आपल्या आतला देव
आपल्या आतला देव


अलीकडे बराच वेगळा दिसतो तो. कोणीही येऊन बोलावं, त्याची विचारपूस करावी.असा नव्हता तो पूर्वी. एक वीण होती त्याच्यात आणि माझ्यात. इतका "सार्वजनिक" नव्हता तो. माझा होता. अलीकडे जरा काळावंडल्यासारखाही वाटतो. खरंतर त्याच्याच कडून स्फूर्ती घ्यायचे मी. नवं जगण्याची, नवं पाहण्याची. पण आता काय झालंय त्याला? का हसत नाही पूर्वीसारखा आपल्याकडे बघून?
"बोल रे, काय झालं तुला? का असा दिसतोस? इतका विरक्त नव्हतास तू माझ्यापासून. हास की एकदा ओळखीचं. पूर्वीसारखं, फक्त माझ्यासाठी हसल्यासारखं"
डोक्यावरची घंटा शांतपणे वाजवून मी श्रद्धेने डोळे मिटले. जरा वेळ स्वतःच्याच आत पाहिलं.
पाहते तर काय! माझ्यातलं "मी" पण सरून केवळ तो उरला होता आणि नुसता नाही हा! अगदी "ओळखीचं" हसत उभा होता. तो माझा आनंद होता.
"परमेश्वराला स्वतःच्याच आत पहा." असं उगाच म्हणतात होय.