"आत्मविश्वासारूपी स्वप्न"
"आत्मविश्वासारूपी स्वप्न"


मला लहानपणा-पासून स्वयंपाकाची आवड होती आणि आईची शिकवण कोणतेही काम मनापासून करायचे. त्या नंतर अशी स्वयं पडली की कधीपण आणि कोणताही पदार्थ केला की अगदी चविष्टच होतो, तर सुयश म्हणायचा आईच्या हतात जादू आहे बाबा, मांझी फेवरेट डिश नेहमीप्रमाणे चांगलीच बनते. मग मी त्याला म्हणायचे एकाग्रचित्तेने सर्व काम करते न मी,म्हणूनच आधी #मीमाझीचफेवरेट आहे.
मध्यंतरी तब्बेतीच्या अडखळ्यामुळे नोकरीपण सुटली हो माझी, तेव्हां मला अगदी माझ्या सर्व-स्वप्नांवर पाणीच फिरल्यासारखे वाटले होते.
जशी स्टोरी मिररची माहिती मिळाली, मी आपले मन घटृ करून नोटींग-ड्राफ्टिंगला पुन्हा वळवून हिंदी-मराठी भाषेत लिखाण सुरू केले, तशीच आत्मविश्र्वासारूपी स्वप्न परत नांदु लागली, अता मी सर्वात अधि "मी माझीच जास्त फेवरेट आहे".