kishor zote

Others

5.0  

kishor zote

Others

आत्महत्या

आत्महत्या

1 min
1.0K


     आत्महत्या.....

नव्हे ही तर स्व हत्या. आत्मा अमर असेल किंवा आत्मा नसेलच पण हत्या घडते मग ती आत्महत्या न म्हणता स्वहत्या म्हटलेलं योग्य राहील हे माझे मत.

     आजकाल जगणे कठीण व मरण स्वस्त झाले अशी म्हणायची वेळ आली आहे. जीवन निरस झालय की मरणात सर्व प्रश्नांची सोडवणूक आहे तेच कळत नाही. प्रत्येक दिवशी बातम्यात स्वहत्या बाबतीत वाचायला मिळते. या स्वहत्या ग्रस्त लोकांत वयाचे काही बंधन दिसत नाही. अगदी शाळकरी विद्यार्थी ते वयोवृद्ध व्यक्ती यांनी स्वहत्या केल्याच्या घटना आज समाजामध्ये घडत आहे. बरं कोणताच समाजही अपवाद मिळत नाही. स्त्री - पुरुष हा ही भेदभाव दिसत नाही. 

     स्वहत्येची कारणेही अगदी शुल्लक वाटतात. घरातील संवादाचा अभाव हे एक कारण सांगता येईल. हातात आलेला स्मार्ट फोन व त्या द्वारे डाउनलोड होणारे गेम व गेमचा शेवटचा टास्क देखील स्वहत्या असतो. एकदाच मिळणारे हे जीवन आणि मृत्यू हे जर अंतिम सत्य आहे तर स्वहत्या करावीच कशाला ?

      मानसिक विकास व वैचारिक विकास घडणे अपेक्षीत आहे. संसारातील विवाद व आर्थीक अपयश आले तरी खचून न जाता प्रत्येक बाबतीत धैर्याने संकल्प सिध्दी केली तर मार्ग नक्कीच सापडेल...

       शेवटी हेच सांगणे आले की, स्वहत्या हे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर होवूच शकत नाही....


Rate this content
Log in