Manisha Patwardhan

Others

3  

Manisha Patwardhan

Others

आशेचा किरण

आशेचा किरण

4 mins
34


त्या दिवशी ती खूपच आनंदात होती. त्याच कारणही तसंच होतं. इतक्या लांब ती क्वचितच कधीतरी गेली असेल. तीलाही ते आठवत नव्हतं. अर्थात पूर्ण घराची जबाबदारी तीच्याच शिरावर होती. एवढं मोठं घर.. काय कमी काम असत कां !! त्यातच तीचा पायही दुखायचा .. पण तशीच लंगडत लंगडत ती सर्व कामे उरकायची. आणि उत्साह तर तीचा कायमच ओसंडत असायचाच .. आज हे कर , तर उद्या ते कर.. शिवाय पाहुणेरावणे.. स्वतःहुन कुणी येत नसेल तरी हीचा " या हो या हो " चा घोषा असायचाच.पण शेवटी प्रत्येकाच्या ताकदीला काहीं सिमा असतेच कीं नाही. मुलाचे लग्न झाले होते . पण ती दोघंही नोकरी निम्मित्ताने लांबच होती. घरात सासूबाईही आजारी.. त्यांचीही जबाबदारी मोठीच होती... ..या सगळ्यातुन तीला बिचारीला कधीच बाहेर जायची संधीच मिळायची नाही. पण या वेळी मात्र ती नागपुरला मामे भावाच्या मुलाचे लग्न होतं म्हणून तीने जायचं नक्की केलं होतं. 

    पण निघायच्या तीन / चार दिवस आधीच कोरोनाचे वारे वाहू लागले. आता जायचं कीं नाही , हा मोठ्ठाच प्रश्न समोर उभा ठाकला. घरातुनही कशाला जातेस.. असा विचार मांडला गेला होता. एक मन म्हणत होतं , खरंच जाऊया कीं नको.. काही त्रास तर होणार नाही ना .. पण मग त्याच मनाने उचल खाल्ली... छे काय होणार आहे .. ठरवलं आहेच तर जायचच आता !! शेवटी त्याच मनाचा विजय झाला.

    ती आणि तीची एक वहिनी दोघी निघाल्या.. लग्न गावी निर्विघ्नपणे जाऊन पोचल्या... पण ....

    तो पर्यंत हाॅल कॅन्सल.. घरच्या घरी लग्न करा.. जास्त माणसे नकोत.. इथ पर्यंत कौरोनाची गाडी जाऊन पोचलीच होती. लग्नाची धड मजाही घेता आली नाहींच.. फक्त एकच समाधान कीं कधीही न भेटणारी नातेवाईक मंडळींचे मुख दर्शन तरी झाले. कारण सगळीच घाई घाई.. लग्नाचा एकही विधी मनासारखा झालाच नाही.. सगळंच टेन्शनखाली...

    दुसर्‍या दिवशी पुजा उरकुन , भराभरा चार घास प्रसादाचे पोटात ढकलून.. मंडळी पुढच्या मुक्कामी परतीसाठी पोचली. आज एका नातेवाईकाकडे राहुन उद्या परतीचा प्रवासाला सुरवात...

    पण... कसंच काय... तो पर्यंत करोनाची घट्ट मिठी आपल्या देशाला पडलीच.. गाड्या बंद... सगळे व्यवहार ठप्प झाले...

    एक दिवस गेला ... दोन दिवस गेले...

    आता मात्र घराची ओढ स्वस्थ बसू देईना.. सारखे फोन सुरू झाले. घरी सगळे काय करीत असतील .. कसं बरं सगळं सांभाळले असेल..एकेक विचार मनाला बेचैनी आणू लागला.

    करता करता पंधरा दिवस झाले.. गाड्या सुरू होण्याचे नावच नाही. एकेक दिवस संकटाचा वाटू लागला.. परतीचा मार्गच सापडत नव्हतां.. रहात असलेल्या ठीकाणचे लोकं म्हणायचे.. काही वाटून घेऊ नका हो.. नाहीतर तुम्ही आमच्याकडे एव्हढ्या लांब कशाला येताय ? रहा हो आरामात.. आम्हालाही तुमचा जरा सहवास लाभतोय तो लाभूदे कीं.. त्यांच्या दृष्टीने ते आपली बाजू संभाळत होतेच.. राहिलेल्या माणसांना कठीण वाटू नये याची दखल घेत होते. आणि खरंच त्यांना तीच रहाणे.. छानही वाटत होत. कारण ती माणसंही चांगलीच होती.. एखाद्यावर आलेले संकट समजून घेणारी होती..

