच्या बसची वाट पाहत केलेल्या गप्पांचे साक्षीदार होते ते.
अरे! पण हे काय? आज कुणीतरी ते झाड तोडून तिथे भल्ली मोठी दुकाने बांधली होती . ते पाहून जीव हळहळला. ज्या झाडाने माणसावर सावली धरली होती. त्याच्यावरच माणसाने कुर्हाडीचे घाव घातले होते आणि उरले होते तिथे फक्त आठवणीतलं झाड.
