Vasudha Naik

Others


2  

Vasudha Naik

Others


*आरसा हसला*

*आरसा हसला*

1 min 9.1K 1 min 9.1K

नील अगदी शाळेसमोर राहत असे. शाळा सकाळी ७.१० भरत असे. मुले सातलाच येऊन परिपाठासाठी रांगा करायला लागायची.

नील मात्र रोज शाळेत टोल झाला की यायचा. अगदी अवतार असायचा. तोंड नीट धुतलेले नसायचे. भांग पाडायचा म्हणून पाडलेला. दूधाचे डाग ओठाला तसेच. गणवेश चुरगळलेला. अशा ओंगळवाण्या रूपात यायचा.

त्यानं आरशात पाहिले की आरसा मात्र रडायचा. त्याची आई रोज त्याला समजावू सांगे. पण तो अजिबात ऐकायचा नाही.

नील बरोबर त्याचे मित्र खेळायचे नाहीत, त्याच्या अंगाचा, तोंडाचा घाणेरडा वास येई.

त्याला खेळायला कोणी घेत नाही हे तो बाईंना सांगत असे. बाईंनी त्याला स्वच्छतेचे महत्व समजावून सांगितले.

आईचे न ऐकणारा नील पण बाईंचे त्याने ऐकले. तो दुसर्‍या दिवशी लवकर उठला. मस्त गरम पाण्यानं आंघोळ केली. पावडर लावून भांग पाडला. दूध व्यवस्थित प्यायले. आरश्यात पाहिले. आज आरसा त्याच्याकडे पाहून चक्क हसला. टोलच्या आधी शाळेत जाऊन ओळीत उभा राहिला.

त्याला पाहून बाईंसहीत सर्वांना आनंद झाला. सर्वांनी त्याला खेळायला घेतले. नील हळूहळू लाडका विद्यार्थी, मित्र बनला.


Rate this content
Log in