    पण शेवटी आपलं घर ते आपलंच असतं ना !! आणि ती माणसं जरी नात्याची असली .. तरी आजच्या समाजात पुर्वी सारखे वातावरण राहिलेच नाही ना !! मामाकडे जा , मावशीकडे जा , काकाकडे जा... कमीच झालयं ना सगळं !! 

    मानसिक त्रास खूप होत होता.. आणि त्यात आजुबाजूचे लोकं असतातच ना वक्तव्य करायला ! .. काही लोकं तर दखलच घेत नव्हंते... हल्ली माणसांचे फोन करण्याचे प्रमाणे कमीच आहे.. पण अशा तीच्या संकट काळात चार शब्दांची तीला केव्हढीतरी ओढ असायची...

    असाच एक / दीड महिना उलटला... आणि कुठेतरी आशेचा किरण दिसला. सरकारने अडकलेल्या लोकांना परवानगी देण्याचे ठरवले.. आणि तीच्या आनंदाला पारावार राहिला नाही..

    पण तेही काहीं फारसं सोप नव्हतं. चारी बाजुने प्रयत्न चालू झाले.. सरकारी कार्यालयात दोन्हीकडे हेलपाटे घालणे चालू झाले.. यात यश कधी मिळेल , प्रवासाला वाहन कसं मिळेल.. सगळ्याच चिंता मनाला भेडसावत होत्या. गाडी जरी केली , तरी आपण दोघीं स्त्रियांनीच त्या चालकावर विश्वास ठेवून प्रवास करायचा !! नाना विचार मनाला सतावित होते. 

    पण इश्वराच्या दरबारी " देर है , लेकीन अंधेर नहीं है " म्हणतात ना .. ते काही खोट नाही.. तो चालकही चांगला होता. त्याने व्यवस्थित गावाला आणून सोडले. अखेर सगळं यथासांग पार पडलं. 

    तिथून निघतांनाही एखादी माहेरवाशीण जवळजवळ दोन महिने माहेरी राहून आपल्या सासरी जावी तीची बोळवण करावी , तशीच त्यांनीही बोळवण केली. घराच्या ओढीत , प्रसंन्न मनस्थितीत सर्वाचा निरोप घेऊन ती गाडीत बसली ,भरदार वेगाने गाडी सुरू होती ,आणि ती मनाने केव्हाच घरी पोचली होती .

    पुढे सरकारी इस्पितळातलाही अनुभव फारसा वाईट आला नाही. कारण ती ग्रीनझोन मधुन आली होती. पण तिथे आलेल्या इतर लोकांचे हाल मात्र तीला बघवत नव्हंते..

    अशा तर्‍हेने एकदा घराला पाय लागले.. आणि तीने सुटकेचा श्वास घेतला.

    पण अजुन एक अनुभव घ्यायचा बाकीच होता. घरी आल्यावर घरच्या लोकांचा काहींच प्राॅब्लेम नव्हता.. उलट त्यांनीही सुटकेचाच श्वास टाकला.. पण तो सगळ्या कामांचा सिझन... दाराशी कामाला येणारी माणसे संशयाने पहात होती... तरी ती बिच्चारी एका खोलीत कोरोनटाईन राहिली होती. पण तरीही ही वागणूक अपमानास्पदच ना !!

    पण त्यामाणसांचाही दोष म्हणता येत नाही. कारण त्यालाही परिस्थितीच जबाबदार आहे.. आजकाल शेजारून चाललेला माणूस कोरोनाग्रस्त नाहीं ना .. अशी भिती प्रत्येकाला वाटावी असेच वातावरण आज निर्माण झाले आहे.. कधी यातुन आपण सारे बाहेर पडू , काहींच कळत नाही..

    ती मात्र हे दिवस आयुष्यभर विसरणार नाही एव्हढं खरं....



Rate this content
Log in